Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'तेहतीस कोटी' देव म्हणजे नक्की किती देव याबाबत याबत सखोल माहिती | 'Thirty three crore' God means

      


  'तेहतीस कोटी' देव म्हणजे नक्की किती देव याबाबत याबत सखोल माहिती 






बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटी' देव चा अर्थ 'तेहतीस करोड' देव असाच माहिती असतो. 







'Thirty three crore' God means in-depth information about exactly how many gods


'तैंतीस करोड़' ईश्वर का अर्थ है कि कितने देवताओं के बारे में गहराई से जानकारी



हिंदूंचे तेहतीस कोटी देव आहेत का? ते खरेच संख्येने इतके कुठे आहेत का? आपण या संदर्भात असणारी वास्तव आणि खरी माहिती समजून घेणार आहोत.

                मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञाननिष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट उगीचच या सदराखाली कधीच येत नाही. तरीही जर तसे आपणास वाटले तर निश्चितच आपण समजावे की आपले ज्ञान कमी पडत आहे. आपण धर्माच्या बाबतीत खूपच मागास  किंवा अज्ञानी आहोत, असे समजून चालावे. 

    बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटी' चा अर्थ 'तेहतीस करोड'असाच वाटत असतो.



    तेहतीस कोटी ( हा शब्द संख्या वाचक नाही) देव म्हणजे मोक्षप्रत नेणारे तेहतीस कोटी उपासनेचे मार्ग. कोटी याचा अर्थ अनंत मते तितजे मार्ग या तत्वावर हिंदू धर्म चालतो. प्रत्येकाला उपासनेचे स्वतंत्र आहे. कोणत्याही उपासनेची किंवा मंदिरात जाण्याची आणि भक्ती करण्याची शक्ती नाही पण भक्ती असावी हे नक्की.



खिद्रापूर कोल्हापूर येथील स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हे श्री. कोपेश्वर मंदिर : चित्र दालन पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि पहा.



कुठल्याही प्रकारची माहिती किंवा ज्ञान प्राप्त न करणाऱ्याला वरील अर्थ असाच वाटत असतो. संस्कृत आणि स्वतःच्या धर्माचं ज्ञान प्राप्त असणाराला या गोष्टीच्या बाबतीत सखोल माहिती असते. पण मुळात संस्कृत मध्ये  "कोटी" या शब्दाचा अर्थ करोड नसून 'प्रकार' असा आहे. मग देव किती प्रकारचे असतात. हा भाबडा प्रश्न लगेच उभा राहील. पण आपण योग्य आणि धर्मचारणानुसार माहिती घेऊ या.


                                   कल्पना आणि ज्ञात उपलब्ध माहिती अशी आहे; की ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ देवांना कार्यभार सोपवले आहेत /होते.. त्यामध्ये अष्टसूची ८, रुद्र ११, आदित्य १२, १ इंद्र आणि १  प्रजापती असा समावेश होतो. संपूर्ण माहिती नावासह सूची खाली देत आहोत.


◆ त्यांच्यात ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य, १ इंद्र आणि १ प्रजापती असे ५ स्तर आहेत . आणि प्रत्येकाचे कार्य (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटी (प्रकार / कॅटेगरी - Category / Type) दिलेली आहे.


● अष्टवसूंची नावे - आप, धृव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास. 


● अकरा रूद्रांची नावे - मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.


● बारा आदित्यांची नावे - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरुण, वैवस्वत व विष्णू


● असे एकंदर - ८+११+१२+१+१ = ३३. या सम असे ३३ कोटी ची पूर्ण माहिती.




मंदिर महाराष्ट्रात आहे तर नंदी कर्नाटक राज्यात आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करून वाचा





Immage Secure By - prahaar.in

             


वरील बाबींचे विश्लेषण करायचे झाले तर आपल्याला असे दिसून येईल की ३३ प्रकारच्या शक्तींची नावे आहेत. या शक्ती किंवा देवी, देवता कोणावरही नियंत्रण ठेवत नाहीत, पण साधक यांना आवाहन करून सिद्धी प्राप्त करण्यासाठी या देवी देवतांची साधना करतात. साधना करण्यासाठी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समिधा असे आठ प्रचलित मार्ग योग्य लोकांसाठी उपलब्ध आहेत. आता या काळात भक्ती मार्गाने मुक्ती मिळवण्यासाठी संतांनी नवीन अमृग देखील लोकांना दाखवून दिले आहे. 


तेहतीस कोटी (Thirty three crores) बाबत अर्धवट ज्ञान घेऊन किंवा घरात देव, देश आणि धर्माची आस्था नसणारे किंवा शिकवण नसणारे आणि सर्वधर्मसमभाव मानणारे असल्या चुकीच्या पोस्ट करून स्वतःच अक्कल, ज्ञान पाजळत असतात. शिवाय यांचे बापजादे आणि पिढ्यानपिढ्या ज्या देवाला पूजत आले आणि ज्या संस्कृतीत आणि धर्मात वाढले त्याच बाबतीत यांनी चुकीची विधान करावीत यासारखे कर्मदरिद्री कोणीच नाही. ज्या कर्मान, धर्मांन, देवाण, संस्कृतीने, समाजाने आपणाला नाव, दिलं, मोठं केलं आहे. आपल्या अनेक पिढ्यांचा उद्धार केला आहे. आज त्याच धर्माच्या आस्थेला गालबोट लावायची हिम्मत आणि असले विचार कोठून उपजत असेल हे सर्व कल्पनेच्या पलीकडले सर्व आहे.


 देवाचा द्वेष यांना करायचा नसेलही कदाचित याबत ठाम सांगू शकत नाही. पण देवाच्या अडून एका विशिष्ट धर्माच्या आणि जातीच्या लोकांना लक्ष करायचं असते. पण जो तो कर्मान, कष्टानं मोठा होत असतो. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला वाव / संधी आहे. 

मुळात संस्कृत मध्ये  "कोटी" या शब्दाच्या अर्थ करोड (crores) नसून 'प्रकार' (Type) असा आहे.


त्यामुळे ह्या सर्व धार्मिक बाबींचा व्यवस्थित अभ्यास करून माहिती घ्यावी. तद्नंतर तेहतीस कोटी यावर बोलावे आणि टीका करावी.


धन्यवाद !!!


बारा मोटची विहीर लिंब सातारा बाबत संपूर्ण माहिती येथे क्लिक करून वाचा







Post a Comment

0 Comments

close