Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आद्यक्रांतिकारकाच्या सशस्त्र सेनेने पुणे शहरावर मिळवला होता ताबा | कोण होते अधिक माहितीसाठी वाचा

                आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके


Immage Secure By - jiocinema.com


Adyakrantikarak Vasudev Balwant Phadke | Phadka's armed forces controlled the city of Pune

 

आपल्यापैकी किती जणांना भारतीय सशस्त्र बंडखोरीचे जनक माहित आहे? भारत शूर वीर सैनिकांची भूमी आहे. परंतु असे बरेच लोक आहेत. त्यांची ओळख अद्याप अज्ञात आहे. वासुदेव बळवंत फडके हे असेच एक भारतीय सशस्त्र क्रांतिकारक होते. त्यांनी भारत मुक्त चे स्वप्न पाहिले. ब्रिटिशांविरुद्ध लढाईत ते देशभक्ती प्रतीक आणि आदर्श होते. भारतीय सशस्त्र जनक म्हणून ओळखले जाणारे वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण या गावात झाला होता.  शिरढोन हे गाव पनवेल तालुका रायगड जिल्हा महाराष्ट्र मध्ये आहे. ते एक उत्तमआपल्यापैकी किती जणांना भारतीय सशस्त्र बंडखोरीचे जनक माहित आहे? भारत शूर वीर सैनिकांची भूमी आहे. परंतु असे बरेच लोक आहेत. त्यांची ओळख अद्याप अज्ञात आहे. वासुदेव बळवंत फडके हे असेच एक भारतीय सशस्त्र क्रांतिकारक होते. त्यांनी भारत मुक्त चे स्वप्न पाहिले. ब्रिटिशांविरुद्ध लढाईत ते देशभक्ती प्रतीक आणि आदर्श होते. भारतीय सशस्त्र जनक म्हणून ओळखले जाणारे वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण या गावात झाला होता.  शिरढोन हे गाव पनवेल तालुका रायगड जिल्हा महाराष्ट्र मध्ये आहे. ते एक उत्तम कुस्तीगीर होते.  वासुदेव बळवंत फडके हे भारतीय आद्य क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.


हे पण वाचा - छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती | राणी त्यांचे पुत्र त्यांच्या कन्या त्यांची नातवंडे ???



बालपण आणि शिक्षण -


रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच वासुदेव बळवंत फडक्यांना कुस्ती घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले. व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले. पुण्यामध्ये असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानडे यांचा प्रभाव पडला. व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश सरकारची धोरणे होती. असे त्यांच्या लक्षात आले. त्याच वेळी फडके क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्याही संपर्कात येऊन त्यांच्या प्रभावाखाली आले होते. सर्वांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे वासुदेव बळवंत फडके यांना पटवून दिले.


शैक्षणिक कार्य - 


वासुदेव बळवंत फडके पुण्याच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक पहिले सेक्रेटरी होते.आणि ट्रेझर पण होते.इ. स.१८७३ मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ त्यांनी घेतली. तसेच समाजामध्ये समानता एक्य समन्वय निर्माण करण्यासाठी एक वर्धिनी ही संस्था त्यांनी सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये १८७४ मध्ये पुन्हा शाळा सुरु करुन स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला. वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपस्थित होते. त्यांनी दत्तमहात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला होता.


क्रांतीचा पाया - 


आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी वासुदेव फडक्यांनी रजा मागितली असता. त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाई पर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी राजीनामा देऊन सोडून दिली. व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली. पण इ. स. १८७० च्या दशकात पडलेल्या दुष्काळालाकडे सरकारने केलेल्या दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाऊन तेथील लोकांना आणि नागरिकांना मदत केली. व त्या वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली. हाच क्रांतीचा सशक्त पाया असे म्हटले जाते.


हे पण वाचा - छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ त्यांची कामे आणि त्यांचा पगार


सशस्त्र क्रांती - 


इसवी सन १८७९ नंतर फडके यांच्या कार्याला खरी सुरुवात झाली होती. त्यांना सुरुवातीला साहित्य आणि आर्थिक अडचणींना समोर जावे लागले. त्यांना आवश्यक असणारी मदत आणि पैसे देण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. 


त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणी गावाजवळ असणाऱ्या धामारी ( तालुका शिरूर, जिल्हा पुणे) या गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले होते.  २५ ते २७ फेब्रुवारी १८७९ रोजी लोणी व खेड या गावात दरोडा टाकून लुटमार केली. ५ मार्च १८७९ रोजी जेजुरीजवळ वाढले गावात दरोडा टाकला. त्यांना चार बंदुका तीनशे रुपये शंभर रुपयांचे कापड मिळाले. 


यानंतर त्यानी सरकार विरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी जोरदारपणे सुरू केली.  त्यांनी पुणे मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. वासुदेव बळवंत फडके अक्कलकोट स्वामी समर्थांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले. पण त्यांनी ही वेळ नाही असे सांगून त्यांना निराश केले. फडक्यांनी मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. त्यामध्ये मातंग रामोशी धनगर कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण मुले संघटित करून घेतली. व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देउन आपल्या सैन्यात भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून वासुदेव पळून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालविला होता. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता पुणे शहरावर कब्जा मिळवला होता. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालिला यश मिळाले नाही. आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला घानूर गावातील झालेल्या हातोहात लढाई झाली. या लढाईनंतर भारतीयांत फितूरी लावण्यासाठी सरकारने वासुदेव बळवंत फडके यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले. याच बरोबर त्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षीस प्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्या बदल त्यांनी इनाम जाहीर केले. या लढाईनंतर फडके अरब व रोहिल्याकडून मदत मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानात गेले. तेथील निजामाच्या सेवेत असलेल्या अब्दुल हक आणि मेजर हेन्री विल्यम्स डॅनियेल या अधिकाऱ्यांनी फडक्यांचा पिच्छा पुरवला आणि त्यांना परत महाराष्ट्रात पळून जाण्यास भाग पाडले.


 फडक्यांचा मुंबईमधील अर्धपुतळा (Immage Secure By - wikipedia.org)

धरपकड खटला आणि मृत्यू - 


जुलै २३, इ.स. १८७९ रोजी विजापूर  जवळील देवर नावलगी या गावच्या बाहेर एका बौद्ध विहारांमध्ये गाढ झोपेत असताना त्यांना इंग्रज सैनिकांनी अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना पुण्यामध्ये तुरुंगात ठेवले. तेथे अत्याचार करून त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले. व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले. फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. फडक्यांना येमेन देशातील एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार करण सकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. पण काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले. तेथे आपल्याला मिळत असलेल्या फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांचा मृत्यू फेब्रुवारी 17 883 रोजी मृत्यू झाला. 


  अशा प्रकारे इंग्रजांनी पहिल्या सशस्त्र क्रांतीचे बंड मोडून काढले. अनेकांना आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांचे कार्य माहिती नाही. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पुण्यावर काही काळ त्यांच्या सशस्त्र सैनिकांचा ताबा होता.


धामारी शिरूर येथील ज्या वाण्याच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकला होता तो दरवाजा आणि घर,दुकान आजही तसेच आहे. त्या दरवाज्यावर घातलेले कुऱ्हाडीचे घाव आजही पाहायला मिळत आहेत. परंतु ही वस्तु ऐतिहासिक वारसा म्हणून जातं करणे आवश्यक आहे. गावतील लोकांचे आणि स्थानिक प्रतिनिधी यांचे इकडे दुर्लक्ष झाले आहे.








Post a Comment

0 Comments

close