Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रेरणादायी प्रसंग : पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे मोठेपण



 प्रेरणादायी प्रसंग  : पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे मोठेपण

Immage Secure By - Google 


भारताचे दुसरे पंतप्रधान मा.लालबहादूर शास्त्री हे साधेपणा आणि महानतेचे प्रतिरूप होते. त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या महानते  संबंधित अनेक विषय आहेत. त्यातून सध्याच्या तरुण पिढीला आणि राजकारण्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. चला तर पाहूया नक्की त्यांच्या आयुष्यातील एक साधी पण अनोखी प्रेररणादायी घटना.


                                                                         Immage Secure By - Wikipidiya 

जेव्हा लालबहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान होते. आणि ते त्या पदावर कार्यरत होते. त्यांच्याबद्दल आपण ही माहिती जाणून घेणार आहोत.  एक दिवस ते कापडाच्या गिरणी मध्ये गिरणी पाहण्यासाठी गेले होते. त्यांच्यासमवेत त्या गिरणीचे  मालक, पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी, स्थानिक अधिकारी आणि इतर प्रतिष्ठित लोक होते. गिरणी पाहिल्यानंतर शास्त्रीजींनी गिरणीच्या गोदामाची पाहणी केली. गोदामात पोहोचले आणि त्यांनी गिरणी मालकाला साड्या दाखवायला सांगितले. गिरणीमालक यांनी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि अधिकारी यांच्यासमोर सुंदर साड्या उघडून दाखवायला सुरुवात केली. त्या  काळच्या किमतीनुसार त्या सार्‍या खूपच महागड्या होत्या. साड्या पाहून शास्त्रीजी म्हणाले साड्या खूप चांगल्या  आहेत. त्यांची किंमत काय आहे.? अर्थात मूल्य काय आहे? गिरणी मालकांनी साड्यांची किंमत सांगितली. एका साडीची किंमत 800 रुपये आणि 1000 रुपये आहे. ही किंमत ऐकून शास्त्रीजी म्हणाले - या साड्या खूप महाग आहेत. मला कमी किमतीच्या साड्या दाखवा.


Image Secure By - Wikipidiya 


 येथे लक्षात ठेवण्यासारखे आहे, की ही घटना 1965 आहे जेव्हा एक हजार रुपयाची किंमत खूप जास्त होती.

हो, हे बघा ही 550  रुपये किमतीची असून आणि ही साडे 400 रुपये किमतीची आहे. अशी माहिती गिरणी  मालकाने इतर साड्या दाखवताना शास्त्रीजींना सांगितले.अरे भाऊ ह्या देखील खूप मौल्यवान साडया आहेत. माझ्यासारखा गरिबाला कमी किमतीच्या साड्या दाखवा. ज्या मी विकत घेऊ शकतो असे शास्त्रीजी म्हणाले.वा सरकार, तुम्ही आमचे  पंतप्रधान आहात. तुम्ही गरीब कसे आहात ? आम्ही तुम्हाला साड्या भेट देत आहोत गिरणीवाला सांगू लागला.नाही भाऊ मी भेट घेणार नाही.असे शास्त्रीजी मी स्पष्टपणे नकार देत त्यांना सांगितले.का सर, आमच्या पंतप्रधानांना भेट देण्याचा आम्हाला अधिकार आहे. गिरणी मालकाने अधिकारवाणीने शास्त्रीजींना सांगितले. होय मी आपला पंतप्रधान आहे असं शास्त्रीजींनी शांतपणे उत्तर दिले.  पण याचा अर्थ असा नाही,की ज्या गोष्टी मी विकत घेऊ शकत नाही. त्या गोष्टी मी माझ्या बायकोला भेट द्याव्या.  भाऊ मी पंतप्रधान आहे.  पण मी गरीब माणूस आहे. आपण मला फक्त स्वस्त किमतीच्या साड्या दाखवू शकता. मला फक्त माझ्या परिस्थितीनुसार, गरीबी नुसार साड्या विकत घ्यायच्या आहेत.  त्याचे मूल्य  मी तुम्हाला देऊ शकतो. गिरणी मालकाने पंतप्रधान शास्त्रीजीचे मन वळवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. परंतु देशाच्या पंतप्रधानांनी योग्य ती किंमत देऊन त्या साड्या  विकत घेतल्या. 



                                                                   Image Secure By - news1india.in

शास्त्रीजीना  ना कोणताही लोभ स्पर्श करू शकला नाही. असे पंतप्रधान आपल्या देशाला लाभले म्हणजे हे सर्व भारतीयांचे भाग्यच म्हणायचे. असा देशभक्त पंतप्रधान पुन्हा होणे नाही.


Post a Comment

0 Comments

close