वाहतूक नियम | Tdaffic Rules : ट्रॅफिक पोलिसाला गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे? जाणून घ्या ट्रॅफिक संदर्भातील नियम
वाहतूक नियम : रस्त्याने जात असताना अनेक वेळा ट्रॅफिक पोलीस गाडी आडवतात. आपला विरोध असताना पोलीस आपल्या गाडीची चावी काढून घेतात. पण त्यांना तसं करण्याचा अधिकार असतो का?
वाहन चालक आणि पोलिस
रस्त्याने गाडी चालवत असताना अनेक वेळा ट्राफिक पोलीस गाडी आडवतात. आणि पोलिस आपल्या गाडीत चावी काढून घेतात. पण त्यांना तसं करण्याचा अधिकार असतो का ? भारतात पोलिसांच्या गैरवर्तनाचे अनेक उदाहरणे आपणाला सतत पाहायला मिळतात. पण अनेकदा आपण चालक सुध्दा पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत असतात. अशा परिस्थितीत एक चालक म्हणून आपल्याला आपले अधिकार माहित असायलाच हवे. आज आपण पाहणार आहोत चावी काढण्यापासून ते इतर काही आवश्यक वाहतूक नियमाबाबत.
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (Registration certificate - आरसी), पोलुशन सर्टिफिकेट (Pollution under control पीयूसी),
इन्शुरन्स डॉक्युमेंट (Insurance document ) आणि
वाहन परवाना (Driving licence) हे नेहमी सोबत ठेवावे. आपण जर स्वतः नियमांचे काटेकोर पालन करत असाल तर आपल्याला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. ही सर्व आवश्यक कागदपत्रे वाहन चालवताना नेहमी सोबत बाळगायला हवीत.
हे नियम आपल्याला माहित असायला हवे
वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने नेहमीच गणेशात असायला हवे. युनिफॉर्मवर बक्कल नंबर आणि त्याचे नाव असावे ते गणेशात नसेल तर तुम्ही पोलीस कर्मचारी यांना ओळखपत्र विचारू शकता. जर त्यांनी ते दाखवण्यात नकार दिला तर आपणही डॉक्युमेंट दाखवल्यास नका देऊ शकता.
जेंव्हा पोलिस आपल्याला थांबवतात तेंव्हा जर दंडाचे पैसे भरण्यासाठी पैसे नसतील, तर आपण ते नंतरही भरू शकता. अशा स्थितीत न्यायालय चलन जारी करते. आणि ते चलन तेही न्यायालयात जाऊन भरावे लागते. या काळात वाहतूक कर्मचारी आपले ड्रायव्हिंग लायसन्स त्यांच्याकडे ठेवू शकतात. आपले चलन कापण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे चालान बुक अथवा ई - चलन मशीन असणे आवश्यक आहे. जर यापैकी काहीच नसेल तर आपले चालान कापले जाऊ शकत नाही. जर ट्राफिक पोलिसाने आपले कुठलेही कागदपत्रे जप्त करण्याचा निर्णय घेतला असेल आणि लगेच जप्त करत असेल तर त्याची पावती मागून घ्यायाला विसरू नका.
पुणे शहर रिंगरोडच्या कामास सुरुवात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करून वाचा
पोलिस गाडीची चावी घेऊ शकतात का ?
एक पोलीस अधिकारी आपल्या परवानगीशिवाय आपल्या गाडीची किंवा दुचाकीची चावी काढून घेऊ शकत नाही. जर ट्राफिक पोलीस तुमच्या गाडीची चावी काढून घेत असेल तर तुम्ही त्या घटनेचा व्हिडिओ बनवू शकता. हा व्हिडिओ तुम्ही त्या भागातील पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवून तक्रार सुद्धा करू शकत आहे. अर्थात एकूणच पोलीस अधिकारी असो व कर्मचारी यांना गाडीची चावी काढून घेण्यास अधिकार नाही.
0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH