शेतात जाण्यासाठी रस्ता मागणी अर्ज नेमका कसा करायचा?
स्वातंत्र्य काळानंतर भारताची जमिनीची जशीजशी विभागणी होत आहे. तसेच शेतरस्त्यांची मागणी सुद्धा जोर धरत आहे. आता आपण नवीन क्षेत्रात यासाठी नेमका अर्ज कसा करायचा आणि त्या साठी नेमकी कोणती कागदपत्र लागतात अर्ज करण्याची प्रक्रिया काय असते. याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
अर्ज असा करा -
शेतकऱ्याला स्वतःचे जमिनीमध्ये जाण्यासाठी अनेक वेळा रस्ता उपलब्ध नसतो. आणि असा रस्ता उपलब्ध नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ हवे नवीन रस्त्यासाठी रस्ता मागणी अर्ज करता येतो. हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्यांच्या बांधावर दिला जातो. यासाठी शेतकऱ्यांना तहसीलदारांकडे एक लेखी अर्ज करावा लागतो.
आता आपण पाहणार आहोत, सोप्या भाषेत हा अर्ज कसा लिहायचा ते पाहूया.
प्रति,
मा. तहसीलदार साहेब,
शिरूर, तालुका शिरूर,
जिल्हा - पुणे
अर्ज - महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 मी शेत रस्त्यासाठी अर्ज करत आहे.
विषय - शेतात जाणे येण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरूपी रास्ता मिळणेबाबत.
नाव - श्री. रामदास बबनराव सोनडूले
मौजे - धानोरी, तालुका शिरूर,
जिल्हा - पुणे.
गट क्र. १०५, क्षेत्र - २.५ हे, आकारणी - ३.७० रुपये
(कर रक्कम)
लगतच्या शेतकरी यांची नावे आणि पत्ता -
तिकडे अर्जदाराच्या शेती म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण दिशेला ज्या शेतकऱ्यांची जमीन असते. त्यांची नाव आणि पत्ता लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर मायना मध्ये तुम्ही असे लिहू शकत आहे.
मी श्री. रामदास सोनडूले राहणार धानोरी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील कायम रहिवाशी आहे धानोरी येथील गट क्रमांक १०५ मध्ये माझ्या मालकीची २.५ हेक्टर आर शेत जमीन आहे. सदरच्या शेत जमिनीमध्ये जाण्या-येण करण्यासाठी गाव नकाशावर रस्ता नाही. त्यामुळे शेतामध्ये बैलगाडी ट्रॅक्टर आणि इतर वाहन तसेच शेती अवजारे बी बियाणे आणि रासायनिक खाते अस नेहमी अडचण निर्माण होत असते आणि होत आहे. तसेच शेतातील ऊस, मका, तूर, उडीद ,मूग, गहू, हरभरा घरी घेऊन येण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
तरी मौजे धानोरी तालुका शिरूर येथील गट क्रमांक १०५ मधील पूर्व-पश्चिम बाजूच्या हत्तीवरून गाडी बैल शेतात नेणे व घरी आणणे करता येईल असा कायमस्वरूपी शेत रस्ता मंजूर करण्यात यावा अशी विनंती मी आपणास करत आहे.
आपला विश्वासू
रामदास सोनडुले
वरीलप्रमाणे माझ्या नावाचा मी अर्ज तयार करून हा फक्त नमुना तुमच्यासाठी उपलब्ध केलेला आहे. तरी या अर्जात शेतकऱ्यांनी आपली स्वतःची माहिती लिहून भरणे अपेक्षित आहे.
वरील प्रमाणे संपूर्ण अर्ज भरून झाला की या अर्जासोबत पुढील महत्त्वाचे कागदपत्रे जोडावी लागतात. त्याची यादी आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत.
१ ) अर्जदाराच्या जमिनीच्या आणि लगेच या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या जमिनीचा कच्चा नकाशा.
२ ) अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील तीन महिन्याच्या आतील सही शिक्क्याचा सातबारा.
३ ) लग्नाच्या शेतकऱ्यांची नावे संपूर्ण पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा संपूर्ण तपशील.
४ ) अर्जदाराच्या जमिनीच्या यात काही वाद सुरु असेल तर त्याची कागदपत्रांत सहित संपूर्ण माहिती.
एखाद्या शेतकऱ्याने तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल केला कि त्या अर्जावर ती संबंधित आवक-जावक मधून सही शिक्का मारून पोहोच नक्की घ्यावी. तसेच एकदा का शेतकऱ्याने अर्ज दाखल केला की अर्जदार आणि ज्या शेतकऱ्याच्या बांदावरून रस्त्याची मागणी केली आहे. त्या सर्वांना नोटीस काढून त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येते. तसेच अर्जदाराला शेतात जाण्यासाठी खरोखरच रस्त्याची गरज किंवा आवश्यकता आहे, काय याची तहसीलदारांकडून प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करण्यात येते. ही प्रक्रिया पूर्ण झाली की तहसीलदार रस्ता मागण्याच्या अर्जावर निर्णय देतात. आणि त्या संबंधित योग्य ते आदेश पारित करतात. एक तर ते रस्ता मागण्याचा अर्ज मान्य करतात किंवा नाकारतात. अर्ज मान्य केल्यास लगतच्या शेतीच्या बांधावरून रस्ता देण्याचा आदेश पारित केला जातो. त्यावेळेस लगतच्या शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल असं पाहिलं जातं.
सामान्यपणे ८ फूट रुंदीचा रस्ता मंजूर केला जातो. म्हणजे एका वेळेस एक बैलगाडी जाऊ शकेल इतका रस्ता मोजून मापून दिला जातो. पण तहसीलदारांचा आदेश शेतकऱ्याला मान्य नसेल.तेंव्हा आदेश प्राप्त झाल्याच्या ६० दिवस म्हणजे दोन महिन्याच्या आत विभागीय अधिकार्यांकडे अर्थात प्रांत कडे अपील दाखल करता येते. किंवा एका वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात योग्य कागदपत्र सादर करुन दावा दाखल करता येतो.
अशाप्रकारे आपण शेत रस्त्यासाठी अर्ज कसा करावा त्याचा अर्जाचा नमुना आणि त्या सोबत आवश्यक ती कागदपत्रे कोणती जोडावीत आणि रस्त्याचा आदेश पारित झाल्यानंतर किंवा झाला नाही ते कोठे अपील करावे. या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिली आहे. आपणास आमची माहिती कशी वाटते आहे, नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा.
धन्यवाद !!!
0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH