Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ त्यांची कामे आणि त्यांचा पगार

 छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ त्यांची कामे आणि त्यांचा पगार

 


छत्रपती शिवाजी महाराज



Chhatrapati Shivaji Maharaj's Ashta Pradhan Mandal His work and his salary




शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी कानुजपता घालून दिला होता. कानूजपता म्हणजे राज्यकारभार या विषयी माहिती सांगणारा तक्ता. या कानुजपत्याप्रमाणे महाराजांनी अष्टप्रधान यांची नेमणूक केली होती. व त्यांनी करायमची कामे निश्चित केली होती. अष्टप्रधान मंडळात कोण कोण होते? आणि त्यांची कामे आणि त्याला किती पगार होता? 


आपण आता हे सर्व सविस्तरपणे ते पाहूया - 


१) पेशवा (उर्दू) - मुख्यप्रधान (संस्कृत) - अधिकारी

मोरोपंत पिंगळे

स्वराज्याचे पेशवे होते मोरोपंत पिंगळे शिवाजी महाराजांच्या

गैरहजेरीत स्वराज्याचा राज्यकारभार यांनी पहावा. सेना घेऊन

नित्यनवीन प्रदेश घेण्याचा प्रयत्न करावा. नेमून दिलेल्या प्रदेशाचा

कारभार करावा. शत्रूची बातमी काढून त्यांचा पराभव करावा.

सर्वांशी समान बुद्धीने सर्वांच्या अनुमतीने वागून कोणाशी द्वेषबुद्धी

करता सर्वांना घेऊन चालावे. शिवाजी महाराजांकडून सही

होऊन आलेल्या पत्रांवर आपली सही करावी. या मुख्य प्रधानाचा

पगार होता वर्षाला १५००० होन.


२) मुजुमदार म्हणजे अमात्य महसूल मंत्री -  


स्वराज्याचे महसूल मंत्री होते नारो नीळकंठ व रामचंद्र नीलकंठ

यांनी सर्व राज्यातील उत्पन्नाचा व खर्चाचा जमा खर्च पहावा.  हे काम दप्तरदार फडणीस यांच्या कडून करून घ्यावे. फडणीस चिटणीस यांच्या पत्रांवर आपली सही करावी. लष्कराच्या अधिपत्य करून युद्ध करावे. छत्रपती शिवाजी महाराज जो प्रदेश नेमून देतील तेथील त्याचा कारभार दक्षतेने करावा. महसूल मंत्र्यांना वार्षिक पगार होता १२००० होन.


३)  सेनापती म्हणजेच सेनाप्रमुख - हंबीरराव मोहिते

      जे होते हंबीरराव मोहिते संपूर्ण सेनेचे रक्षण यांनी  करावे. सैनिकांचे
वेतन वेळच्यावेळी देण्याचे काम यांचे होते. सेनेचे पराक्रम गाजवत
त्यांचा गौरव छत्रपतींची मंजुरी घेऊन छत्रपतींच्या हस्ते करावा. त्यांना
छत्रपतींनी करवी मान सन्मान आणि  बक्षिसे द्यावेत. सेनेचे अधिपत्य
करून युद्धादि प्रसंग करावें. स्वराज्याचा सेनापतींना पगार होता वर्षाला
१००००  होन.


४) सुरणीस म्हणजे सचिव -  अण्णाजी दत्तो


राज्य पत्रव्यवहार प्रमुख जे होते अण्णाजी दत्तो. यांनी छत्रपतींचा सर्व पत्रव्यवहार स्वतः पहावा त्यात कमी-अधिक अक्षर असतील त्याचा शोध करू त्याला नीट करावे. तसेच महाल परगणे यांच्या हिशोबाची तपासणी करावी. राजपत्रावर संमत असे लिहावे.  युद्धप्रसंग करून घेतलेल्या मुलखाचा कारभार करावा.  स्वराज्याच्या सचिवांना पगार होता वर्षाला १०००० होन. 


५) वाकनिस म्हणजे मंत्री - दत्ताजी त्रिंबक


राज्य दप्तरदार व खासगी सल्लागार जे होते दत्ताजी त्रिंबक. यांनी राज्याच्या राजकीय व राजनैतिक बाबी संभाळाव्यात. परराज्याच्या भागातून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करावे. शिवाजी महाराजांची दिनचर्या लिहुन त्यांनी केलेल्या कार्याची नोंद ठेवावी. छत्रपतींच्या भोजनातील पदार्थाची तपासणी यांनी करावी. राज्य कार्याविषयी दक्ष राहून युद्धादि प्रसंग करावें. राजपत्रावर संमत चिन्ह करावें.स्वराज्याच्या मंत्र्यांना पगार होता वर्षाला १०००० होन.


६) पंडितराव, राजपुरोहित म्हणजे धार्मिक व सांस्कृतिक कार्य प्रमुख -  


रघुनाथ पंडित यांनी सर्व धार्मिक बाबींवर अधिकार चालवावा आणि काम पहावे. दरबारात आलेल्या पंडीत विद्वान ब्राह्मण यांचा सन्मान करावा. राज्यातील अपराध्यांना शिक्षा करावी. समाजातील परंपरा आचार-विचार प्रायश्चित्त संबंधीच्या पत्रांवर सह्या कराव्या व संमत चिन्ह करावें. स्वराज्याचा पंडितरावांना पगार होता वर्षाला १०००० होन.


७)  न्यायाधीश - निराजी रावजी -  


जे होते निराजी रावजी राज्यातील सर्व प्रकारच्या खटल्यांवर अधिकार चालवावा. खटल्यात धर्म अधर्म पाहून अपराध्यास शिक्षा करावी. न्यायाच्या निवड पत्रांवर संमत चिन्ह करावें. छत्रपतीच्या चारित्र्याला दोष लागणार नाही अशा निपक्षपातीपणे न्याय करा. स्वराज्याचा न्यायाधीशांना पगार

होता १०००० होन.


) डबीर, सुमंत म्हणजे विदेश मंत्री  - रामचंद्रपंत सोनदेव 


 जे होते रामचंद्रपंत सोनदेव यांनी परराष्ट्र व्यवहार पहावा. राज्यातील राजकारणावर लक्ष ठेवावे परराज्यातील वकील येतील तेव्हा त्यांचे स्वागत करावे. व त्याची बडदास्त राखावी परराज्यातील राजकारणी छत्रपतीला निवेदन करावे. युद्धादि प्रसंग करावें आणि राजपत्रावर संमत चिन्ह करावें. या विदेश मंत्र्यांना पगार होता १० हजार होन.




शिव राज्याभिषेक सोहळा 



◆ स्वराज्याचे चिटणीस - 


शिवाजी महाराजांचे चिटणीस म्हणजे सामान्य अधिकारी नव्हते. राजदरबारात यांना प्रदाना सारखाच मान सन्मान दर्जा होता. किंबहुना ते प्रधानाहून अधिक राजाच्या खास विश्वासातील समजले जात होते. बाळाजी आवजी प्रभू हे महाराजांचे चिटणीस होते. त्यांची हुशारी व कार्यक्षमता पाहून महाराजांनी त्यांना अष्टप्रधान मंडळातील पद देऊ केले होते. परंतु बाळाजी आवजी ते नाकारले होते. राजांचा खास पत्रव्यवहार आणि राज नैतिक पत्रव्यवहार लिहिण्याचे काम त्याच्या मित्रांकडे होते. आणि त्याबद्दल त्यांना चिटणीशी वतन राजांच्याकडून मिळाले होते.



◆ प्रत्येक कार्यालयात त्याच्या हाताखाली अधिकारी असत.


१) दिवान,

२) मुजुमदार,

३) फडणीस,

४) सबनिस,

५ कारखानीस,

6) चिटणीस,

७) जामदार,

८) पोतनीस.


(चिटणीस याना ६००० होन पगार होता आणि फडणीस यांना ३००० होन पगार होता.)



         शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारातील पेशवा सेनापती पासून आणि खालच्या पातळीवरील शिपाई, कारकूनापर्यंत प्रत्येकाने आपला पगार धान्याच्या किंवा रोकड यांच्या स्वरूपात सरकारी खजिन्यातून आणि कोठारातून घ्यावा. असा महाराजांचा दंडक होता. पगाराची रक्कम निश्चित ठरलेली होती आणि ती नियमितपणे ठरलेल्या वेळी मिळत असे. 



छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळातील एकाही प्रधानाला जहांगीर दिलेली नव्हती. जहागीर पद्धतीत जहांगीरांस एखादा प्रांत दिला जातो. त्या प्रांतातून आलेला महसूल तोच घेतो. त्या बळावर सैन्य स्थापन करून त्या प्रांतात आपले स्वतंत्र राज्य स्थापन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना हे संकट टाळायचे होते. म्हणून त्यांनी प्रधान किंवा अन्य कोणत्याही अधिकाऱ्याला जहागिरी दिली नाही. राज्याच्या महत्त्वाच्या कागदपत्रांवर प्रधान मंडळातील महत्त्वाच्या साह्या व्हाव्या लागत असे. सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांवर मुख्य प्रधान, अमात्य, सचिव, मंत्री, सुमंत यांच्या सह्या व्हाव्या लागत असे.ही महत्त्वाची पद्धत महाराजांनी रूढ केली होती. याचे कारण उघड होते महत्त्वाचे निर्णय घेताना चुका होऊ नये. अधिकाराची जाणीव होऊन तो निर्णय घ्यावा. अशा प्रकारे राज्य कारभार कार्यक्षम व्हावा म्हणून महाराजांनी प्रथा पाडली होती.  शिवाजी राजांनी निर्माण केलेल्या राज्य कारभार केंद्रस्थानी स्वतः च छत्रपती होते. प्रधान त्यांच्या खात्यातील लहान-मोठी अधिकारी अठरा कारखाने बारा महाल, सरसुभेदार, पायदळ, घोडदळ व आरमार या तिन्ही दलातील लहान-मोठे लष्करी अधिकारी व ठेवणारी चिटणीस किल्लेदार इत्यादी मिळवून राज्यात एक मोठी कारभारी यंत्रणा उभी राहिली होती. या यंत्रणेची कार्यक्षमता बऱ्याच प्रमाणावर छत्रपतीच्या कर्तबगारीवर अवलंबून होती. छत्रपतींच्या हाती सर्व प्रकारचे अंतिम अधिकार होते. त्यामुळे छत्रपती म्हणजे राज्यकारभाराच्या यंत्रणेचा कणा समजले जात होते.



अशा प्रकारे आपण छत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळाची अर्थात राज्य कारभार पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती घेतली आहे. माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला आहे. आपणास ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेन्ट करा. ही माहिती आपणांस आवडली तर नक्कीच Share करा. 






Post a Comment

0 Comments

close