Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्री.शंकर महादेवाचे मंदिर महाराष्ट्रात तर मंदिरातील नंदी कर्नाटकात असलेले एकमेव मंदिर

 श्री.शंकर महादेवाचे मंदिर महाराष्ट्रात तर मंदिरातील नंदी कर्नाटकात असलेले एकमेव मंदिर 



Immage Secure By - wikipedia.org




The temple of Shri Shankar Mahadev is in Maharashtra and Nandi is the only temple in Karnataka


कोपेश्वर मंदिर खिद्रापूर  - 


कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे दगडी पुरातन मंदिर आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले असून कट्यार काळजात घुसली मराठी चित्रपटातील शिव भोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाले होते. त्यामुळे पूर्वी काहीच्या दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओढा वाढू लागलेला आहे. 


 या मंदिरासंदर्भात एक आख्यायिका आहे. येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून येथे येऊन बसलेला. दक्षकन्या सती तिच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. त्याची समजूत काढण्यात कोणीतरी हवे होते. ते काम श्री. विष्णूने केले. त्यांचे नावे कोपेश्वर मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिराप्रमाणे या मंदिरात नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकामुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. हा नंदी पासून२२ किलोमीटर दूर नैर्ऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. येथे फक्त नंदीचे मंदिर आहे. असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे. आणि येथील मंदिरातील नंदी पश्चिमेकडे तोंड करून बसला आहे. 

हे पण वाचा - छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ त्यांची कामे आणि त्यांचा पगार


                              यासंदर्भात आपण ऐतिहासिक माहिती घेणार आहोत. साधारण सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या मंदिराच्या उभारण्याची सुरुवात झाली असावी. पुढे अकराव्या किंवा बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनी सुद्धा या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलुर हळेबिड साम्य दर्शविणारे आहे. अशा प्रकारचा इतिहास या मंदिरात लाभलेला आहे. मंदिराचे सौंदर्य देवळाबाहेर अर्थात मंदिराबाहेर ४८  खांबावर कोरलेला एक मंडप आहे. या मंडपाला पूर्ण छत नाही. एक वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आलेली आहे. या मंडपाच्या वापर यज्ञ करण्यासाठी होत असे. त्यामुळे होमाचा धूर बाहेर जाण्यासाठी ती जागा आहे. त्याला स्वर्गमंडप असे म्हटले जाते. 

                            आता आपण पाहणार आहोत मंदिराची रचना कशी आहे. मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे. गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या या चित्रांची ओळख आहे. अंतराळ आणि मंडप छप्पर अस्तित्वात नाही. मंडपापासून काहीसा विलग असलेल्या खुल्या मंडपाला स्वर्गमंडप म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्याला कधीच छत नव्हते. कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून सर्वात पुढच्या बाजूस  मुखमंडपाऐवजी त्रिरथ तलविन्यासाचा पूर्णमंडप आहे. मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिळा असून सून तिच्याभोवती अपूर्ण घुमटाकार छताला पेलणारे बारा स्तंभ आहेत. या स्तंभांच्या आतील भागावर कार्तिकेय आणि अष्टदिक्पाल वाहनांसह दाखवलेले आहेत. या बारा स्तंभांच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत.


हे पण वाचा - 'तेहतीस कोटी' देव म्हणजे नक्की किती देव याबाबत याबत सखोल माहिती


 

                           स्वर्ग मंडपाच्या आतल्या बाजूस सभामंडप आहे. या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच स्तंभ व त्याखालील कोंडाळ्यात व्याल आहे. सभामंडपाच्या मधल्या बारा स्तंभांभोवती वीस चौकोनाकृती स्तंभ आहेत. या  स्तंभांच्या पलीकडे सभामंडपाच्या भिंती आहेत. सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्ष आहेत. मंडपातून अंतराळात जाताना प्रवेश मार्गापासून दोन्ही बाजूला द्वारपालाच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे द्वार पंचशाख प्रकारचे आहे. गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत.. 



Immage Secure By - wikipedia.org


              सभा मंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत. त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूपच सुंदर दिसतात.  दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला ५५  द्वारपाल आहेत. मुख्य सभामंडप आणि खूप सुंदर आणि छान आहे. पुढे गर्भगृहात प्रवेश होताना प्रवेशद्वाराच्या रांगोळी सारखे सुरेख नक्षी कोरलेली दिसते. गर्भगृह जरासे अंधारे आहे. परंतु डोळे चोळल्यानंतर आत मध्ये सुंदर मूर्ती दिसतात. असे लक्षात येते या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा आकार प्रमाणबद्धता विशेष उठून आणि आकर्षक दिसतात. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू नितांत सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहेत. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव-रेखीव मानवी आकृती सुमारे पाच-सहा फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूनी हत्ती कोरलेले आहेत.  उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदी वजा आकृती दिसते त्यावर रथामध्ये एक जोडपे बसलेले आहे. असे लक्षात येते सभा मंडपाच्या दक्षिण दरवाज्यावर एक पुरातन शिलालेख आहे. ऊन-पावसाचा मारा खात शिलालेख अजूनही शिल्लक असून दिमाखात तो इतिहासाची साक्ष आपणाला देत आहे. कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजूला जंगा भाग देव गोष्टी आणि अधिष्ठानाचा थरावर वेगळी आकृती शिल्पे आहेत. या मंदिरावरील सुरसुंदरी शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत. गजथरावर मोठ्या आकाराच्या त्यातून या हत्तींच्या पाठीवर वेदुला देवदेवतांची शिल्पे आहेत.भद्रावरील देवकोष्ठात बैल असून त्यावर शक्तीस अशिव आरूढ झालेला आहे. मंडोवरावरनायिका, विष्णूचे अवतार, चामुंडा गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत, या मंदिराच्या परिसरात काही वीरगळ देखील पाहायला मिळतात, त्या वीरांच्या शौर्याची पराक्रमाची साक्ष या ठिकाणी आपणास दर्शवितात, अशाप्रकारे खिद्रापूरच्या कोपेश्वर अर्थात कोपेश्वर मंदिर महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे, जे मंदिर महाराष्ट्रात असून आणि त्या मंदिराचा नंदी हा कर्नाटक मध्ये आहे.


Post a Comment

0 Comments

close