Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नमस्कार राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा……व्हायरल पत्र




नमस्कार राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा……व्हायरल पत्र 





नमस्कार राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा……


विषय : १) छत्रपती शिवाजी महाराज यांचा सातत्याने अपमान करणाऱ्यांना पदमुक्त करा.

२) बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.


मा. महोदया राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा……


● छत्रपती शिवाजी महाराज - 


छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्र तर त्यांना अस्मिता मानून आपली वाटचाल करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. तंजावर पासून अफगाणिस्तानपर्यंत स्वराज्याचा विस्तार केला. त्याचबरोबर महाराजांनी समाजामध्ये स्वराज्याची भावना रुजवली. तोच विचार आपण पुढे नेत आहोत. गेल्या काही वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता वापरुन त्यांच्या नावावर राजकारण केले जात आहे. मात्र काही व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करुन महाराष्ट्रातील वातावरण बिघडवले जात आहे. ही बाब आपल्या देशाच्या अस्मितेसाठी अतिशय दुर्दैवी आहे. याकडे अतिशय गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.


सध्या महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार आणि फडणवीस यांचे युतीचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल भाजपचे पदाधिकारी आणि मंत्री त्याचप्रमाणे राष्ट्रपती नियुक्त जे पंतप्रधानांच्या सल्ल्याने नियुक्त केले जातात, ते राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी हे वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलून त्यांचा अपमान करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत आहे. आणि ते एक युगपुरुष, महापुरुष सुद्धा आहेत. 


भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने हिंदुत्वाचे कार्ड वापरून सातत्याने महाराष्ट्राच्या नागरिकांपुढे जाऊन मताचा जोगवा मागत असतात. आणि महाराष्ट्राच्या हिंदू जनतेने तुम्हाला भरभरून मताचे दान दिलेले आहे. ज्या राजाच्या नावाने तुम्ही मत मागतात, त्याच राजांचा अपमान तुम्ही करत आहेत.  ही अत्यंत लाजिरवाणी आणि निषेधार्थ गोष्ट आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागायची असतात. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या बाबतीत मत मांडून त्यांना अपमानित करणे चालू ठेवायचे काम राज्यकर्ते करत आहेत. छत्रपती यांच्या बाबतीत चुकीचा इतिहास सातत्याने मांडून जनभावना दुखावतील अशी वक्तव्य केली जातात. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल सरकारी कार्यक्रमांमधून राज्यपाल भगतसिंग कोषारी हे सातत्याने अपमान होईल अशी भाषणे देत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अर्थात हिंदू जनतेच्या भावना दुखावत आहेत. 


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य


१) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे एकेरी उल्लेख करत आहे अशी ऑडिओ नुकतीच समोर आली आहे. 

२) भगत सिंह कोषारी यांनी गडकरी आणि शरद पवार यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली आहे.

३) आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे अजब वक्तव्य केले आहे.

४) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापुर्वी महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. ही सर्व वक्तव्ये त्यांनी जाहीर कार्यक्रमात केली आहेत.

५)भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी हे इतिहास संशोधक नाहीत तरीही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केले आहे.




या आपत्ती जनक वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा शिंदे सरकार आणि केंद्र सरकार त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांच्यावरती प्रचंड, अति अति तीव्र तीव्र रोष निर्माण झालेला आहे.



राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्रात अडीच वर्षे कारकीर्द होऊन ही त्यांना शिवाजी महाराज समजले नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद असताना ते दिवसेंदिवस आपल्या पदाची प्रतिष्ठा रसातळाला नेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करुन सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्य पाहिली असता त्यांचे आजपर्यंतचे वर्तन अशोभनीय आहे. त्यांना तात्काळ पदमुक्त करा.


ज्यांनी ज्यांनी अशी अगोरी आणि अपमान होईल अशी वक्तव्ये केली आहेत त्यांची तात्काळ पदावरून हाल पट्टी करा. मग ते राष्ट्रीय प्रवक्ते असो वा राजपाल, केंद्रीय मंत्री कोणाचाही मुलाहिजा न ठेवता तात्काळ कारवाई करावी ही विनंती आहे.



● संयुक्त महाराष्ट्र - 


स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.


कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्बई हे सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका घेत आहेत. बेळगाव कारवार निपाणी संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासंदर्भात राजकीय लढाई महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये चालू आहे परंतु राजकीय तोडगा न निघाल्यामुळे महाराष्ट्र सरकार हे सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहेत. त्यामुळे सीमावाद हा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीसाठी प्रलंबित आहे. अशावेळी महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक गावे कर्नाटक मध्ये समाविष्ट करण्याचा छंद बसवराज बौमई यांनी बांधलेला आहे. आणि त्यांच्या चितावणीखोर वक्तव्यामुळे महाराष्ट्र आणि सीमा भाग ढवळून निघत आहे. त्यामुळे तेथील सुरक्षा धोक्यात आलेली आहे. कर्नाटक सरकार सातत्याने मराठी भाषिकांवर साम-दाम दंड भेद निती अवलंबून अन्यायकारक भूमिका घेत आहेत. मराठी माणसाची गळचेपी करणे, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे कुरखोडी करून अन्याय करत आहेत. मराठी भाषा शाळा बंद करून कर्नाटकची कन्नड भाषेची सक्ती करत आहे.


महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आणि आंदोलन करण्यावर सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करून त्यांना जेरीस आणण्याचे काम कर्नाटक सरकार करत आहे मग ते भारतीय जनता पार्टीचे सरकार असेल किंवा अन्य पार्टीचे राज्य सरकार असतील त्यांनी सातत्याने हीच भूमिका घेतलेली आहे.


गेल्या पंधरा दिवसापासून कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने महाराष्ट्र विरोधी भूमिका घेत आहे. काल नुकतीच महाराष्ट्रातील गाड्यांवर आणि बसेसवर कर्नाटकच्या लोकांनी दगडफेक केलेली आहे. विशेषता छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो असलेल्या गाड्या सातत्याने लक्ष करत आहेत, आणि फोडत आहेत. अशा प्रकारचा अन्याय कर्नाटकातील सरकार आणि कर्नाटक धार्जिने लोक करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी जनता यांच्या वरती अन्याय होत आहे. प्रत्येक गोष्टीची सहनशीलता आणि मर्यादा असते. आता कुठेतरी या सहनशीलतेचा आणि मर्यादेचा विस्फोट होण्याची वेळ आलेले आहे.


वरील सर्व प्रकरणांमध्ये मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान असेल संयुक्त महाराष्ट्राचा विषय असेल, महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकारचा विषय असेल याबाबतीत राष्ट्रपती पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी वेळेत दाखल घेणे गरजेचे आहे. अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकतो. आता मराठी जनता आणि मराठी माणूस महाराष्ट्रातील गप्प बसणार नाही. अन्याय सहन केला तर आणखीनच अन्याय होत आहे. आता प्रत्युत्तर देण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने योग्य वेळी योग्य पावले उचलून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज द्यावी. अन्यथा मराठी जनता आपल्या पद्धतीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या राज्यकर्त्यांना योग्य शब्दात आणि योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देण्यास तयार आहे.


महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी मग तो कुठल्याही पक्षाचा असो सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष किंवा सत्तेत नसलेले अन्य पक्ष या सर्वांनी योग्य वेळी भूमिका स्पष्ट करा. आणि सर्वांनी कर्नाटकच्या जुलमी अत्याचाराला विरोध करण्यासाठी आपली भूमिका स्पष्टपणे मांडा. बेळगाव, कारवार, निपाणी आणि बिदरसह कोल्हापूर सांगली जत या भागातील जनतेच्या पाठीमागे ठामपणे उभे रहा.  त्यांना काय हवं आहे?  काय नको आहे? ते कुठल्या असुविधेचा सामना करत आहे. त्यांची तात्काळ पूर्तता करण आवश्यक आहे. 


त्यासाठी नव्याने समिती नियुक्त करून कालमर्यादेत अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन विकास कामे करून घ्या. आणि न्यायालयीन लढा आणखी मजबूत करा.


महाराष्ट्रातील मराठी अर्थात हिंदू जनता कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधलेली नाही. त्यामुळे कुठल्याही पक्षाने आम्हाला गृहीत धरू नये.


अन्यथा येत्या २०२४ ला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चारीमुंड्या चित करून असमान दाखवून  महाराष्ट्रातील जनता भारतीय जनता पक्षाला धडा शिकवेल हे नक्कीच.


Post a Comment

0 Comments

close