Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महावितरणची तत्परता : सणसवाडीतील जळालेला ट्रान्सफॉर्मर ८ तासांत बदलला ; ग्रामस्थांकडून आभार

 महावितरणची तत्परता : सणसवाडीतील जळालेला ट्रान्सफॉर्मर ८ तासांत बदलला ; ग्रामस्थांकडून आभार




सणसवाडी (प्रतिनिधी) : सणसवाडी येथील सराटी वस्ती भागात जळालेला ट्रान्सफॉर्मर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ दखल घेत अवघ्या ८ तासांत बदलून दिला आहे. यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिक आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, महावितरणच्या या गतिमान कारभाराचे कौतुक होत आहे.


ऐन उन्हाळ्यात वीज गायब, नागरिक हैराण - 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१९ मे २०२६) सकाळी ९.०० वाजण्याच्या सुमारास सराटी वस्ती येथील ट्रान्सफॉर्मर अचानक जळाला. सध्या मे महिन्याचे कडक ऊन आणि असह्य गर्मी असल्यामुळे वीज पुरवठा खंडित होताच नागरिक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक दिवसभर प्रचंड त्रस्त झाले होते.


ग्राहक पंचायतीचा पाठपुरावा आणि महावितरणची तत्परता - 

ट्रान्सफॉर्मर जळाल्याची माहिती मिळताच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे *श्री. अर्जुन लहानबा सैद यांनी तात्काळ पुढाकार घेतला. त्यांनी महावितरणचे कोरेगाव भीमा येथील सहाय्यक अभियंता आणि केडगाव येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य पटवून दिले. तसेच उन्हाळ्याची भीषणता पाहता येथे तात्काळ दुसरा ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी केली.

अधिकाऱ्यांनीही या मागणीची गंभीर दखल घेत तात्काळ हालचाली सुरू केल्या. युद्धपातळीवर नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यात आला.


सायंकाळी वीज पुरवठा सुळीत - 

महावितरणचे लाईनमन श्री. राज भांबरे आणि श्री. तडवी यांच्या चोख देखरेखीखाली कर्मचाऱ्यांनी भर उन्हात काम करत सायंकाळी ५.०० वाजेच्या सुमारास नवीन ट्रान्सफॉर्मर यशस्वीरित्या बसवला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी (२० मे २०२६) वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला.


> सकाळी ९ वाजता जळालेला ट्रान्सफॉर्मर सायंकाळी ५ वाजेपर्यंत, म्हणजेच अवघ्या ८ तासांत पुन्हा सुरू झाल्याने सराटी वस्तीतील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

ग्रामस्थांनी मानले आभार- 

उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन दाखवलेल्या या तत्परतेबद्दल सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने महावितरणचे सहाय्यक अभियंता (कोरेगाव भीमा), लाईनमन राज भांबरे, श्री. तडवी आणि सर्व तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानण्यात आले. तसेच ग्राहकांच्या हक्कासाठी धावून जाणाऱ्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्याचेही कौतुक होत आहे.

कुठल्याही राजकीय पदाधिकारी यांची मदत न घेता काम मार्गी लागले आहे.

Post a Comment

0 Comments

close