Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरेगाव भीमाच्या दंगलीचा आरोप असणारे संभाजी भिडे यांच्याबद्दल या १७ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?




हिंदुत्ववादी वक्तव्याने देशभर सतत चर्चेत असणारे संभाजी भिडे यांच्याबाबत या १७ गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?
 





                    पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील दंगली नंतर संभाजी भिडे हे नाव देशभर चर्चेत आले आहे. तसेही संभाजी भिडे हे नाव त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी वक्तव्याने सतत चर्चेत असते. संभाजी भिडे नक्की कोण आहेत आणि ते काय काम करतात हे सांगणाऱ्या या १७ गोष्टी...

१) संभाजी भिडे हे सांगली शहरात राहतात. त्यांचं वय ८५ किंवा त्याहून अधिक आहे. त्यांचं मूळ नाव श्री. संभाजीराव विनायकराव भिडे असं असून त्यांना गुरुजी पण म्हटले जात आहे. तसेच ते सांगली येथील आहेत.


२) सांगलीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पुतणे. सन १९८० दरम्यान संभाजी भिडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. तसेच त्यांचे शिक्षण एमएस्सी पर्यंत झालं आहे, असे श्री. प्रमोद जाधव सांगली यांनी सांगितले आहे.



'संभाजी भिडे' यांनी सांगली शहरात आणि जिल्ह्यात संघाच्या बांधणीच आणि प्रचाराचं काम हाती घेतले होते परंतु काही पदाधिकारी यांच्या बरोबर त्यांचे मतभेद निर्माण झाल्यानंतर त्यांनी संघाचा त्याग केला. त्यांनी संघ नाही पण संघासारखीच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही प्रति संघटना स्थापन केली आणि संघाच्या धर्तीवर वेगळ्या प्रकारचे उपक्रम त्यांच्या संघटने मार्फत चालू केले. याबाबत स्वतः भिडे यांनी किंवा संघाने कधीच स्पष्टीकरण दिलेले नाही. याबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही.


गडकोट मोहिमेत अनवाणी चालताना
 


३) भिडे यांनी छत्रपती श्री. शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज यांना दैवत मानून हिंदवी स्वराज्याचा इतिहास विस्तृतपणे महाराष्ट्रातील तरुण पिढीला समजावून सांगितला. सन १९९० नंतर 'बाबरी मशीद आणि प्रभू श्रीराम जन्मभूमी' वाद निर्माण झाला तेंव्हा भिडे यांच्या 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान' या संघटनेला जोरदार प्रतिसाद मिळू लागला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा हिंदुत्ववादी संघटनांना अपेक्षित असलेला आणि खरा इतिहास ते त्यांच्या जाहीर व्याख्यानांमध्ये सांगतात.



सांगली जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते आणि संभाजी भिडे यांचे निकटचे संबंध आहेत. अनेकजण राजकीय पद आणि प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी त्यांच्या संघटनेत सहभागी झालेले दिसून येतात.अनेक आजी माजी आमदार आणि खासदार यांनी भिडे यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या गडकोट मोहिमेत सहभाग नोंदवला आहे.



पंतप्रधान 'श्री नरेंद्र मोदी' आणि श्री. भिडे यांचे संबंध सर्वश्रुत आहेत.



४) श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या भक्ती शक्ती पुणे उपक्रमा दरम्यान सन २०१७ मध्ये जून महिन्यात पुण्यातील ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गात अडथळा आणल्याचा आरोप श्री. भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आला होता.


         श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते 'धारकरी श्री. अशोक शिंदे' मुंबई यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना वरील आरोप बिनबुडाचा आणि धादांत खोटा असल्याचं सांगितले आहे. श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे यशस्वी उपक्रम आणि निस्वार्थी पणे वाढणारे संघटन विरोधकांना पाहवत नाही आणि त्यातूनच असे आरोप केले जातात असंही त्यांनी सांगितले.


 संभाजी भिडे 


५) सन २००९ मध्ये श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेसह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी 'जोधा अकबर' या हिंदी चित्रपटाला विरोध केला होता. त्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कराड भागात तणाव निर्माण झाला होता. 

६) सन २०१७ मध्ये संभाजी भिडे यांच्यावर कोरेगाव भीमा येथील दंगल भडकवली म्हणून आरोप केला जात आहे. परंतु दंगलीच्या दिवशी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्या आईच्या मातृशोक सभेत सहभागी झाल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये अगोदरच प्रसिद्ध झाले होते. त्याचप्रमाणे दंगली अगोदर भिडे दंगल भागात दोन वर्षे आले नव्हते. असे त्यांचे कार्यकर्ते आणि धारकरी सांगतात.

७) श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेची स्थापना सन १९८४ मध्ये झाल्याची नोंद त्यांच्या संघटनेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

८) 'हिंदू समाजा' ची उगवती तरुण पिढी ही 'छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज' रक्त गटाची बनवणे हेच ध्येय श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आहे. असे त्यांच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आलेले आहे.

९) श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक भिडे, अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई यांच्यासह संघटनेचे धारकरी यांनी किल्ले श्री. रायगडावर ३२ मण वजनाचे सोन्याचं सुवर्ण सिंहासन बसवण्याचा संकल्प केला आहे. 

१०) श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत धर्मवीर संभाजी बलिदान मास, श्री. दुर्गामाता दौड, धारातीर्थ यात्रा, भक्तीशक्ती संगम, शिवराज्याभिषेक दिवस, शिवचरित्र पारायण इत्यादी उपक्रम राबविले जात आहेत. असे त्यांच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.

११) भिडे हे सांगली शहरातील गावभाग परिसरात राहतात. सांगलीचे स्वरूप कुलकर्णी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की श्री. भिडे गुरुजी यांची राहणी अगदीच साधी आहे. त्यांचे स्वतःच्या मालकीचे घर नाही, त्यांच्या नावे कोणत्याही प्रकारची स्थावर मालमत्ता आणि वाहन नाही. परंतु त्यांची संपत्ती म्हणून काही शेकडो पुस्तके आणि दोन जोडी सदरा आणि धोतर हेच आहे.

१२) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भिडे यांची सार्वजनिक भेट २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर श्री. किल्ले रायगडावर झाली होती. त्यावेळी गडकोट मोहिमेचा समारोप होता. 

१३) संभाजी भिडे हे गेली ६० वर्षे झाली आहेत ते त्यांच्या घरी गेलेले नाहीत. एका गडकोट मोहीमे दरम्यान श्री. सज्जनगड येथे ते तब्बल ५५ वर्षांनंतर त्यांच्या बहिणीला भेटले होते, तेही केवळ ५ मिनिटे यावरून त्यांची कार्यमग्नता दिसून येते.

१४) त्याचप्रमाणे समाजातील अनेक वाईट प्रवृत्तीच्या आणि व्यसनी तरुणांना संघटनेच्या माध्यमातून निर्व्यसनी करून समाजात आदर्श निर्माण केला आहे. तसेच संघटनेच्या मार्फत महापूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती वेळी आपत्कालीन मदत उपलब्ध करून गृहपयोगी साहित्य वाटप केले आहे.

१५) श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत श्री. रायगड येथे गेली ३० वर्षे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीची नित्यपूजा अखंडपणे चालू आहे. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ श्री. क्षेत्र वढू बुद्रुक येथेही नित्यपूजा अखंडपणे चालू आहे.

१६ ) श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत भविष्यात किल्ले श्री. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्ण मूर्तीसह सोन्याचे ३२ मण सुवर्ण सिंहासन उभारणी करण्यात येणार आहे. 


             अशी माहिती श्री. जयराम शेळके बीड यांनी दिली आहे. ही माहिती त्यांच्या वेबसाईटवर पण उपलब्ध आहे. तसेच शेळके पुढे असेही म्हणाले की,


 किल्ले श्री. रायगडावर सोन्याचे ३२ मण सुवर्ण सिंहासन उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे 'मनोहर भिडे' असे कपोलकल्पित नाव घेऊन नाहक बदनामी केली जात आहे. वास्तविक पाहता त्यांचे नाव 'श्री. संभाजीराव विनायकराव भिडे' असे आहे. याच नावाने त्यांची शासकीय कागदपत्रे उपलब्ध आहेत.


१७) पिंपरी चिंचवड येथील श्री. सचिन थोरात म्हणाले की, 'श्री. संभाजी भिडे' हे ब्राम्हण आहेत. म्हणून त्यांना समाजातील एका विशिष्ट लोकांकडून बदनाम केले जात आहे. वास्तविक पाहता त्यांच्या संघटनेत जाती पातीला थारा नाही. संघटनेत सर्व जातीचे तरुण हे केवळ हिंदू आणि हिंदू म्हणूनच एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत.

           आपणाकडे अधिक माहिती असेल तसेच आपणाला आमच्या लेखातील माहिती कशी वाटली हे कंमेंट करून नक्की कळवा धन्यवाद !



Post a Comment

0 Comments

close