वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांना पण हक्क आणि अधिकार असतात का ? वीज चोरी पकडून देणाराला महावितरण बक्षीस देते आहे.
हायलाइट्स
● वीज चोरीवर कारवाई व तडजोड करण्याचा अधिकार
● वीज चोरीबद्दल दंडात्मक व कायदेशीर तरतूदी
● तडजोड रक्कम स्वीकारण्याचा दर
● ग्राहकांसाठी महत्वपूर्ण सुचना
● मिसकॉल नंबर आणि टोल फ्री नंबर
● सर्व विभागतील अधिकारी यांचे संपर्क नंबर
महावितरण आणि वीज ग्राहकांच्या हक्क संदर्भात बोलायचे झाले तर खूप सविस्तर लिहावे लावेल. पण ग्राहकांना मोजक्या आणि नेमक्या शब्दांत जर माहिती दिली तर कमी माहितीत जास्त परिणामकारक दिसून येईल. वीज संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे कायदे वेगवेगळे आहेत. शिवाय प्रत्येक राज्यानुसार त्यामध्ये बदल होत जातो. त्यानुसार वीज नियामक आयोगाची धोरणे वेग वेगळी असतात. मग वीज सेवा, वीज दर, अतिरिक्त शुल्क, वीज चोरी दंड इत्यादीसाठी राज्यानुसार बदल दिसून येतो. महाराष्ट्रातील वीज चोरी संदर्भात ग्राहकाचे काही अधिकार व हक्क आहेत. त्यातील महत्वाचे मुदे आपण आज पाहणार आहोत.
वीज चोरीवर कारवाई व तडजोड करण्याचा अधिकार फक्त पुढील अधिकारी यांना आहेत.
१. शाखा अभियंता,
२. सहाय्यक अभियंता,
३.कार्यकारी अभियंता,
४. दक्षता पथक (भरारी पथक).
वीज चोरीबद्दल दंडात्मक व कायदेशीर तरतूदी पुढील प्रमाणे
१. वीज यंञणेत हस्तक्षेप करूण चोरी करणे कलम १३७ प्रमाणे दंडनिय आहे.
२. कलम १५४ (५) अन्वये ज्या कारणासाठी चोरी केली आहे. त्या कारणाच्या प्रचलित दराच्या दीडपट वीज बीलाची अकारणी करणे बंधनकारक असते.
३. कलावधी निश्चत होत नसल्यास सहा मिहने कालावधी निश्चत समजून प्रचलित दराच्या दीडपट अकारणी केली जाते.
४. वरील दोन्हीं पैकी जी रक्कम कमी असेल तीच अकारणे करणे बंधनकारक असते. किवा असा आदेश विशेष न्यायालय देऊ शकते.
५. पंचनामा करताना फोटो व व्हिडीओ शुटींग केली जाते. व त्यावेळी अधिकारी यांना कागदपञे व वस्तु जप्तीचा अधिकार सुद्धा असतो.
६. पंचनामा हा वीज चोरी व वस्तुंचा स्वतंञ करून पंच, अधिकारी व ग्राहकाची सही असणे बंधनकारक असते.
७. वीज चोरीचा शोध, तपास व जप्ती प्रौढ पुरूष व्यक्ती घरात नसल्यास फक्त दिवसाच करता येईल.
८.वीज कर्मचारी, अधिकारी, भरारी पथक यांनी युनिफाँर्म घालणे व ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक असते. काही शंका असल्यास आपण त्याची मागणी करू शकता.
तडजोड रक्कम स्वीकारण्याचा दर पुढीलप्रमाणे
◆ औद्योगीक सेवा - २०००० /- रूपये प्रती kw
◆ वाणिज्यक सेवा - १००००/- रूपये प्रती kw
◆ कृषी सेवा - २०००/- रूपये प्रती Hp
◆ इतर सेवा - ४०००/- रूपये प्रती Kw
कुठल्याही प्रकरची चोरी करणे हा गुन्हा असुन तिचे समर्थन कोणीच करू शकत नाही. प्रस्तुत माहिती कोठे अन्याय होऊ नये म्हणून दिली आहे. परंतु अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आणि तात्काळ कुठलाही निर्णय घेऊ नये.
महत्वपूर्ण सुचना -
१) जर आपला वीज वापर तथा रिडींग जास्त होत असेल तर दोन किंवा तीन वीज जोडणी करून घ्यावी म्हणजे स्लाँब नुसार वीज बील कमीच येईल. कारण जेवढा वीज वापर जास्त तेव्हढेच वीज बील जास्त येट असते.
२) जर आपल्या जवळपास किंवा आपणांस ज्ञात असलेली वीज चोरीची माहिती आपण Online पद्धतीने www.mahadisco.com वर कळविली तर आपणांस अंदाजे वीज चोरी रक्कम आणि वीज दंडाच्या रककमेच्या २०% रककमेचे बक्षीस दिले जाते. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे वीज चोरी उघडकीस आणणारचे नाव पण गुप्त ठेवले जाते आहे.
मिसकॉल नंबर आणि टोल फ्री नंबर
मिसकॉल नंबर आणि टोल फ्री नंबर मध्ये बदल झाला आहे. त्यामुळे वीज चोरी आणि वीज खंडित होणे, फ्यूज जाणे, तारा तुटणे याबाबत खालील ई - मेल आणि नंबर वर तक्रार दाखल करू शकत आहे.
१) 02250897100, २) 18002333435, ३) 1882333435, ४) 1912, ५) 19120
ई मेल - customercare@mahadiscom.in.


0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH