Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Champa Shashti २०२२ : आज चंपाषष्ठी जाणून घ्या शुभमुहूर्त, कथा महादेवाच्या खंडोबा रूपाची केली जाते पूजा




 Champa Shashti २०२२ : आज चंपाषष्ठी जाणून घ्या शुभमुहूर्त, कथा महादेवाच्या खंडोबा रूपाची केली जाते पूजा


श्री. खंडोबा जेजुरी गड



● या दिवशी भगवान शंकराच्या खंडोबाच्या रूपाची पूजा केली जाते. विशेषत महाराष्ट्र कर्नाटकात हे व्रत पाळले जाते. शेतकरी खंडोबाला भगवान शंकराचे अर्थात महादेवाचे रूप मानतात. खंडोबाची पूजा शेतकऱ्यांचे दैवत म्हणून केली जाते.


आज २९ नोव्हेंबर मंगळवार रोजी चंपाषष्ठी व्रत आहे दरवर्षी हे व्रत मार्गशीर शुक्ल षष्ठीत तिला केले जातात. याला उत्तर भारतात बैंगांच्या पूजा असेही म्हणतात. चंपाषष्ठी उरात दोन शब्दांनी बनलेले आहे एक चंपा आणि दुसरी षष्ठी या दिवशी भगवान कार्तिकेला चंपा पुष्प अर्पण केले जाते. आणि षष्ठीतीला यावर त्याला चंपाषष्टी असे नाव देण्यात आले आहे. आजच्या पूजेत वांगी अर्पण करण्याची परंपरा आहे म्हणून या व्रताला बैंगन छठ म्हणतात. या दिवशी भगवान शंकराच्या खंडोबाच्या रूपाची पूजा केली जाते. विशेष कर्नाटक महाराष्ट्र या राज्यात हे व्रत पाळले जात आहे. शेतकरी खंडोबाला भगवान श्री.शंकराचे अर्थात महादेवाचे रूप मानतात खंडोबाची पूजा शेतकऱ्यांच्या दैवत म्हणून केली जाते.


चंपाषष्टी मुहूर्त : २०२२ 


● मंगल शुक्ल पक्ष षष्ठी तिथीचा प्रारंभ २८ नोव्हेंबर सोमवारी दुपारी १ वा. ३५ मि.

● मार्गशीर्ष शुक्ल पक्ष षष्ठी समाप्त आज मंगळवार सकाळी ११ वा. ४ मि.च्या

● सकाळची पूजेची वेळ ६.४५ वा. ते ८.५ वा.

● दुपारच्या पूजेची वेळ १२. ६ वा. ते २.४६ मि.

● ध्रुयोग सकाळी आज सकाळपासून दुपारी २..०० ते २.५३पर्यंत

● रवी योग सकाळी ६.५५ वा. ते ८.३८ वा.पर्यंत

● द्विपुष्कर योग सकाळी ११.०४ ते उद्या सकाळी ६.५५ वा.पर्यंत



चंपाषष्ठीचे वरत व उपासना पद्धत


आजच्या शुभ मुहूर्ता खंडोबाची पूजा करावी यादरम्यान शिवलिंगाला गंगेच्या पाण्याने आणि गायीच्या दुधाने अभिषेक केला जातो त्यानंतर त्यावर बेलपत्र फुले गुलाल वांगी बाजरी साखर इत्यादी अर्पण केले जातात धार्मिक मान्यता नुसार प्रार्थना पाठ केल्याने दुःख दूर होते आणि इच्छा पूर्ण होतात भगवान शिव आपल्या भक्तांचे रक्षण करतात पूजेनंतर बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत प्रसाद म्हणून वाटले जातात तर भगवान कार्तिकेच्या पूजेमध्ये चंपा फुले विशेष अर्पण केली जातात तो आपल्या भक्तांना सुख समृद्धी आणि मोक्ष देतो भविष्य प्राण्यानुसार भगवान कार्तिकी चंपाषष्टीला देवतांच्या सैन्याचे सेनापती झालेले असतात या तिथीलाच कुटुंबावर रागावून त्यांनी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगावर मुक्काम केला.



श्री. महादेवाचे मंदिर महाराष्ट्रात तर नदी कर्नाटकात असे एकमेव मंदिर येथे क्लिक करून वाचा



बैंगन छटा ची कहाणी 


पौराणिक कथेनुसार महादेव आपल्या भक्तांचे मनीमाला नावाच्या दोन राक्षसांपासून संरक्षण करण्यासाठी प्रकट झालेले असतात मार्गशीर शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी खंडोबा नावाच्या ठिकाणी महादेवाचे भैरवाचे रूप धारण करून मनी मल्हाचा वध केला. त्यामुळे त्यांना खंडोबा म्हटले जाऊ लागले. दरवर्षी या तिथीला बैंगन चट साजरी केली जाते आणि भगवान शिवाची पूजा केली जाते.


मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला तेव्हा त्यांनी शरण जाऊन तुमच्या नावा अगोदर  माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली. त्यावर मार्तंड भैरवाने तेही मान्य करून तथास्तु म्हटले आणि  तेव्हापासून त्यांना 'मल्हारी मार्तंड' असे म्हटले जावे लागेल.


चंपाषष्ठी जेजूरी 


चंपाषष्ठीच्या शुभ मुहूर्तावरती महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी महादेव अर्थात खंडोबाचे मंदिर आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चंपाषष्टीची पूजा पाठ आणि यात्रा उत्सव साजरा केला जातो. जेजुरीतील खंडोबारायाच्या मंदिरामध्ये दरवर्षी चंपाषष्ठी साजरी केली जाते. आणि वांग्याचा नैवेद्य दाखवून त्याचा प्रसाद भाविकांना वाटला जातो.


श्री.खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्ट च्या वेबसाईटला येथे क्लिक करून भेट द्या



चंपाषष्ठी पूजा जेजूरीच्या धर्तीवर श्री. खंडोबा मंदिर सणसवाडी 


सणसवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील खंडोबाच्या आळी या ठिकाणी सुद् श्री. खंडोबामंदिर असून ते एक जून पुरातन सणसवाडी करांनी स्थापित केलेलं खंडोबाचं मंदिर आहे.. खंडोबाच्या मंदिराचा ग्रामस्थांनी लोक वर्गणीतून जीर्णोद्धार केलेला आहे. या जीर्णोद्धारानंतर या मंदिरातील नित्य पूजाच्या करण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी उचललेली आहे चंपाषष्ठीची पूजा निमित्त श्री. महादेव खंडोबाची भव्य सवाद्य मिरवणूक काढली जाते. गाव प्रदक्षिणा ते ग्रामदैवत श्री. भैरवनाथ मंदिर ते खंडोबाचे मंदिर अशी पालखी प्रदक्षिणा असते. या उत्सव सोहळ्यामध्ये सणसवाडीतील सर्व ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक सहभागी होतात. देवांची मिरवणुक सवाद्य पारंपरिक वाद्यांमध्ये काढली जाते. त्याचप्रमाणे हा उत्सव सलग तीन दिवस साजरा केला जातो. कीर्तन, भारुड, प्रवचन आणि पूजा होम हवन इत्यादी धार्मिक विधी केले जातात. त्याचप्रमाणे भाविकांना तीन दिवस महाप्रसादाचा लाभ देण्यात येत असतो. या कार्यामध्ये गावातील स्थानिक तरुण आणि गाव पातळीवरील ग्रामपंचायत प्रशासन, उद्योजक यांचा सक्रिय सहभाग असतो. या उत्साहाला मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण केली जाते आणि हजारो लोकांचा महाप्रसाद या ठिकाणी वाटला जात असतो. या चंपाषष्ठीच्या यात्रेची ओढ आजूबाजूच्या ग्रामस्थांना सुद्धा असते. आणि या मंदिराच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील नागरिक दरवर्षी येत असतात.



श्री. खंडोबा मंदिर सणसवाडी


श्री. खंडोबा मंदिर सणसवाडी चित्र दालन

























Post a Comment

0 Comments

close