Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Lost person : परागंदा झालेल्या अर्थात हरवलेल्या व्यक्तीची वारस नोंद आणि कुटुंबाचे वाटपपत्र कसे करावे ?

Lost person : परागंदा झालेल्या अर्थात हरवलेल्या व्यक्तीची वारस नोंद आणि कुटुंबाचे वाटपपत्र कसे करावे ? 




How to register the heirs and family allotment of a lost person?


                       महाराष्ट्रामध्ये अशा काही घटना आहेत की काही व्यक्ती घर सोडून निघून गेलेल्या असतात. तर काही व्यक्ती कुठेतरी हरवलेल्या असतात. अशा कुटुंबाच्या एकत्रित जमीन जुमला, घर आणि शेत जमीन यांच्या वारस नोंदी करणे किंवा वाटप पत्र करणे कामी अशा हरवलेल्या किंवा परागंदा झालेल्या व्यक्तीची खूप मोठी कायदेशीर अडचण निर्माण होत असते. त्यामुळे अशा कुटुंबाच्या वारस नोंदी किंवा वाटप पत्र हे वर्षानुवर्षी प्रलंबित असते.

साधारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वारस नोंद ज्या व्यक्तीची करायची आहे, त्या व्यक्तीचे निधन झालेले असले पाहिजे. तसेच त्याची कागदपत्रे म्हणून  मृत्यूचा दाखला उपलब्ध असणे आवश्यक आहे. ज्यावेळी एखादी व्यक्ती घर सोडून निघून जाते किंवा हरवलेली असते अशा व्यक्तीला ठराविक काळ अर्थात काही वर्षे जाईपर्यंत मृत घोषित करता येत नाही. जेव्हा कोणी व्यक्ती होते किंवा हरवली जाते तेव्हा नातेवाईकांनी किंवा त्यांच्या परिचितांनी अशा व्यक्तीची हरवल्याची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणे आवश्यक आहे.

अनेक प्रकरणांमध्ये अशा व्यक्ती हरवल्यानंतर किंवा घरातून निघून गेल्यानंतर त्यांचे नातेवाईक हे कधीही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत नाही आणि अशा नोंदी आढळत नाही. तर ती व्यक्ती नक्की कधीपासून हरवली आहे, ती कालगणना कशी करायची हे असे किचकट प्रसंग टाळण्यासाठी परागंदा झालेल्या किंवा हरवलेल्या व्यक्तीची पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. हरवल्याची किंवा निघून गेलेली अससेल तर तक्रार दाखल केल्यानंतर कमीत कमी बारा वर्षानंतर अशा व्यक्तीला कायदेशीर मृत घोषित केलं जातं. 


येथे क्लिक करून पीएम किसन योजनेच्या E- KYC यादीत नाव तपासावे


अशा प्रकरणांमध्ये पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली तक्रार आणि इतर कायदेशीर पुरावे जमा करून सदर प्रकरण न्यायालयामध्ये दाखल केले जाते. सदर न्यायालय पोलिसांना चौकशीचे आदेश देऊन चौकशी अहवाल सादर करण्यास कळवते. पोलिसांनी चौकशी अहवाल सादर केल्यानंतर न्यायालय अशा व्यक्तीला मृत घोषित करते. न्यायालयामध्ये युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीशांची खात्री पटली की अशा व्यक्तीला न्यायालय मृत घोषित करते आणि तसा आदेश पारित करून प्रकरण दाखल करणाऱ्याला तसा दाखला दिला जातो. 

 जोपर्यंत परागंदा झालेल्या किंवा हरवलेल्या व्यक्तीला मृत घोषित केले जात नाही तोपर्यंत अशा व्यक्तीच्या कुठल्याही प्रकारची वारस नोंद, वाटप पत्राची नोंद करता येत नाही. तसेच अशा व्यक्तीची एखादी शेत जमीन किंवा इतर संपत्ती सुद्धा विक्री करता येत नाही.  जरी अशा प्रकारचे व्यवहार केले तरी ते भविष्यामध्ये बेकायदेशीर होऊन सदर व्यवहार रद्द होऊ शकतो.


Post a Comment

1 Comments

POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH

close