मल्टी लेव्हल मार्केटिंग (MLM) कंपनीच्या ऐजेंटांचा मित्र आणि नातेवाईकांच्या पैशांवर डल्ला
Multi-level marketing

Image secure : facebook
नमस्कार, साधारण सण १९९७, ९८ ची गोष्ट आहे. मी नुकताच कॉलेज सोडून जॉबला जॉईन झालो होतो. तरुण वयात पैसा, गाडी, बंगला आणि उच्च राहणीमान याच आकर्षण प्रत्येकालाच असते, अगदी तसच मला पण आकर्षण होतच. मोठं व्हायचं पैसा कमवायचा, गाडी, बांगला, नाव, प्रसिद्दी, मानपान आणि मग ऐष, आराम, परदेश गमन वगैरे वगैरे.
मी असाच कामावरून घरी आलो होतो. तेव्हा शेजारचा एकजण माझ्याकडे आला होता. तो अडाणी होता पण फायदा तोटा जाणुन तसा तो हुशार होता. तो मला म्हणाला आपल्या घरी आज महत्वाची मिटिंग आहे. एका कंपनीची पुण्यातून मोठी साहेब लोकं आली आहेत. तू सायंकाळी सहा वाजता नक्की ये. पुढे त्याने मला सांगितलं की काहीतरी व्यवसाय, धंदा सांगणार आहे. आपण ठरविलं होत मोठं व्हायचंय ना मग आपणाला गेलं पाहिजे.
कधी कधी कौटुंबिक परिस्थिती अशी असते की आपण आपसकूच तिकडे पाऊल टाकत असतो. कारण वय तसेच असते म्हणजे १० वी आणि १२ वी नंतरच. असेच माझ्या बाबतीत झाले. मी गेलो ना तिकडे बंगल्याच्या टेरेसवर मस्त चटई टाकली होती. चहा झाला आणि मग भव्यदिव्य असा पैसे कमविण्याचा तथा सदस्य, मेंबर बनवून वस्तू विकण्याचा धंदा सांगितला होता. मला त्यातलं एक आवडलं आणि त्यांनी तसं मनावर ठसविले होते. ते म्हणजे स्वदेशी वस्तू विकून देश सेवा करायची. पण नंतर कळालं ते मृगजळच होत.
तेंव्हा पी. व्ही. नरसिंह राव हिंदुस्थानचे पंतप्रधान होते. अमेरिकेच्या दबावाखाली त्यांनी गॅट करार म्हणजे जागतिक व्यापार खुला करून जागतिकीकरण केलं होतं. त्यामुळेच देशात स्वदेशी केलं पाहिजे असा प्रचार सुरु झाला होता. मग तेंव्हा आम्हाला स्वदेशी हा देशी ब्रँड विक्रीचा प्लॅन सांगितला होता. बक्कळ पैसे आणि आर्थिक फ्रीडम बस असे भरपूर काही सांगितले होते.
Immage By - thepastbastard.com
मग झालं काय ?
मी पैसे भरुन स्वदेशी मध्ये सामील झालो. अनेक हॉटेल्स काय पार स्टेडियमवर Metting व Plan केपण तरीही पुढील काही Business आणि वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून चालणार नाही.
चला तर पाहू यश कोणत्या कंपन्या बाजारात आल्या होत्या -
१) पिअर्लेटच,
२) नेटसर्फस,
३) संमृद्धी,
४) एन टी मार्ट,
५) One नेटसर्फ,
६) मॅग्नेट गादी,
७) ससे पालन
८) शेअर्स मार्केट तळेगाव ढमढेरे,
९) मंजू एजेंशी,
१०) एक समृद्धी जीवन,
११) मैत्रीय,
१२) माझा कल्पवृक्ष,
१३) पल्सर one .. आपण यादी काढली तर हजारो कंपनीच्या नावांची यादी तयार होईल. सन १९९५ ते २०१० पुढे आजपर्यंत अनेक कंपन्या आल्या आहेत. त्यांची नावे पण वेगळी आहेत. तेंव्हा अनेक योजना आल्या आणि बंद सुद्धा झाल्या आहेत. त्याचबरोबर नवीन योजना नवीन माणसं भविष्यात आणतील आणि आता आल्या पण असतील आणि त्या गेल्या पण असतील.
'Scam Company' असे इंटरनेट वर सर्च केले तर समोर हजारो नावे येतील. त्यात लाखो लोकांचे करोडो रुपये फसलेत. तरी लोकांचं डोळे उघडत नाही. उलट त्यांचं समर्थन करायला पुढे येतील. कारण लालसा मोह आवरता येत नाही.
पैसे कमवायला जवळचा ( shortcut ) मार्ग नसतो हे तरुण मुलांना माहीत नसते. यामध्ये तरुण मुले फसतात. कारण त्यांना व्यवहार ज्ञान आणि सामाजिक आर्थिक व्यवहार यांची जाण नसते.
माझ्या जवळच्या एका कंपनीत पाच जण २० वर्षापासून ऍमनवे करत आहे. पण त्यांनी सुद्धा अजून काम करत असलेली कंपनीची नोकरी सोडलेली नाही. कारण त्यांना पगारा इतका सुद्धा MLM Company मधून Income येत नाही. काहींनी तर हे business तथा धंदे कधी बंद केलं ते आम्हाला कळलंच नाही.
माझ्या अनेक कामगार सहकाऱ्यांनी पण अनेक MLM Compny join केल्या होत्या. आता त्यांचे अस्तित्व पण नाही. आता विचारले तर हसतात. हा..हा...हा. ह्या हास्यात स्वतःच स्वतःला फसविले आहे याचा दर्प असतो. या पलीकडे काय उरलं हातात ? पैसे बुडाले आणि वेळ पण फुकट गेला. कोणीही सध्या त्या संदर्भात चर्चा पण करत नाही.हा कटू अनुभव आला आहे हे समजून कळाले आहे. पण त्यांना हे कळायला दोन दशके लागली आहेत.
अगदी फ्री मध्ये जॉईन व्हा असे सांगितले जाते. मग गिफ्ट वाव्हचर, डिस्काउंट कुपन अशी लेबल पण लावली जातात. अशा प्रकारच्या कंपन्या जॉईन केल्या की प्रथमच भरमसाठ फी आकारली जाते. त्याच पैस्यातून आपणाला जेवण आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. त्यावर कढी म्हणजे पैसे भरून खास प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले की सदस्य झालेला माणूस हवेतच फिरत असतो. जसे की तो करोडोचा मालक झाला आहे.
साखळी पद्धतीच्या 'कंपनी जॉईन' करणारे किंवा करून घेणारे हे एकमेकांचे नातेवाईक असतात. ते प्रथम नातेवाईक, नंतर मित्र, मित्राचे मित्र, ओळखीचे, शेजारी - पाजारी आणि कामगार सहकारी यांना आपल्या जाळ्यात ओढतात.
शिवाय त्यांना अनोळखी व्यक्तीला कसे जॉईंट करून घ्यायचे असते. याचे नवीन मुलांना स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं. मग ते बसने प्रवास करताना सुद्धा ओळख करून जॉईन करून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच नातेवाईक असल्यामुळे लोकं त्यांच्यावर विश्वास ठेवतात. कधी कधी तर भावनिक ब्लॅकमेल सुध्दा करतात.
आणि म्हणतात - मी आहे ना !
माझ्यावर विश्वास नाही का?
काय झाले तर मी जबाबदार !
मी परत देईल तुझे सर्व पैसे मग तर झालं.
अशा बोलण्याने मग नातेवाईक, तरुण आणि रिटायर झालेले लोक फसतात.
मग नंतर कळते आपल्याला फसवून गंडविले आहे.
असे माझे जवळचे दोन तीन नातेवाईक माझ्याकडे आले होते. मी त्यांना सरळसरळ नाही असे सांगीतले. सुरुवातीला ते नाराज झाले होते. पण माझा पुढील धोका टळला होता.
मग नंतर कळते आपल्याला फसवून गंडविले आहे.
असे माझे जवळचे दोन तीन नातेवाईक माझ्याकडे आले होते. मी त्यांना सरळसरळ नाही असे सांगीतले. सुरुवातीला ते नाराज झाले होते. पण माझा पुढील धोका टळला होता.
हि लोकं अभिमानानं सांगतात,
आमची कंपनी हि 'रजिस्टर' आहे.
तसे तर सर्व कंपनी ह्या रजिस्टर असतात.
मग ती कसलीही कंपनी असुदे.
गेली १० वर्षे झाली काम चालू आहे.
आमचा प्लॅन खूप चांगला आहे.
एवढे लोक काम करतात.
इतकी स्थावर मालमत्ता आहे.
केंद्रीय सरकारची परवानगी आहे.
एवढे रिटर्न मिळालेत.
गेली १० वर्षे झाली काम चालू आहे.
आमचा प्लॅन खूप चांगला आहे.
एवढे लोक काम करतात.
इतकी स्थावर मालमत्ता आहे.
केंद्रीय सरकारची परवानगी आहे.
एवढे रिटर्न मिळालेत.
(लोकांचे घेऊन पुन्हा लोकांना वाटलेले )
हे पहा साहेबांचे धनादेशचे फोटो आणि त्याचे चित्र पण दाखवितात.
कोकण टूर, बालाजी टूर, जम्मू_काश्मीर टूर, गोवा ट्रीप बरोबर विमान प्रवासासह ३ Star, ५ Star हॉटेलच्या पार्टीचे प्रलोभन तर नित्याचेच झालेले असते.
आणि शेवटी तुम्ही लाखो रुपये कमविणार श्रीमंत होणार.
गाडी, बंगला, ऐषो आराम.
आणि मग काही दिवसांनी दाखवणार - हा पहा मला दर महिन्याला येणारा ......या रक्कमेचा धनादेश येत आहे.
आता तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह व्हाट्सएप, fb, zoom, google meet वर प्लॅन दिला जातो.
१) कंपनीचे मालक कोण आहे ?
२) तिचे संचालक कोण आहेत?
३) कंपनी कधी स्थापन झाली आहे?
४) कोठे स्थापन झाली आहे?
५) कंपनीचे CEO कोण आहेत?
हे जर विचारले तर त्यांना सांगता ते पण येत नाही. आणि विषय भलतीकडे घेऊन जातात. त्यांचं एकच उत्तर असते ते ZOOM मिटिंग करा. आमचा प्लॅन अटेंड करा. अहो पहिले Google Meet करा.
पुन्हा वरील प्रश्न विचारला तर करायचं असेल तर करा नाहीतर नका करू. पण मोटिव्हेशनल बोलत असतात कोट्यावधी रुपयांची स्वप्ने रंगवून सांगत असतात. स्वतःचा चेहरा न दाखवता आणि पत्ता, फोन नंबर आणि नातेवाईक न सांगता. नवनवीन माणसाला Treaning अस देतात की बस सर्व काही अगदी तुमच्या हातातच. हा त्यांना दिलेल्या Treaning चा परिणाम असतो. आणि आपण पण मग या स्वप्नात रमून जातो. आपणाला ते एजेंट Emotional_Black_Mailing करतात. आणि आपण कधी Join होतो आहे हे आपणास सुद्धा कळत नाही. आपण ते म्हणतात तसे काम करत फिरत बसतो. कारण सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे असले काम लवकर पटत असते. वगैरे वगैरे ??????
हा व्हिडिओ पहा - https://www.instagram.com/tv/CG6x1smBDdX/?igshid=1n1em160ct4qk
उदा. Osmos चे उदाहरणच पहा
Osmos बंद झाले आहे.
का ?
प्लॅन चांगला होता?
मग काय झालं?
लोकं ऐजेंटांच्या घरी वेढे का घालत आहे ?
कित्येक जण आयुष्यभराचे उद्वस्थ झाले. अनेकांनी फाशी घेतली आहे. कारण त्यांची आयुष्यभराची पुंजी नष्ट झाली होती. काहींच्या मुलींची लग्न पण मोडली आहे.
असल्या फ्रॉड कंपनीवर एक PHD करता येईल.
तुम्ही बोला, लिहीत व्हा. व्हायलाच पाहिजे.
आता ही नवीन जाहिरात पहा -
जर आपण व्हाट्सआप, फेसबुक, इन्स्टा, यूट्यूब वापरत असाल आणि आपल्याकडे फक्त 100 मित्र असतील तर आपली कंपनी पहिल्या महिन्यात 80,000/ -
दुसर्या महिन्यात 8,00,000 / - लाख,
तिसरा महिना - 8000000 लाख आणि नंतर
बीएमडब्ल्यू सह 6 लाख किमतीच सोनं
देईल -अमुक होईल - तमूक होईल.......
काय बोलावे...
भाऊ फसतात ना मुले ? असं कधी होत नसते.
आपण जॉईन होऊन आपला बहुमोल वेळ, पैसे व्यर्थ घालवू नये. शेवटी आपला निर्णय आपणच घ्यायचा असतो. कारण फायदा - तोटा आणि चांगलं - वाईट आपण जाणतोच आहे. मी हे स्वतः च अनुभवलं आहे. वय वर्षे २० ते ३० हा उमेदीचा काळ लोटला की अनुभव पाठीशी येतो. आज मी वयाची ४० पार करत आहे. म्हणून विचारात परिपक्वता आली आहे. आणि आई वडील यांनी जे चांगलं ते इतरांना सांगावं हे शिकवलं आहे. म्हणून हा पत्र प्रपंच करत आहे. काही लोक पातळी सोडून मत मांडतील हे त्यांचे संस्कार असतील. त्याकडे दुर्लक्ष करून पुढे चालायचं आहे.
काही व्यक्तीं तुमच्याकडे एजेंट, मध्यस्थी म्हणून येतील त्यांना खडसावून सांगा. आपण ५ वर्षानंतर नक्की नक्कीच भेटू या. हे तुमच्या नोंदवहीत लिहून ठेवा हं. आणि हो आताचे IT file Save करून ठेवा. पुढे आपल्या दोघांना file पडताळणी करून घेता येईल. तुमचा Income कसा आहे ? गाडी, बंगला, आणि उच्च राहणीमान? आपण हे तर पाहूच पाहू. हे तर जसे दिवस जातील तसे कळेलच आपोआपच.
मग तेव्हां ठरवू जॉईन व्हायचे की नाही ?
गेल्या ३६ वर्षाच्या व्यावहारिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये अनेकजण प्लॅन घेऊन आले आणि परत गेले. ते आहे तिथेच आहेत.
हो काही लोक यशस्वी होत असतील यात मला तरी शंका नाही.
पण दुसऱ्याच मुंडी पिरगळुनच ना. मग या गरिबांचा तळतळाट लई वाईट. हे ही मात्र दुर्लक्षित करून चालणार नाही.
मला कोणाला हे काम करण्यापासून परावृत्त करायचे नाही. मला त्यांना विरोधही करायचा नाही. असा कुठलाही हेतू तर माझा अजिबात नाही. तसा अधिकार मला तर मुळीच नाही. कोणी काय व्यवसाय करावा किंवा करू नये. याच स्वतंत्र भारतीय राज्य घटनेनं प्रत्येकाला दिलेले आहे.
● नाशिकचा एक (भाऊ) सिंगापुरला पळून गेला आहे.
● तळेगाव ढमढेरे, शिरूर, पुणे चा जितीश नरके हा गेली तिन वर्ष येरवडा जेल मध्ये होता. आता सुटला आहे पुणे शेषन कोर्टात केस चालू आहे.
● शिक्रापूर शिरूर पुणेची मंजुश्री एजेंशी अर्ध्या किमतीत वस्तू देणार म्हणून गठुड घेऊन पळाली आहे.
● सासवड पुरंदर पुणेची ससे पालन योजना राबविणारे कर्नाटकमध्ये पळून गेले तपास लागत नाही.
● आता Stock मार्केटच्या वेगवेगळ्या कंपन्या येत आहेत आणि काही येऊन गेल्या आहेत.
अशा अनेक योजना आहेत त्या लिहीत नाही. आणि आपल्या भागात पण वेगवेगळ्या फसवणुकीच्या घटना घडल्या असतील.
पण या सगळ्यांच काय करायचं ?
कोण जाब विचारणार?
कोण जबाबदार?
सरकार कि समाज?
का तरुण पिढी?
सध्याची बेरोजगारी?
सध्याची System?
कोण जाब विचारणार?
कोण जबाबदार?
सरकार कि समाज?
का तरुण पिढी?
सध्याची बेरोजगारी?
सध्याची System?
की सध्याची शिक्षण व्यवस्था?
उत्तर आहे का तुमच्याकडे?
नाही....
नाहीच ना !
उत्तर आहे का तुमच्याकडे?
नाही....
नाहीच ना !
नसेलच.
आपला तरुण वर्ग यात फसतोय बघा.
वेळ, पैसा, आणि शक्ती वाया जाते आहे.
पण समोरच्याला काही देणंघेणं नाही.
कारण स्वतःचा फायदाच बघायचं या पलीकडे विचार त्यांनी कधी केला नाही.
जे लोक असे MLM करत असतील लेख वाचून काही त्या लोकांचा तोल जाईल. ते अपशब्द वापरतील तर मी देवाला प्रार्थना करतो की त्यांना माफ कर आणि सुबुद्धी दे म्हणून.
मला त्यांची कीव येत आहे. कारण फक्त आपण चर्चा करत आहोत.
तुमच्या मित्रांचा प्लॅन चांगला असेलही.
पण कुठलीतरी एखादी कंपनी जी दुसऱ्याने स्थापन केलेली असते. त्या कंपनीबद्दल त्यांना काही माहिती नसते.
सध्या तरी असा प्लॅन ऐकण्याची आमची मनस्थिती नाही.
अस ठामपणे खडसावून सांगा.
आणि त्यावर काम करण्याची अजिबात इच्छा तर मुळीच नाही.
हे महत्वाचे सांगा...
पण समोरच्या व्यक्तीला काय आवश्यक आहे?
हे न पाहता आपले म्हणणे जबरदस्ती लादणे.
हे ही नैतिकतेला धरून नाही.
आपला तरुण वर्ग यात फसतोय बघा.
वेळ, पैसा, आणि शक्ती वाया जाते आहे.
पण समोरच्याला काही देणंघेणं नाही.
कारण स्वतःचा फायदाच बघायचं या पलीकडे विचार त्यांनी कधी केला नाही.
जे लोक असे MLM करत असतील लेख वाचून काही त्या लोकांचा तोल जाईल. ते अपशब्द वापरतील तर मी देवाला प्रार्थना करतो की त्यांना माफ कर आणि सुबुद्धी दे म्हणून.
मला त्यांची कीव येत आहे. कारण फक्त आपण चर्चा करत आहोत.
तुमच्या मित्रांचा प्लॅन चांगला असेलही.
पण कुठलीतरी एखादी कंपनी जी दुसऱ्याने स्थापन केलेली असते. त्या कंपनीबद्दल त्यांना काही माहिती नसते.
सध्या तरी असा प्लॅन ऐकण्याची आमची मनस्थिती नाही.
अस ठामपणे खडसावून सांगा.
आणि त्यावर काम करण्याची अजिबात इच्छा तर मुळीच नाही.
हे महत्वाचे सांगा...
पण समोरच्या व्यक्तीला काय आवश्यक आहे?
हे न पाहता आपले म्हणणे जबरदस्ती लादणे.
हे ही नैतिकतेला धरून नाही.
असं बिनधास्त बोला.
एक गोष्ट तुम्ही नक्कीच करा,
की तुमचे नातेवाईक नंतर मित्र, मित्राचे मित्र,ओळखीचे, शेजारी - पाजारी, कामगार आणि सहकारी यांना सभासद, डीलर, मेंबर तथा जॉइंट न करता तुमच्या श्रीमंतीच्या प्लॅन मध्ये घेऊ नये. मग बाकी तुम्ही काय तो व्यवसाय करायचा आहे तो नक्की करा. तुम्ही इतरांना घेऊन इतर ठिकाणी अवश्य करा.
मला एक कळत ते म्हणजे कष्टाशिवाय पैसा नाही.हे सत्य नाकारताच येत नाही.चहाची गाडी, टपरी लावा किंवा भाजीपाला आणि फळे विका त्याची लाज बाळगू पण. असले MLM उद्योग करू नका.
हि पोस्ट आपण वाचल्यानंतर जो कोणी असे काम करत असेल किंवा करणार असेल त्यांना Share करावी. हो त्या तुमच्याकडे आलेल्या एजेंट व्यक्तींना पण Whats App करावी. त्यांना अवश्य पाठवाच.
नक्की पाठवा हं ! कारण अस पाठवावे कोणालाही वाटत नाही.
कारण समोरचा नाराज होईल वगैरे वगैरे. आपला स्वभाव असा आहे की आपले पैसे, वेळ बुडाला तरी चालेल पण समोरचा नाराज होता कामा नये. त्याला काय वाटेल ही आपली भूमिका असते.
पण आपणही समाजाचा भाग आहोत.
एक चांगला विचार एक चांगले कार्य घडवीत असतो.
मग एक Share बनतोच.
हे सर्व करण्यापेक्षा एक चहाची गाडी किंवा भेळीचा गाडा लावला तर नक्कीच तुम्ही श्रीमंत होऊ शकत आहे.
अनीतीनें द्रव्य जोडी । धर्म नीति न्याय सोडी ।संगतीचें मनुष्य तोडी । तो येक मूर्ख ॥
कमेंट करून आपला अभिप्राय नक्कीच कळवा. कळावे लोभ असावा.
धन्यवाद
श्री. अर्जुन सैद पुणे
2 Comments
महत्वाची माहिती आहे
ReplyDeleteright
ReplyDeletePOLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH