पुणे : Land Record म्हणजे जमिनीचे दस्त ऐवज नोंदी होय. पूर्वी शेत जमिनीचा नकाशा काढायला तालुक्याच्या गावाला
जायला लागत होते. आणि मग त्या भूमी अभिलेख खात्यातील भोंगळ कारभार कसा असतो हे आजही तुम्हाला माहिती असेलच.
शेतजमीन खरेदी आणि विक्री संबंधित कोणताही व्यवहार करायचा असेल तर त्या जमिनीचा इतिहास माहिती असणे आवश्यक आहे. इतिहास म्हणजे नेमके काय? तर त्या शेत जमिनीच्या पूर्वीच्या नोंदी, ती जमीन कोणाच्या नावावर होती आणि आता कोणाच्या नावावर आहे हे होय. अर्थात त्याला इंग्रजीत Land Record असे म्हणतात. म्हणजे त्या जमिनी बाबत किंवा आपली जमीन विकायची नसली तरी आपल्या जमिनीबाबत इत्यंभूत माहिती असणे आवश्यक आहे.
आपल्या शेतजमिनीचा नकाशा मोबाईलवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अनेकदा खरेदी विक्री व्यवहार होताना आपल्याला जमीन खरेदी खत करताना गट नंबर हा वेगळा दिला जातो आणि जमीन ताबा देताना वेगळ्या गट नंबरचा दिला जातो. त्यामुळे भविष्यात न्यायालयात दावा दाखल करून कायदेशीर लढाई लढावी लागते. त्यामध्ये आपले पैसे, वेळ आणि श्रम वाया जाते. त्यामुळे आपले अपरिणीत नुकसान होते.
असे नुकसान टाळण्यासाठी आपल्या वेळोवेळी आपल्या जमिनीचे ७/१२ उतारे, ८ - अ उतारे, नकाशे, चतुरक्षिमा आणि फेरफार काढून आपल्या घरच्या दप्तरी दाखल करावेत.
1880 पासूनचे जुने ७/12 उतारे, 8 अ चे खाते उतारा आणि फेरफार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH