Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अन्यायाविरोधात अखंड संघर्ष: ग्राहक हक्क व जनहितासाठी लढणारे अशोक दरेकर यांचे कार्य कौतुकास्पद

 अन्यायाविरोधात अखंड संघर्ष: ग्राहक हक्क व जनहितासाठी लढणारे अशोक दरेकर यांचे कार्य कौतुकास्पद




सणसवाडी (ता. शिरूर) : प्रशासकीय गैरकारभार, भ्रष्टाचाराची कीड आणि सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायत व स्थानिक चळवळींच्या माध्यमातून सणसवाडीचे सामाजिक कार्यकर्ते अशोक तुकाराम दरेकर यांनी उभारलेला लढा शिरूर तालुक्यात दिशादर्शक ठरला आहे. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी थेट शासन-प्रशासनाला जाब विचारणाऱ्या दरेकर यांच्या धडक आंदोलनांमुळे अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना न्याय मिळाला आहे.

पोलीस ठाण्यातील गैरकारभाराला चाप : मध्यरात्री अधिकाऱ्याची बदली शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकाच्या मनमानी आणि चुकीच्या भूमिकेविरोधात दरेकर यांनी ठोस पुराव्यानिशी थेट गृहविभाग व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे पाठपुरावा केला होता. या आक्रमक भूमिकेमुळे वरिष्ठ पातळीवर हालचाली होऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्याची चक्क मध्यरात्री २:०० वाजता तातडीने बदली करण्यात आली होती. सर्वसामान्य नागरिकांना पोलीस ठाण्यात होणारा त्रास, खोटे गुन्हे आणि छुप्या अवैध धंद्यांविरोधात त्यांनी वेळोवेळी आवाज उठवून सामान्यांना दिलासा दिला.

टोलनाक्यांवरील बेकायदा वसुली बंद : रांजणगाव गणपती आणि पेरणे फाटा येथील टोलनाक्यांवर होणाऱ्या नियमबाह्य आणि बेकायदा टोल वसुलीविरोधात अशोक दरेकर यांनी ग्राहक पंचायत आणि क्रांतिवीर प्रतिष्ठान मिळून तीव्र आंदोलन छेडले होते. त्यांच्या या आंदोलनामुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि नागरिकांची नाहक आर्थिक लूट थांबून संबंधित ठिकाणी बेकायदा वसुली बंद झाली.

कामगारांना न्याय (इसार स्टील लढा): कामगारांचे इसार स्टीलचे उपोषण ठरले यशस्वी कंपन्यांमधील स्थानिक कामगारांच्या हक्कांवर गदा आली असता दरेकर नेहमीच ढाल बनून उभे राहिले. इसार स्टील कंपनीतील कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी आमरण उपोषण पुकारून कंपनी प्रशासनाला वेठीस धरले होते. या यशस्वी लढ्यामुळे अखेर व्यवस्थापनाला झुकावे लागले आणि ३५ कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घेत त्यांच्या कुटुंबांना मोठा आधार देण्यात आला.

ग्रामपंचायत कारभारात पारदर्शकता: ग्रामपंचायत कारभारात पारदर्शकता व नागरी हक्कांचे रक्षण सणसवाडी ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा निधी, निकृष्ट दर्जाची कामे आणि निविदा प्रक्रियेतील अनियमितता यांवर माहिती अधिकाराचा (RTI) प्रभावी वापर करत त्यांनी अंकुश ठेवला. सांडपाणी व्यवस्थापन, शुद्ध पिण्याचे पाणी, रस्ते व औद्योगिक प्रदूषण यांसारख्या प्रश्नांवर ग्रामसभेत थेट आवाज उठवून प्रशासनाला धारेवर धरले.

नागरी व पर्यावरण समस्यांवर थेट जाब: सांडपाणी व्यवस्थापन, शुद्ध पिण्याचे पाणी, रस्ते विकास आणि औद्योगिक प्रदूषणासारख्या गंभीर प्रश्नांवर ग्रामसभेत रोखठोक आवाज उठवून प्रशासनाला धारेवर धरले.

ग्राहक हक्कांचे संरक्षण (अखिल भारतीय ग्राहक पंचायत): महावितरणची अवाजवी व फुगलेली वीज बिले दुरुस्त करणे, रेशनिंगमधील धान्य घोटाळ्यांना आळा घालणे आणि तळागाळातील सामान्य ग्राहकांमध्ये हक्कांची जागृती निर्माण करण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून महावितरणची फुगलेली वीज बिले दुरुस्त करणे, रेशनिंगमधील धान्य घोटाळे रोखणे आणि तळागाळातील ग्राहकांना त्यांचे अधिकार समजावून सांगणे यात अशोक दरेकर यांचे योगदान कायम अग्रस्थानी राहिले असून परिसरातील नागरिकांमधून त्यांच्या या निस्वार्थी कार्याचे मोठे कौतुक होत आहे.




Post a Comment

0 Comments

close