आता ठिबक आणि तुषार सिंचनसाठी ९०% अनुदान
ठिबक व तुषार सिंचन संचासाठी अनुदान देय ही योजना लागू करण्यात आलेली आहे. सदरची योजना ही राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत येत आहे. योजनेसाठी खास नाव म्हणजे 'प्रति थेंब अधिक पीक, हे देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचा हा एक महत्त्वाचा संयुक्त उपक्रम आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांची वर्गवारी निश्चित केलेली आहे. त्यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक आणि बहु भूधारक शेतकरी सहभागी होऊ शकतात. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय कृषी योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना मिळून एकत्र करून 'प्रति थेंब अधिक पीक' ही महत्त्वाची योजना बनवण्यात आली आहे.
● सर्व सामान्य शेतकरी -
अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी -
ठिबक व तुषार सिंचन संचासाठी अल्प व अत्यल्प भूधारक यांच्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना 'प्रती थेंब अधिक पीक' यांच्याकडून ५५ % आणि मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजना यातून २५ % असं एकूण ८० % अनुदान देय असेल.
बहू भूधारक शेतकरी -
बहु भूधारक शेतकऱ्यांच्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना 'प्रति थेंब अधिक पीक' तर्फे ४५% आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना तर्फे ३० टक्के असे एकूण ७५टक्के अनुदान देय असेल.
● योजनेची वैशिष्ट्ये -
◆ महा डीबीटी संकेतस्थळावरून २४×७ अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
◆ संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून हार्ड कॉपी सादर करण्याची
आवश्यकता नाही.
◆ पारदर्शी ऑनलाइन सोडत पद्धत पाच हेक्टर पर्यंत लाभ मर्यादा आहे.
◆ शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये अनुदान थेट जमा होते.
◆ केंद्राच्या सुधारित खर्च मर्याप्रमाणे सर्व पिकांसाठी अनुदान उपलब्ध
आहे.
अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी
● राष्ट्रीय कृषी विकास योजना 'प्रति थेंब अधिक पीक' घटक व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना मिळून सूक्ष्म सिंचन संचासाठी ९० % पर्यंत अनुदान.
अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी
● राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक घटक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना मिळून सूक्ष्म सिंचन संचासाठी ९० % पर्यंत अनुदान.
आता गावानुसार मतदार यादी आली आहे तुमचे नाव येथे क्लिक करून पहा.

0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH