एक वेळ लंच आणि दोन वेळा पंच करणं हा आमचा फॅक्ट्रीतील रोजचा सिरस्तच होता. काय करणार रोजरोजच ते मरमर के जिना म्हणतात ना तेच जीवन मी जगत होतो. इतर पर्याय नसल्याने कामगार म्हणूनच आयुष्य जगत होतो.
मोहीम असते हे माहित होतं. पण नक्की काय असतं हे अनुभवलं नव्हतंच; मग मोहीम म्हणजे काय ? याचा काहीच पत्ता नव्हता. #धारकरी हा शब्द पण मला नवीनच होता. आम्ही अनेक #शिवजयंती साजरी केल्या आणि करत आहोत. हा पुढेही साजरी करूच कि हयगय करायची काही आवश्यकता नाही. आम्हाला फक्त शिवजयंतीच माहिती होती. #शिवभक्त हा प्रकार फक्त बोलायला आणि नावपुढं लावायचा इतकंच मला माहिती होते. अनेक धारकरी मित्र मोहिमला जात होते. मी जवळून अनुभवले होते आणि पाहिले होते. पण मी कधीच मोहिमला गेलो नाही. त्यांनी खूप आग्रह केला पण मी प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणं सांगून टाळलं होतो. सुट्ट्या नाही, वेळ नाही, मला जमणार नाही, येतोच पण पुढच्या वर्षी अशा मी बढाया मारीत होतो. पण मला कळलंच नाही हा एक कपाळ करंटा पणा आहे म्हणून. कारण #कामगार म्हणून आणि #व्यावसायिक म्हणून काही बंधने नक्कीच असतात. त्याचप्रमाणे एक कुटुंब वत्सल मनुष्य प्राणी म्हणून मला प्रत्येक वर्षी अडचणी असायच्याच कि. दर वर्षी मोहिमला न जाण्यासाठी सांगायला भरपूर कारणे होती. आणि याच कारणांचा आधार घेऊन मी मोहिमला जायचं टाळून स्वतः ची भलावण करत होतो. जसे नवीन शिवभक्त आत्ता जी करणे सांगून टाळत असतात. पण न येणारे आणि येतो म्हणून सांगणाराचा नकार आला तरीही आम्ही डगमगत नाही. कारण ज्वलंत आणि जाज्वल शिवभक्त्ती आम्ही मनामनांत आणि नसानसांत बिंबविली गेलेली आहे.
१४ वर्षांनंतरची गडकोट मोहीम -
म्हणतात ना १४ वर्षे वनवास सहन करावा लागतो. तसेच मी पण तब्बल १४ वर्षानंतर मोहिमला गेलो. हे मात्र अतीच झालं हं. पण त्याला कारणही तसेच होते. मा. भिडे गुरुजी गडकोट_मोहीम -२०१५ च्या प्रचार व प्रसार करण्यासाठी शिरूर (जिल्हा पुणे) शहरात डिसेंबर -२०१४ ला आले होते. मला तेथे जाण्याचा योग आला होता. तसं पाहिलं तर मला श्री. बाळासाहेब_दरेकर यांनी येण्याचा आग्रह धरला होता. आणि मला पण गुरुजींचे व्याख्यान ऐकायचे होते. त्यामुळे ते माझं भाग्यच होता की असं म्हणायला काही हरकत नाहीच. पण हिंदुस्थानमध्ये हिंदू म्हणून जगायचं अवघड होत चालले होते. सर्वधर्म समभाव या एकाच विषाच्या पेल्यामुळे संपूर्ण हिंदुस्थान ढवळून निघाला होताच. स्वधर्म अभिमान फक्त औषधलाच उरला होता. सगळीकडे समाजवाद बोकाळला होता. हिंदू म्हणून कुठलेही काम करायला लोकं धजत होती. अशी अवघड व बिकट परिस्थिती झालेली होती. मग असल्या खुळचट वातावरणात आपली पुढची पिढी कशी घडणार असा प्रश्न सतावत होता. मग काय करायचं काही मार्ग नव्हता. पण समजलं होत; कळालं होत आता मा. संभाजी भिडे गुरुजींशिवाय मार्ग नाही.
माझा_आणि_गुरुजींचा_मोहीम_संवाद -
गुरुजींनी पदर पसरवून एक मागणं मागितलं गाड्यांनो आपल्याला देव, देश आणि धर्मासाठी चार दिवस द्यायला हवेत. म्हणून मोहिमला या. आपले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज कसे जगले ते अनुभवायला या.......
अशी साद गुरुजींनी दिली आणि मग मी मोहिमला जायचं असं ठरविले होतं असं अजिबात नाही हो. तरीही नक्की नव्हतेच कारण आपणाला हे जमेल का ?
मग जायचं का ?
नको बाबा नाही जमणार?
आणि हो घरच्यांचा नकार हा काय विषय होताच कि.....
पण मनाने ठरविले जायचंच कि कारण ;
गुरुजीं बरोबर बाळासाहेब दरेकर यांनी ओळख करून दिली होती. तेंव्हा गुरुजी म्हणाले होते;
अरे वा!#हुतात्म्याचा वारसा लाभला आहे.
छान हं!
मग किती मोहिम केल्या आपण ?
मी म्हणालो यंदा येणार आहे.
नक्की या......
मग हे शब्द माझ्या कानात कोरले गेले तोच माझा आणि गुरुजींचा वैयक्तिक पहिला संवाद होता.
गुरुजींच्या पायाची जखम -
गुरुजींच्या पायाला जखम झाली हाती. पायाला टाके पडले होते. गुरुजी मोहिमची मार्गाची #टेहळणी करायला गेले होते. तेंव्हा त्यांच्या पायाला जखम झाली होती. ४० हजार ते ५० हजार तरुणांना डोंगर दरी खोऱ्यांतुन घेऊन जायचं काम हे सोपं तर अजिबात नसतं. म्हणून मोहिमच्या अगोदर मार्गाची पाहणी केली जाते. त्याला टेहळणी पथक असे म्हणतात. एवढा त्रास असूनही हा ८६ वर्षाचा तरुण माणूस धर्मासाठी पायात प्लास्टिक पिशवी घालून असं मागणं मागत होते........
मग ठरलं यंदाची गडकोट मोहीम -२०१५ करायचीच .
आणि माझी पहिली गडकोट मोहीम - श्री. वैरात गड वाई ते श्री. सप्तशृंगी गड सातारा झाली.....
माझी_पुढील पिढी आणि मोहीम -
मी माझेच महत्व काय वर्णावे. मी साधा सरळ आणि निर्व्यसनी माणूस आहे. मला प्रसिद्धी ची हव्यास तर अजिबात नाही. मला जास्त भडक आणि कडक शाब्दिक खेळ करायला जमणार नाही. आणि माझा तसा पिंड पण नाही. मला एवढेच माहिती झालं की भगवा ध्वज आणि आपण एकच आहोत. जर ध्वज टिकला तर आपला हिंदू_धर्म आणि संस्कृती' टिकणार आहे.
गुरुजींनी......
'कशासाठी आणि कसे जगावे मी'
हे आम्हाला शिकविले आहे. अखंड 'हिंदुस्थानचे'तुकडे पडले आहेतच. आता उर्वरित हिंदुस्थानचे तुकडे पाडायला शत्रू टपून बसलेत. हे तेच हिरवे अजगर आहे. याची जाण फक्त गुरुजींनी करून दिली आहे. म्हणून मी धारकरी झालोय आणि श्री._शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान च्या गडकोट मोहीम मध्ये सहभागी होत असतो. कारण मला माझ्या पुढील पिढ्यांना 'हिंदू धर्माचा आणि संस्कृती'चा चांगला वारसा आणि वसा द्यायचा आहे. म्हणूनच आपणाला देव, देश आणि धर्माचे कार्य चालू ठेवून हा हिंदुस्थान वाचवायचा आहे. हे काम कर्ता करविता तो देव आहे मी फक्त निमित्तमात्र आहे.
उरीं राष्ट्रभक्ती रविवत् ज्वलंत।
नये भिती चित्ती जरीं ये कृतांत(यम)।।
सदा सिद्ध करण्या रणीं म्लेंच्छअंत।
अशांची शिवाजी असे जन्मजात।।
वेध धारातीर्थ यात्रेचे अर्थात गडकोट मोहीमेचेपन्हाळा ते विशाळगड मार्गे पावनखिंड 🚩
दिनांक-११जानेवारी ते १५जानेवारी २०१७.
आपला धारकरी
श्री. अर्जुन लहानबा सैद
जिल्हा - पुणे


0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH