Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दिवाळी निमित्ताने शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना




महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana






महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना


केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध योजना राबवत असतात. त्या योजनांपैकी एक योजना म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना होय. या योजनेची सुरुवात १ एप्रिल २०१७ रोजी झालेली आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील ३६  जिल्ह्यांना सामील केलेले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची एक आरोग्य विमा योजना आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे पूर्वीचे नाव राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना असे होते. आता ते बदलून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असे केलेले आहे. महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला दरवर्षी २ लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण दिले जाते आहे. त्याच प्रमाणे गंभीर आजारासाठी दरवर्षी ३ लाख रुपये विमा संरक्षण देण्यात येत आहे.



महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हॉस्पिटलांची जिल्हा निहाय यादी

 येथे क्लिक करून पहा



आता आपण पाहूया महात्मा ज्योतिबा फुले ही योजना नक्की कोणत्या नागरिकांसाठी लागू आहे?  


आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ नक्कीच घेता येईल. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. दोन मुलांपेक्षा जास्त मुले नसणे आवश्यक आहे. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.राज्यातील दारिद्र्यरेषेखाली म्हणजेच पिवळी शिधापत्रिका धारक असणारे आणि दारिद्र्यरेषेवरील म्हणजे केसरी शिधापत्रिका धारक असणाऱ्या कुटुंबांना अधिक चांगल्या दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उदात्त हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू केलेली आहे. अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने ही योजना खूप उपयुक्त ठरलेली आहे.महात्मा ज्योतिराव फुले जन योजना ही सरकारी दवाखाने आणि खाजगी दवाखाने यांना एकत्र जोडण्याचे काम करत आहे. लाभार्थ्यांच्या यादीतील नागरिकांना आजारांसाठी रोखविरहित सेवा पुरवली जाते. ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून महाराष्ट्रातील एकूण २८ जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात आलेली होती.


महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हॉस्पिटलांची 

 जिल्हा निहाय यादी येथे क्लिक करून पहा


या योजनेची आपण मुख्य वैशिष्ट्ये पाहणार आहोत - 

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यास संपूर्ण आरोग्य सहकार्य आणि सहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना रुग्णालयामधील उपचारासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. या योजनेअंतर्गत किडनी ट्रान्सप्लांटेशन साठी ३ लाख रुपये आणि कुटुंबाच्या उपचारासाठी २ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत प्लास्टिक सर्जरी, हृदयरोग, मोतीबिंदू कॅन्सर ऑपरेशन सोबत हृदय प्रत्यारोपण, डेंगू, स्वाईन फ्लू, मलेरिया, पीडीएफ सर्जरी सिकलसेल ऍनिमिया इत्यादी मोठ्या आजारांवर उपचार केले जातात.



महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे महत्त्वाचे फायदे - 

या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी २ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध करून दिलेले आहे. या योजनेअंतर्गत मूत्रपिंड प्रत्यारोपण व इतर गंभीर आजाराच्या उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी ३ लाख रुपयांपर्यंत किंवा संरक्षण दिले जाते. लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला किंवा त्या कुटुंबातील अनेक व्यक्तींना या योजनेअंतर्गत विमा संरक्षण दिले जाते. ही योजना पूर्णपणे संगणकृत असून या योजने अंतर्गत समाविष्ट रुग्णालयामधून लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका पिवळी, केशरी, अंत्योदय अन्नपूर्णा व फोटो असलेले ओळखपत्र या आधारे विमा संरक्षण दिले जाते. या योजने अंतर्गत लाभार्थ्यास वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयांमधून देण्यात येणारे उपचार तसेच रोगाचे निदान व एखाद्या आजारासाठीआवश्यक औषधोपचार भोजन तसेच एक वेळचा परतीचा प्रवास खर्च दिला जात आहे. या योजनेअंतर्गत रुग्णाला रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर दहा दिवसांपर्यंतच्या लागणाऱ्या सेवांसाठी विमा संरक्षण दिले जाते.






महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अंतर्गत खालील आजारांसाठी विमा संरक्षण देण्यात आलेले आहे

● सर्वसाधारण शस्त्रक्रिया

● कान नाक व घसा शस्त्रक्रिया

● नेत्ररोग शस्त्रक्रिया

● स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र 

● अस्थिरोक शस्त्रक्रिया व प्रक्रिया 

● पोट व जठर शस्त्रक्रिया

● कार्डियाक आणि कार्डियाथोरासिक सर्जरी

● बालरोग शास्त्रक्रिया

● प्रजनन व मूत्ररोग शस्त्रक्रिया

● मज्जातंतू विकृतीशास्त्र 

● कर्करोग शस्त्रक्रिया 

● वैद्यकीय कर्करोग उपचार

● रेडिओथेरपी कर्करोग

● त्वचा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

● जळीत 

●पॉलीट्रामा

● प्रस्थोसीस

● जोखिमी देखभाल

● जनरल मेडिसिन 

● संसर्गजन्य रोग 

● बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन 

● हृदयरोग

● नेफरोलॉजी

● न्यूरोलॉजी 

● चर्मरोग चिकित्सा

● रोमोटोरोलॉजी 

● इंडोक्रायनोलॉजी

● मेडिकल गेस्ट्रोलॉजी

● इंटरनॅशनल रेडिओलॉजी…





महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत समाविष्ट रुग्णालय - 

या योजनेमध्ये 30 पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय निम शासकीय संलग्न खाजगी तसेच धर्मादायक संस्थेच्या रुग्णालयाची निवड काही निकषांना अधीन राहून करण्यात आलेले आहे. लाभार्थी त्यांच्या इच्छेनुसार राज्यातील कोणत्याही अधिकृत रुग्णालयातून मोफत उपचार घेऊ शकत आहे. या योजनेमध्ये खाजगी आणि शासकीय असे एकूण ९७३ रुग्णालयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

टोल फ्री नंबर : १८००-२३३-२२०० / १५५३८८



         शासनाची अधिकृत वेबसाईट येथी क्लिक करून भेट द्या.



















Post a Comment

0 Comments

close