पुण्यातील धर्मादाय रुग्णालयांना चाप; नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई
Crackdown on charitable hospitals in Pune; strict action for rule violations
पुणे प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या कार्यपद्धतीतील अनियमितता आणि रुग्णांशी होणाऱ्या गैरवर्तनाबाबत धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
काय आहेत नवीन निर्देश?
धर्मादाय सह आयुक्त दिनेश ए. कोठलीकर यांनी जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना पत्र पाठवून खालील बाबींची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत :
ठळक फलक : रुग्णालयाच्या प्रमुख प्रवेशद्वारावर "धर्मादाय रुग्णालय" असा स्पष्ट आणि ठळक फलक मराठी भाषेत लावणे अनिवार्य आहे.
अद्ययावत माहिती : धर्मादाय बेड्सची एकूण संख्या, सध्या उपलब्ध संख्या आणि वाटप स्थिती दर्शविणारा फलक स्वागत कक्षात व प्रमुख ठिकाणी दररोज अपडेट (Update) करणे बंधनकारक आहे.
समाजसेवकांची माहिती : नियुक्त समाजसेवकांची नावे, त्यांचे संपर्क क्रमांक आणि उपलब्धतेच्या वेळा मराठी भाषेत स्पष्टपणे दर्शवण्यात याव्यात.
आरक्षित बेड्सचा वापर : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पात्र लाभार्थ्यांसाठी राखीव बेड्सचा योग्य वापर सुनिश्चित करावा.
३० दिवसांचा अल्टिमेटम
या पत्राद्वारे रुग्णालयांना ३० दिवसांच्या आत केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल कार्यालयात सादर करण्यास सांगण्यात आले आहे. जर रुग्णालय व्यवस्थापनाने या सूचनांचे पालन केले नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
ही धडक कारवाई अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते आणि पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य श्री. संपत नाना फराटे पाटील यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत करण्यात आली आहे.
महावितरणची तत्परता : सणसवाडीतील जळालेला ट्रान्सफॉर्मर ८ तासांत बदलला ; ग्रामस्थांकडून


0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH