Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आता सरकार देणार २५ वर्षे मोफत वीज असा करा ऑनलाईन अर्ज पाहिजे तेवढी वीज वापरा आणि बिल शून्य येणार

 


आता सरकार देणार २५ वर्षे मोफत वीज असा करा ऑनलाईन अर्ज पाहिजे तेवढी वीज वापरा आणि बिल शून्य येणार




● Solar Panel Subside Scheme 


आता पंचवीस वर्षाच्या वीज बिलातून तुमची सुटका होणार आहे. आता घरोघरी सोलर पॅनल लावा यासाठी केंद्र शासनाकडून ४० % अनुदान दिले जाणार आहे प्रत्यक्षात घराच्या छतावरचं सोलर पॅनल बसवण्याची योजना केंद्र शासन सुरू करणार आहे. यामध्ये तुमच्या घराच्या रिकाम्या छतावर अनेक सोलर पॅनल बसवून घरी वीज निर्माण करू शकत आहे. मात्र एवढा मोठा सोलर पॅनल सेटअप बसवण्यासाठी अंदाजे १ लाख २० हजार रुपये खर्च येईल.



हायलाइट्स 


● मोफत विजेची संपूर्ण देशात चर्चा

● केंद्र सरकार सुरू करणार सोलर पॅनल योजना

●  घरगुती वापरासाठी मोफत वीज



दिल्ली : सध्या विजेची समस्या खूप कठीण होत आहे. आता दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत आहे. परंतु पुरवठा हा अखंडित आणि पुरेशा दाबाने होत नाही. त्यामुळे भारतात सध्या मोफत विजेची चर्चा जोरदारपणे चालू आहे. मात्र तुमच्या घरामध्ये एसी, हीटर आणि गिझर सारखे उपकरणे असतील. तर तुम्हाला विजेचे भरमसाठ बिल येईल. तसे तुम्ही कोणत्याही राज्यात अनुदानित वीज बिलाचा आनंद घेऊ शकाल अशी सध्या तरी परिस्थिती नाही. मग अशा परिस्थितीत तुम्हाला २५ वर्षापर्यंत वीज दिलापासून मुक्तता मिळवण्याचा मार्ग आम्ही सांगणार आहोत. यामुळे पुढील पंचवीस वर्षे तुमचे वीज बिल शून्य येणार आहे. ते कसे ? तर त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.



● २५ वर्ष वीज बिलापासून सुटका 


प्रत्यक्षात घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याची ही योजना केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या घराच्या रिकाम्या छतावर सोलर पॅनल बसवून घरी वीज तयार करू शकत आहे. मात्र एवढा मोठा सोलर पॅनल सेटअप बसवण्यासाठी म्हणजेच तुम्हाला दोन किलो वॅटच्या सोलर सिस्टीमसाठी अनुदान वगळता सुमारे १ लाख २० हजार रुपये (एक लाख वीस हजार रुपये) खर्च येईल. घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून ४०% अनुदान दिले जात आहे. अशा सोलर पॅनेल साठी तुम्हाला केवळ तुमच्या खिशातील ७२ हजार रुपये भरावे लागतील. या सौर पॅनलचे आयुष्य जास्तीत जास्त २५ वर्षे असेल. अशा प्रकारे तुम्ही २५ वर्षांपर्यंत वीज बिलातून तुमची सुटका करून घेऊ शकत आहे.







असा करा अर्ज


● सौर योजनेसाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईट https://solarrooftop.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.


● नंतर Apply for solar rooftop वर क्लिक करा. पुढे एक पेज उघडले जाईल.


● त्यानंतर तुम्हाला तुमच्या राज्यानुसार सबसिडी अर्ज भरावा लागेल. 


● पुढे ३० दिवसांच्या कालावधी नंतर वीज कंपनीकडून अनुदान रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.



वातानुकूलित यंत्र, गिझर आणि हिटर किती पण वापरा


मोनोपार्क बायफिशियल तंत्रज्ञाने सौर पॅनल बसवण्यासाठी सरकार अनुदान देत आहे. त्या यंत्रणेला मागच्या बाजूला पॉवर जनरेटर आहे.  हे ४ सौर पॅनल एकत्र जोडून तयार केलेले असतात. तुम्हाला त्याचे २ किलोवॅटचे ४ सौर पॅनेल दररोज ६ ते ८ युनिट वीज निर्माण करून देईल. याच्या मदतीने २ ते ३ पंखे, फ्रीज आणि ६ ते ८ बल्प किंवा ट्यूबलाईट तसेच पाणी पंप, वॉटर हिटर, एसी, गिझर, टीव्ही असे इलेक्ट्रॉनिक उपकरणे त्या मार्फत तुम्हाला चालवता येतील किंवा वापरता येतील.










    


Post a Comment

0 Comments

close