Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बारा मोटेची विहीर शिव उत्तरकालीन स्तापत्य कलेचा अविष्कार | Bara Mota Chi Vihir Limb Satara

बारा मोटेची विहीर - शिव उत्तरकालीन स्तापत्य कलेचा अविष्कार ( Bara Mota Chi Vihir )


Bara Mota Chi Vihir - Mahaal 


            साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर म्हणजे सातारा रस्त्यावर डावीकडे "लिंब"  गाव आहे.
                      या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी 'बारा मोटेची विहीर' आहे. शिवकालात महाराष्ट्रातील बांधकामांनी एक उंची गाठली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे नव्याने किल्ले बांधले तसेच, अनेक किल्ल्यांची डागडुजीही केली. त्यावेळच्या बांधकामांचा दर्जा आणि त्यातील कलात्मकता केवळ किल्ल्यांतूनच दिसते असे नाही तर या ठिकठिकाणी अन्य प्रकारची दर्जेदार बांधकामे झाली होती. त्यातीलच एक उत्तम नमुन म्हणजे लिंब (जि. सातारा) येथील बारा मोटेची विहीर. ज्यांना ऐतिहासिक बांधकामे पाहण्याचा आणि त्यांचा अभ्यास करण्याची आवड आहे त्यांनी तर ही विहीर पाहिलीच पाहिजे...


Bara Mota Chi Vihir - Mahaal 
                                                                
     
इतिहास - 

ही विहीर संभाजीराजे यांचे सुपुत्र शाहु महाराज(पाहिले शाहु महाराज) यांच्या  काळात या विहिरीचे बांधकाम शके १६४१ ते १६४६ या दरम्यान  विरुबाई  यांनी केले. 
                     या विहिरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० फूट आहे. लिंब गाव परिसरात सुमारे 300 झाडाच्या 'अमराई' च्या पाणी व्यवस्थेसाठी ही विहीर बांधली गेली.
 


Bara Mota Chi Vihir - Mahaal 



  स्तापत्य : (Architecture)

शिवकालीन स्थापत्यशास्त्र, ही विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे हि विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बघा विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि भव्य कमान आहे, मध्यभागी महाल असून दोन बाजूंनी एक विहिर अणि उपविहिर असं बांधकाम आहे, शिवलिंगाचा आकाराची ही विहीर आहे.उपविहीरीच्या तळापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या नितळ पाण्यात आजही दिसतात.
अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत. यातील दक्षिणेकडील २ वाघांच्या पायात दोन-दोन असे चार हत्ती आहेत तर उत्तरेकडील २ वाघ आकाशात झेप घेत आहेत.
याचा थोडक्यात अर्थ असा की (महाराजांनी) दक्षिण दिग्विजय झाला आहे आहे आता उत्तरदिशेकडे झेप घेणार.



                                            Bara Mota Chi Vihir - Sub Well (उपविहीर) -
विहिरीस आलिशान जिना आणि आत उतरण्यास दोन बाजूने वाटा आहेत. या विहिरीवर पंधरा मोटा बासवन्याची सोय असून प्रत्यक्षात बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथ

Bara Mota Chi Vihir - Mahaal 


Please Watch This Video 


Post a Comment

1 Comments

POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH

close