Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेतीच्या ७/१२ आणि ८ - अ उताऱ्यावरील एकुमॅ म्हणजे काय ? त्याचा आणि कुटुंबाचा काय संबंध ? अधिक माहितीसाठी वाचा


भारत हा कृषी प्रधान देश आहे. आणि भारतात एकत्र कुटुंब पद्धत आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक हे एकत्र कुटुंबाचा भाग आहेत. त्यामुळे घरातील कर्ता पुरुष घरातील शेती आणि शेतीशी निगडित कामे पाहत असतो. 


  

शेतीच्या ७/१२ आणि ८ - अ उताऱ्यावरील एकुमॅ म्हणजे काय ? त्याचा आणि कुटुंबाचा काय संबंध ? अधिक माहितीसाठी वाचा



Image secure :  arjun said 


 एकत्र कुटुंबाचा मॅनेजर 


पुणे - घरातील कर्त्या पुरुष किंवा महिला खातेदाराचे निधन झाल्यावर त्याच्या सर्व वारसांच्या ऐवजी त्या कुटुंबातील एका ज्येष्ठ सदस्यांची नोंद एकत्र कुटुंबाचा मॅनेजर म्हणून केली जात असे.


पूर्वी अशा नोंदी मोठ्या प्रमाणात केल्या जात असत. त्यामुळे जमीन मालकाच्या नावाखाली असे लिहिलेले आढळते. कुटुंबातील अन्य व्यक्तीला लहान असल्यामुळे अज्ञानी असल्याने घरातील कर्त्या व्यक्तीची नोंद एकत्र कुटुंबाचा मॅनेजर म्हणून केली जात असे. अशी जरी नोंद सातबारा ( ७/१२ ) आणि ८ - अ वर करण्यात आली असली तरी सदर व्यक्ती ही एकटी जमिनीचे मालक ठरु शकत नाही. ही नोंद रद्द करून जमिनीवर इतर व्यक्तींची नावे लावायचे असतात. त्यासाठी तहसीलदारांकडे रीतसर अर्ज सादर करावा लागतो. त्यानुसार तलाठी सूचना पत्र काढून स्थानिक चौकशी करून जबाब घेऊन इतर वारसांची नावे लावण्याकरता ठराव वारस नोंद करतात. मंडळाधिकारी यांनी ती नोंद प्रमाणित केल्यानंतर त्याचा अंमल केला जातो. त्यानुसार वारसांची नावे सातबारा उताऱ्यावर लावली जातात.


जमीन -एकत्र कुटुंब मॅनेजर - 

महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड ४ पान क्र १४४ यावर हिंदू उत्तराधिकार कायदा १९ नुसार मयत खातेदार यांचे वर्ग १  वारस ते वर्ग चार वारस नमूद केले आहेत.

त्याच प्रमाणे सदर नियमपुस्तिके तील पान क्र १४७ यावर वारसा हक्क गाव नमुना ६ क मध्ये मयत खातेदार यांची जमिनीचे ७/१२ अभिलेख यावर कबजेदार सदरी नावे नोंद करण्यासाठीची पद्धती नमूद केली आहे.

त्यात नमूद आहे की वारसा मध्ये जमिनीचे वाटप झाले नसल्यास ७/१२ अभिलेखावर कुटुंब प्रमुख म्हणून केवळ एकाच वारसाची नोंद करावी.

या कुटुंब प्रमुख नोंद करण्याचे पद्धती संदर्भाने महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड 4 प्रकरण 2 मध्ये मूलभूत काळानुसार सुधारणा करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.




       अशा प्रकारे एकत्र कुटुंबाचा मॅनेजर म्हणून एकुमॅ म्हणून घरातील कर्ता पुरुष किंवा ज्येष्ठ व्यक्तीची सातबारा ( ७/१२ ) आठ अ ( ८- अ ) वरती त्याची नोंद असते. 




Post a Comment

0 Comments

close