Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती | राणी त्यांचे पुत्र त्यांच्या कन्या त्यांची नातवंडे ???


छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती |  शिवरायांच्या राणी त्यांचे पुत्र त्यांच्या कन्या आणि त्यांची नातवंडे यांचा थोडक्यात परिचय 




 

आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती घेणार आहोत. ज्या शिवरायांच्या राण्या, त्यांचे पुत्र, त्यांच्या कन्या आणि त्यांची नातवंडे यांचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत.


हे पण वाचा - छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ त्यांची कामे आणि त्यांचा पगार


◆ शिवाजी राजांना ऐकून आठ राण्या / पत्नी होत्या -

  1. सईबाई निंबाळकर - राणी साहेब सईबाई ह्या फलटण च्या नाईक निंबाळकरांच्या कन्या होत्या. त्या शिवरायांच्या प्रथम पत्नी होत्या. शिवाय शिवरायांच्या पट्टराणी होत्या. सईबाईं राणी साहेबांना शिवरायांचा सहवास इतर राण्यापेक्षा जास्त प्रमाणात लाभला नाही. सईबाईंचा शिवरायांशी दिनांक 17 एप्रिल 1640 विवाह झाला होता. शिवरायांना सुख-दुःखात साथ देणाऱ्या सईबाईंचा मृत्यू 5 सप्टेंबर 16 59 रोजी राजगडावर झाला.

  2. सोयराबाई मोहिते - राणीसाहेब सोयराबाई ह्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते पावसचे मोहिते तळबीडकर यांची बहीण होत्या. सोयराबाई मोहिते शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी सईबाईंच्या पश्चात शिवरायांच्या पट्टराणी म्हणून सोयराबाई शिवरायांच्या सोबत होत्या. सोयराबाई आणि शिवरायांशी विवाह बंगळूर येथे  1642 ला झाला होता.

  3.  राणीसाहेब सगुणाबाई - राणीसाहेब सगुणाबाई शिर्के ह्या शिर्के घराण्यातील होत्या.  शिर्के घर हे नामवंत सरदारांपैकी एक होते. स्वराज्याची सेवा त्यांनी मानाने केली.

  4. पुतळाबाई पालकर - राणीसाहेब पुतळाबाई ह्या शिवाजी महाराज यांच्या निधनाबद्दल काही दिवसांनी रायगडावरती सती गेल्या होत्या. त्यामध्ये पुतळाबाई यांचा मृत्यू झाला आणि विवाह आणि मृत्यू बाबतीत त्यांचे कागदपत्रांमधून वेगवेगळे संदर्भ मिळतात. 

  5. लक्ष्मीबाई विचारे - राणीसाहेब लक्ष्मीबाई या विचारे घराण्यातील होत्या.

  6. सकवारबाई गायकवाड - राणीसाहेब सकवारबाई ह्या गायकवाड घराण्यातील होत्या. त्यांचा शिवरायांची विवाह 1657 रोजी झाला होता.

  7. काशीबाई जाधव - राणीसाहेब काशीबाई ह्या स्वराज्यातील जाधव घराण्यातील होत्या. त्यांचा मृत्यू 16 मार्च 1674 रोजी रायगडावर झाला. 

  8.  गुणवंताबाई इंगले - राणीसाहेब गुणवंताबाई  ह्या स्वराज्यात इंगळे घराण्यातील होत्या.





◆ शिवरायांना दोन पुत्र होते 


सईबाई राणीसाहेब यांच्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांना एक पुत्र झाला होता.

  1. सईबाई पुत्र - छत्रपती संभाजी राजे कालखंड - जन्म 14 मे 1670  पुरंदर पुणे येथे झाला तर मृत्यु 11 मार्च 1689 तुळापूर पुणे झाला.

  2. सोयराबाई पुत्र - छत्रपती राजाराम राजे कालखंड - जन्म 14 फेब्रुवारी 1670 राजगड झाला तर मृत्यू - 03 मार्च 1700 किल्ले सिंहगड पुणे येथे झाला.


 ◆ शिवरायांना एकूण सहा कन्या होत्या- 


  1. राणीसाहेब सईबाई - यांच्यापासून त्यांना तीन कन्या होत्या. 


● प्रथम कन्या सकवराबाई उर्फ सखुबाई - ह्या मुलीचे लग्न महादजी निंबाळकर यांच्याशी झाले होते. महाराज निंबाळकर यांचे वडील बजाबा निंबाळकर मुसलमान होऊन बजावत खान झाले होते. छत्रपती शिवरायांनी या बजावत खानाला मराठा केले. परंतु त्यांच्याशी कोणीही रोटी-बेटी व्यवहार करण्यास तयार नव्हते. तेव्हा छत्रपती शिवरायांनी राजकुमारी सखुबाईचा विवाह निंबाळकर यांचा मुलगा महादजी निंबाळकर यांच्याशी लावून मराठा कधीही आटत नाही, हे जगाला दाखवून दिले. त्याच बरोबर परिवर्तन हे स्वतःच्या घरापासून करावी लागते आदर्श निर्माण केला.

● द्वितीय कन्या रानुबाई - द्वितीय कन्या रानुबाई यांचा विवाह  चलाजी जाधव यांच्या घराण्यात करून दिला होता.

● त्रितीय कन्या अंबिकाबाई - यांचा विवाह हरजी राजे महाडिक यांच्याशी करून त्यांना कर्नाटकची महत्वाची जबाबदारी दिली होती. स्वराज्याच्या साठी महाडिक घराण्याचे मोठे योगदान होते.

  1. राणीसाहेब सोयराबाई - सोयराबाई यांच्यापासून एक कन्या झाली होती.

  2.  कन्या बाळाबाई उर्फ दिपाबाई - यांचा विवाह विश्वासरावांशी करून दिला होता.


  1. राणीसाहेब सकवारबाई - सकवारबाई यांच्यापासून एक कन्या झाली होती.

  2.  कन्या कमळाबाई - यांचा विवाह सेनापती नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी पालकर यांच्याशी झाला होता.


  1. राणीसाहेब सगुणाबाई - सगुणाबाई यांच्यापासून एक कन्या झाली होती.

  2. राजकुंवरबाई उर्फ नानाबाई - यांचा विवाह गणोजीराजे शिर्के यांच्याशी करून दिला होता. शिर्के घराण्याचे स्वराज्याच्या साठी खूप मोठे योगदान होते. 







Immage Secure By wikipedia.org


◆ छत्रपती शिवरायांना किती नातवंडे होती - 


 ● शिवरायांनी संगमेश्वरचे पिलाजी शिर्के यांच्या कन्या येसूबाई  यांचा विवाह युवराज संभाजीराजांशी करून दिला होता. युवराज संभाजींना राणी येसूबाई यांच्या पासून पुत्रप्राप्ती झाली होती. दिनांक 18 मे 1682 रोजी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला. जे पुढे जाऊन सातारा गादीचे वारसदार झाले. छत्रपती शाहू महाराजांचा मृत्यु दिनांक 15 डिसेंबर 1749 रोजी सातारा येथे झाला.


● छत्रपती राजाराम महाराज यांचे एकूण चार विवाह झाले होते.


  1. जानकी राणीसाहेब - त्या प्रतापराव गुजर यांच्या कन्या होत्या. (अपत्य प्राप्ती नाही.)

  2. ताराराणी राणीसाहेब - सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. (छत्रपती शिवाजीराजे दुसरे जन्म - 9 जून 1696. कन्या अंबिकाबाई.)  (टीप - पुढे ताराराणी ह्या कोल्हापूर गाडीच्या वारसदार होत्या)

  1. राजसराणी राणीसाहेब - त्या कागलकर घाटगे घराण्यातील होत्या. (छत्रपती संभाजीराजे दुसरे जन्म 23 मे 1698). कन्या सोयराबाई)

  2. अंबिकाराणी उर्फ अहिल्याराणी राणीसाहेब - अपत्य प्राप्ती नाही.



 छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेल्या एकूण  8 विवाहांच्या सर्व थिती किंवा तारखा आजवर उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक साधनांमधून समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे सर्व इतिहास अभ्यासकांमध्ये वेग-वेगळी मते आहेत. छत्रपती शिवरायांच्या प्रथम पत्नी सईबाई साहेब आणि आठव्या पत्नी गुणवंताबाई साहेब वगळता इतर पत्नींचा वैवाहिक क्रम मागे पुढे झालेला पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण आठ विवाह झाले होते. यावर मात्र सर्व इतिहासकारांमध्ये एकवाक्यता आहे.



Image Secure By wikipedia.org


राजमाता जिजाऊची छत्रपती शिवाजी महाराजांचे एकापेक्षा जास्त विवाह करण्यामागे दूरदृष्टी होती. मावळ खोऱ्यातील वीर मावळ्यांच्या घरांशी त्यांनी जाणीवपूर्वक नाती जोडली होती. एकाच वेळी अनेक सोयरीकीमुळे ते मावळे घराणे आणि त्यांच्याशी संबंधित सभोवतालची खेडी आपोआप शिवरायांशी पर्यायाने स्वराज्याशी जोडली जात असे.  माँसाहेब जिजाऊंच्या या दूरदृष्टी पणामुळे मावळ्यांमधील पिढीजात वैर संपुष्टात येऊन सर्वजण स्वराज्य या एकाच धाग्याने बांधले गेले होते. त्याचा उपयोग स्वराज्य विस्तार कार्यासाठी होऊ लागला होता.


छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुला-मुलींचे लग्न स्वराज्यातील सामान्य पण कर्तबगार व शूर मावळ्यांची केले. ते करत असताना संपत्तीचा वायफळ खर्च न करता त्यांनी विवाह सोहळे अत्यंत साध्या पद्धतीने केले. मुला-मुलींच्या लग्नात कोणाला हुंडा दिला नाही. आणि त्यांनी पण घेतला नाही. असा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला होता.


       वरील माहिती उपलब्ध साधनानुसार प्रकट केली आहे. त्यामध्ये काही चूक असेल तर कमेन्ट करून नक्कीच कळवा. कारण इतिहासात चुकीला स्थान दिले तर अनेक गैरसमज निर्माण होत असतात. त्यामुळे आम्ही अचूक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जे विवादास्पद आहे त्याचा उल्लेख करणे टाळले आहे. 

    माहिती आवडली तर नक्कीच Share करा. आणि अभिमानाने जय शिवराय आणि हर हर महादेव कमेन्ट करा.






Post a Comment

0 Comments

close