पुण्यातील खाजगी रुग्णालयांत मोफत उपचार कसे मिळवायचे? जाणून घ्या धर्मादाय रुग्णालयांची यादी आणि नियम!
How to get free treatment in private hospitals in Pune? Know the list and rules of charitable hospitals
पुणे : पुणे हे वैद्यकीय सेवेचे केंद्र मानले जाते, मात्र मोठ्या रुग्णालयांचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. पण तुम्हाला माहिती आहे का? पुण्यातील अनेक नामांकित खाजगी रुग्णालये 'धर्मादाय' (Charity) अंतर्गत येतात, जिथे गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे.
काय आहे हा नियम? 'महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमा'नुसार, धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या एकूण खाटांपैकी २०% खाटा राखीव ठेवणे बंधनकारक आहे:
१०% खाटा: निर्धन रुग्णांसाठी (पूर्णपणे मोफत उपचार).
१०% खाटा: दुर्बल घटकांसाठी (सवलतीच्या दरात उपचार).
पुण्यातील धर्मादाय अंतर्गत येणारी काही प्रमुख रुग्णालये खालीलप्रमाणे आहेत:
१. प्रमुख मल्टी-स्पेशालिटी रुग्णालये :
रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) : ससून रोड, वानवडी आणि हिंजवडी.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Deenanath Mangeshkar Hospital) : एरंडवणे.
जहांगीर हॉस्पिटल (Jehangir Hospital) : पुणे स्टेशनजवळ.
पुना हॉस्पिटल (Poona Hospital & Research Centre) : नवी पेठ.
सह्याद्री हॉस्पिटल (Sahyadri Hospital) : कर्वे रोड, डेक्कन आणि इतर शाखा.
संचेती हॉस्पिटल (Sancheti Hospital) : शिवाजीनगर (अस्थिरोगासाठी प्रसिद्ध).
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल : चिंचवड.
इनलॅक्स अँड बुधराणी हॉस्पिटल: कोरेगाव पार्क.
भारती हॉस्पिटल (Bharati Hospital) : कात्रज.
२. इतर महत्त्वाची धर्मादाय रुग्णालये :
के.ई.एम. रुग्णालय (KEM Hospital) : रास्ता पेठ.
Hardikar Hospital : गणेशखिंड रोड.
Noble Hospital : हडपसर.
Inamdar Hospital : फातिमा नगर.
माणिकचंद धारीवाल हॉस्पिटल : शिरूर.
पुरूषोत्तम शास्त्री नानल हॉस्पिटल : कर्वे रोड.
सवलतीसाठी पात्रता (Eligibility Criteria) :
महत्त्वाची कागदपत्रे :
या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णाकडे खालीलपैकी एक पुरावा असणे आवश्यक आहे:
तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला.
किंवा पिवळे / केशरी रेशनकार्ड.
आधार कार्ड.
मिळणाऱ्या सवलती :
१. निर्धन रुग्ण (Indigent Patients): ज्यांचे वार्षिक उत्पन्न १.८० लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना पूर्णपणे मोफत उपचार मिळतात.
२. दुर्बल घटक (Weaker Section): ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३.६० लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना बिलामध्ये ५०% सवलत मिळते.
खाटांची उपलब्धता कशी तपासायची ?
रुग्णालयात खाटा शिल्लक आहेत की नाही, हे तुम्ही धर्मादाय आयुक्तालयाच्या अधिकृत वेबसाईटवर (charity.maharashtra.gov.in) जाऊन रिअल-टाइममध्ये पाहू शकता.
तसेच स्वत: रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करू शकत आहेत.

0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH