तुमच्या बँक खात्यात २००० ₹ आले आहे का? पहा गावानुसार यादी आली
आता पीएम किसान सन्मान योजना बारावा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे हे पाहायला सरकारी ऍप उपलब्ध करण्यात आले आहे.
तुमच्या बँक खात्यामध्ये २००० ₹ आलेले आहे का? हे पाहण्यासाठी केंद्र सरकारच्या PM KISAN GOL MOBILE AAP हे अँड्रॉइड ॲपवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने डिजिटल इंडिया वर भर देत आहेत. याचाच एक महत्वाचा भाग म्हणून किसान सन्मान निधी योजने अंतर्गत थेट शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात. परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये आले का? कधी आले? किंवा किती आले आहे? हे पाहण्यास ग्रामीण भागात अडचण निर्माण होत आहे. या सर्व समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने पी एम किसान गोल मोबाईल ॲप ( PM KISAN GOL MOBILE AAP ) सादर केलेले आहे. या मोबाईल ॲप द्वारे शेतकरी आता घरबसल्या आपल्या खात्यामध्ये किती तारखेला? किती वाजता ? आणि किती रक्कम जमा झालेली आहे किंवा जमा झालेली नाही आहे. हे मोबाईल ॲप द्वारे मोफत पाहू शकत आहे.
आता आपण पाहूया हे ॲप कसे डाउनलोड करायचे आणि त्याचे फायदे किंवा तोटे काय आहेत हे पण पाहू या.
सरकारद्वारे हे ॲप सुरू केलेले आहे. तरी हे ॲप तुम्ही गुगल प्ले स्टोअर ( Google play Store ) वरून सुद्धा मोफत केव्हाही डाऊनलोड करून वापरू शकत आहे. हे अँड्रॉइड ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला प्रथम ते रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्याचप्रमाणे या अँड्रॉइड ॲप मध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेसह इतर आठ भारतीय भाषांमध्ये वापर करण्यास पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. सर्व राज्यातील शेतकरी ह्या ॲपवर आधार कार्ड, बँक खाते नंबर आणि मोबाईल नंबरच्या मदतीने किसान सन्मान निधी योजनेच्या बाबतीत संपूर्ण माहिती घेऊ शकत आहेत. ॲप मध्ये आपल्या खात्यावर कधी व केव्हा किती पैसे जमा झाले आहेत किंवा नाही हे स्वतः तपासून शकत आहे. शिवाय हे सरकारी ॲप असल्यामुळे तुमची माहिती गोपनीय ठेवली जाते आहे. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर, नाव, पत्ता, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते नंबर यांची प्रायव्हसी जपली जाईल. सरकारी ऍप असल्यामुळे हॅकिंगचा किंवा माहिती लीक होण्याचा धोका यामध्ये नाही आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी हे ॲप वापरून सर्व माहिती तपासावी आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा ह्या Aap बाबत माहिती सांगावी.

0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH