मुळशीतील तरुणांची सेवा उद्योगात मोठी झेप; 'Deepcleanwala.com' या डिजिटल प्लॅटफॉर्मचा शानदार शुभारंभ
आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या हस्ते वेबसाईटचे अनावरण; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुळशी परिसरात सेवा उपलब्ध
मुळशी (पुणे): ग्रामीण भागातील तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत उद्योग क्षेत्रात स्वतःचे भक्कम स्थान निर्माण करण्याचे आदर्श उदाहरण मुळशी तालुक्यात समोर आले आहे. मुळशी तालुक्यातील
वाढते नागरीकरण आणि सेवा क्षेत्रातील वाढती गरज ओळखून स्थानिक तरुणांनी सुरू केलेल्या 'Deepcleanwala.com' या होम क्लिनिंग व होम सर्व्हिसेस प्लॅटफॉर्मचा शुभारंभ भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय श्री. शंकरभाऊ मांडेकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. या वेळी 'Deepcleanwala.com' या अधिकृत संकेतस्थळाचे अनावरणही करण्यात आले.
deepcleanwala.com ह्या वेबसाइटवर भेट देण्यासाठी येथे क्लिक करा...
एकाच छताखाली विविध सेवा पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुळशी परिसरातील नोकरदार वर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच पेइंग गेस्ट (PG Rooms) मध्ये राहणाऱ्या नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून ही सेवा डिझाइन करण्यात आली आहे.
- होम व कमर्शियल क्लिनिंग: घर, फ्लॅट्स आणि बंगलोच्या सर्वसमावेशक डीप क्लिनिंगची सुविधा.
- घर शिफ्टिंग व ट्रान्सपोर्ट: पुणे शहर आणि परिसरात सुरक्षित पॅकर्स अँड मूव्हर्स / शिफ्टिंग सेवा.
- घरगुती वस्तू भाड्याने (Rental): रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, बेड, मॅट्रेस आणि सोफा यांसारख्या आवश्यक वस्तू मासिक व वार्षिक भाडेतत्त्वावर उपलब्ध.
- साहित्य व क्लिनिंग लिक्विड विक्री: प्रोफेशल हाऊसकिपिंगसाठी लागणारे लिक्विड्स, क्लीनर्स आणि अत्याधुनिक टूल्स नागरिकांना माफक दरात खरेदीसाठी उपलब्ध.
जागतिक दर्जाची उपकरणे आणि सुरक्षिततेची हमी कार्यक्रमादरम्यान 'Deepcleanwala.com' चे फाउंडर आणि सीईओ श्री. विनोद पाटणकर व श्री. सौरभ कुलकर्णी यांनी या उपक्रमाची भविष्यातील रूपरेषा मांडली. प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, "वेळेत काम पूर्ण करणे, सुरक्षितता आणि ग्राहकांचा विश्वास जपणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. हाऊसकिपिंग, शिफ्टिंग आणि पेस्ट कंट्रोलसाठी जागतिक पातळीवर वापरली जाणारी अत्याधुनिक उपकरणे आम्ही सेवेत आणत आहोत. सामान्य नागरिकांना स्वतः वापरता येतील अशी सोपी व आधुनिक टूल्स माफक दरात उपलब्ध करून दिली जातील. वाजवी दर आणि उच्च दर्जाची सेवा देत या क्षेत्राला एक नवी दिशा देण्याचा आमचा मानस आहे."
स्थानिक तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता सेवा उद्योगातील ही मोठी संधी साधल्याबद्दल आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी त्यांचे विशेष कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH