मुंबई मायानगरीतील रेल्वे प्रवास — अस्वस्थ व्यक्ती आणि माया हरवलेले समाजभान
आज मी एका कामासाठी विरारहून चर्चगेटला जाणारी लोकल पकडली. वेळ कुठलीही असो, विरार–चर्चगेट लोकल नेहमीच गर्दीने भरलेली असते. जिकडे पाहावे तिकडे माणसांचा गराडा. मला कसेबसे दोन बाकांच्या मध्ये उभे राहण्यासाठी जागा मिळाली.
माझ्या शेजारीच पांढरे शुभ्र कुर्ते घातलेले, वाढलेल्या दाढ्या पण मिश्या नसलेले, शांततेचा संदेश देणारे तीन गृहस्थ उभे राहिले. मी प्रवासादरम्यान मन शांत ठेवण्यासाठी मोबाईलमध्ये 'बजरंग गाणे' ऐकत होतो.
मी पाठमोरा उभा असताना, अचानक बाकाच्या कडेला बसलेल्या व्यक्तीचा पाय मला लागला. मी मागे वळून पाहिले आणि धक्का बसला! तो गृहस्थ डोळे उघडे ठेवून दोन बाकांच्या मधल्या मार्गावर इतके झुकले होते की क्षणभरात खाली पडतील की काय असे वाटले. सुरुवातीला वाटले झोपले असावेत; पण उघड्या डोळ्यांनी कोण झोपेल? काहीतरी वेगळे आहे हे जाणवले. गंमत म्हणजे त्याच अवस्थेत ते गेली पाच मिनिटे होते, आणि त्यांचा पाय लागल्यानेच माझे लक्ष गेले.
प्रसंग गंभीर वाटू लागला, पण डब्यातील बाकीच्यांकडे पाहिले तर सगळे फक्त बघ्याच होते; कोणीही काही बोलायला तयार नव्हते. मी तातडीने त्या गृहस्थांना हात लावून विचारले, “दादा, तुम्हाला बरं वाटत नाहीये ना? मदत हवी आहे का?” पण त्यांनी काही उत्तर दिले नाही, फक्त शून्य नजरेने बघत राहिले.
क्षणातच त्यांचे शरीर घामाने चमकत होते. घामाचे थेंब त्यांच्या हातांच्या बोटांतून खाली पडत होते. मला काय करावे कळेना! मी लोकांकडे पाण्याची बाटली मागितली, पण दुर्दैवाने कोणाकडेच पाणी नव्हते.
तेवढ्यात अंधेरी स्टेशनवर चढलेल्या एका दयाळू काकांनी माझा आवाज ऐकला आणि त्वरित त्यांची बाटली माझ्याकडे दिली. मी त्यांना पाणी पाजले; थोड्याच वेळात त्यांना थोडा दिलासा मिळाला. नंतर डब्यातील लोकांना सांगून त्यांना खिडकीजवळ बसवले. शर्ट काढल्यावर दिसले की आतले बनियन घामाने पूर्ण भिजले होते.
थोड्याच वेळात ते बोलू लागले. विचारपूस केल्यावर त्यांनी सांगितले की त्यांचा छोटा मुलगा आणि पत्नी पुढच्या डब्यात आहेत. मी फोन करायला सांगितले, पण ते म्हणाले, “नको, उगाच ते घाबरतील.” त्या क्षणी मला एक वडिलांची आणि पतीची जबाबदारी काय असते हे जाणवले — स्वतः त्रास सहन करूनही कुटुंबाला त्रास नको म्हणून प्रयत्न करणारा माणूस!
दादर स्टेशनला उतरायचे असल्याने मी त्यांच्यासोबत उतरलो. त्यांच्या पत्नीला भेट घडवून दिली आणि संपूर्ण प्रसंग सांगितला. त्यांना रेल्वेच्या मदत केंद्रात जाऊन डॉक्टरांकडून तपासून घेण्यास सांगितले.
या घटनेतून शिकलेला बोध
दुर्दैवी निष्क्रियता: अशा प्रसंगी बहुतांश लोक दुसऱ्यांच्या मदतीला पुढे यायला कचरतात. या निष्क्रियतेमुळेच अनेक जीव धोक्यात येतात. आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे तरी तत्काळ करायला हवे.
माझा संताप: प्रसंग शांत झाल्यावर त्या पांढऱ्या कुर्तेवाला तिघांपैकी एकाने आपल्या बॅगेतून पाण्याची बाटली काढली आणि स्वतः पाणी प्यायला सुरुवात केली. त्यावेळी मात्र माझ्या मनात संताप उसळला!
असो, मी माझे कर्तव्य पार पाडले. बाकी मारुतीराय सर्व पाहतील.
व्यक्तीचे नाव : अनिल घरत, सफाळे (ते आता सुखरूप आहेत)
लेखक : श्री. अशोक शिंदे
ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
दिनांक : शनिवार, १ नोव्हेंबर २०२५


1 Comments
Nice 👌
ReplyDeletePOLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH