Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबात किती लोक होते? त्यांना किती मुले, मुली आणि नातवंडे होती ? वाचा सर्व माहिती

  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबात किती लोक होते? त्यांना किती मुले, मुली आणि नातवंडे होती ? वाचा सर्व माहिती


 छत्रपती शिवाजीराजे भोसले - (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्या विरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि त्यांनी इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.

Image Secure By - wikipedia.org


शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल आणि आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्या सोबतच अनेक नवीन किल्लेही त्यांनी उभारले आणि सोबतच राज्य कारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.


 महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजी राजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबा राजे, जाणता राजा, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्म दिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो.  छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख 'शिवशंभू' असा होतो.



छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया (भारताचा शोध) या ग्रंथात म्हणतात : "छत्रपती शिवाजी प्रति हल्ला करणाऱ्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते. जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्य शील आणि उत्कृष्ट नेतृत्व गुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले होते. त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस आले. छत्रपतींचा मृत्यू १६८० मध्ये झाला तरी त्यांच्या नंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्य विस्तार होतच राहिला.


Image Secure By - wikipedia.org



आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती घेणार आहोत. यामध्ये शिवरायांच्या राण्या, त्यांचे पुत्र, त्यांच्या कन्या आणि त्यांची नातवंडे यांचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत.


सर्व साधारणपणे शिवाजी महाराजांचा जन्म (१६३०) ते औरंगजेबाचा मृत्यू (१७०७) ह्या ७७ वर्षांच्या काळास

इतिहासकार ‘शिवकाल’ असे म्हणतात.


◆ शिवाजी राजांना ऐकून आठ राण्या / पत्नी होत्या -


  1. सईबाई निंबाळकर - राणी साहेब सईबाई ह्या फलटणच्या नाईक निंबाळकरांच्या कन्या होत्या. त्या शिवरायांच्या प्रथम पत्नी होत्या. शिवाय त्या शिवरायांच्या पट्टराणी होत्या. सईबाईं राणी साहेबांना शिवरायांचा सहवास इतर राण्यापेक्षा जास्त प्रमाणात लाभला नाही. सईबाईंचा शिवरायांशी दिनांक १७ एप्रिल १६४० ला विवाह झाला होता. शिवरायांना सुख-दुःखात साथ देणाऱ्या सईबाईंचा मृत्यू ५ सप्टेंबर १६५९ रोजी किल्ले श्री. राजगडावर झाला.

  2. सोयराबाई मोहिते - राणीसाहेब सोयराबाई ह्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते पावसचे मोहिते तळबीडकर यांची बहीण होत्या. सोयराबाई मोहिते शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी सईबाईंच्या पश्चात शिवरायांच्या पट्टराणी म्हणून सोयराबाई शिवरायांच्या सोबत होत्या. सोयराबाई आणि शिवरायांचा विवाह बंगळूर येथे १६४२ ला झाला होता.

  3. राणीसाहेब सगुणाबाई - राणीसाहेब सगुणाबाई शिर्के ह्या शिर्के घराण्यातील होत्या. शिर्के घर हे नामवंत सरदारांपैकी एक होते. स्वराज्याची सेवा त्यांनी मानाने केली.

  4. पुतळाबाई पालकर - राणीसाहेब पुतळाबाई ह्या शिवाजी महाराज यांच्या निधनाबद्दल काही दिवसांनी रायगडावरती सती गेल्या होत्या. त्यामध्ये पुतळाबाई यांचा मृत्यू झाला आणि विवाह आणि मृत्यू बाबतीत त्यांचे कागदपत्रांमधून वेगवेगळे संदर्भ मिळतात. 

  5. लक्ष्मीबाई विचारे - राणीसाहेब लक्ष्मीबाई या विचारे घराण्यातील होत्या. ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी होत्या. त्यांचा शिवाजी महाराजांची विवाह इ.स. १६५६ मध्ये झाला होता.

  6. सकवारबाई गायकवाड - राणीसाहेब सकवारबाई ह्या गायकवाड घराण्यातील होत्या. त्यांचा शिवरायांची विवाह १६५७  रोजी झाला होता.

  7. काशीबाई जाधव - राणीसाहेब काशीबाई ह्या स्वराज्यातील जाधव घराण्यातील होत्या. त्यांचा मृत्यू १६ मार्च १६७४ रोजी रायगडावर झाला. 

  8.  गुणवंताबाई इंगले - राणीसाहेब गुणवंताबाई  ह्या स्वराज्यात इंगळे घराण्यातील होत्या.



◆ शिवरायांना दोन पुत्र होते 

Image Secure By - wikipedia.org




सईबाई राणीसाहेब यांच्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांना एक पुत्र झाला होता.


  1. सईबाई पुत्र - छत्रपती संभाजी राजे कालखंड - जन्म १४ मे १६७० पुरंदर पुणे येथे झाला तर मृत्यु ११ मार्च १६८९ तुळापूर पुणे झाला.

  2. सोयराबाई पुत्र - छत्रपती राजाराम राजे कालखंड - जन्म १४ फेब्रुवारी १६७० राजगड झाला तर मृत्यू - ०३ मार्च १७०० किल्ले सिंहगड पुणे येथे झाला.


Image Secure By - wikipedia.org





◆ शिवरायांना एकूण सहा कन्या होत्या- 


  1. राणीसाहेब सईबाई - यांच्यापासून त्यांना तीन कन्या होत्या. 


(१) प्रथम कन्या सकवराबाई उर्फ सखुबाई - ह्या मुलीचे लग्न महादजी निंबाळकर यांच्याशी झाले होते. महाराज निंबाळकर यांचे वडील बजाबा निंबाळकर मुसलमान होऊन बजावत खान झाले होते. छत्रपती शिवरायांनी या बजावत खानाला मराठा केले. परंतु त्यांच्याशी कोणीही रोटी-बेटी व्यवहार करण्यास तयार नव्हते. तेव्हा छत्रपती शिवरायांनी राजकुमारी सखुबाईचा विवाह निंबाळकर यांचा मुलगा महादजी निंबाळकर यांच्याशी लावून मराठा कधीही हटत नाही. हे शिवाजी महाराजांनी जगाला दाखवून दिले. त्याच बरोबर परिवर्तन हे स्वतः च्या घरापासून करावी लागते आदर्श निर्माण केला.


(२) द्वितीय कन्या रानुबाई - द्वितीय कन्या रानुबाई यांचा विवाह चलाजी जाधव यांच्या घराण्यात करून दिला होता.


(३) त्रितीय कन्या अंबिकाबाई - यांचा विवाह हरजी राजे महाडिक यांच्याशी करून त्यांना कर्नाटकची महत्वाची जबाबदारी  

  दिली होती. स्वराज्याच्यासाठी महाडिक घराण्याचे मोठे योगदान होते.


(४) चौथी कन्या - राणीसाहेब सोयराबाई यांच्यापासून एक कन्या झाली होती. कन्या बाळाबाई उर्फ दिपाबाई यांचा विवाह विश्वासरावांशी करून दिला होता.


(५) पाचवी कन्या -राणीसाहेब सकवारबाई यांच्यापासून एक कन्या झाली होती. कन्या कमळाबाई यांचा विवाह सेनापती नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी पालकर यांच्याशी झाला होता.


(६) सहावी कन्या - राणीसाहेब सगुणाबाई यांच्यापासून एक कन्या झाली होती. राजकुंवरबाई उर्फ नानाबाई यांचा विवाह गणोजीराजे शिर्के यांच्याशी करून दिला होता. शिर्के घराण्याचे स्वराज्याच्यासाठी खूप मोठे योगदान होते. 



◆ छत्रपती शिवरायांना नातवंडे होती - 


 ● शिवरायांनी संगमेश्वरचे पिलाजी शिर्के यांच्या कन्या येसूबाई यांचा विवाह युवराज संभाजीराजांशी करून दिला होता. युवराज संभाजींना राणी येसूबाई यांच्या पासून पुत्र प्राप्ती झाली होती. दिनांक १८ मे १६८२ रोजी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला. जे पुढे जाऊन ते सातारा गादीचे वारसदार झाले. छत्रपती शाहू महाराजांचा मृत्यु दिनांक १५ डिसेंबर १७४९ रोजी सातारा येथे झाला.


● छत्रपती राजाराम महाराज यांचे एकूण चार विवाह झाले होते. आणि त्यांना एकूण दोन मुले आणि दोन मुली होत्या.


  1. जानकी राणीसाहेब - त्या प्रतापराव गुजर यांच्या कन्या होत्या. परंतु त्यांना अपत्य प्राप्ती झाली नाही.

  2. ताराराणी राणीसाहेब - सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. यांना छत्रपती शिवाजीराजे दुसरे जन्म - ९  जून १६९६ तर कन्या अंबिकाबाई यांनी यांच्या पोटी जन्म घेतला. ताराराणी ह्या कोल्हापूर गाडीच्या वारसदार  होत्या

  1. राजसराणी राणीसाहेब - त्या कागलकर घाटगे घराण्यातील होत्या.यांना छत्रपती संभाजीराजे दुसरे जन्म २३ मे १६९८). कन्या सोयराबाई यांनी यांच्या पोटी जन्म घेतला.

  2. अंबिकाराणी उर्फ अहिल्याराणी राणीसाहेब - यांना अपत्य प्राप्ती झाली नाही.



        छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेल्या एकूण ८ विवाहांच्या सर्व थिती किंवा तारखा आजवर उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक साधनांमधून समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे सर्व इतिहास अभ्यासकांमध्ये वेग-वेगळी मते आहेत. छत्रपती शिवरायांच्या प्रथम पत्नी सईबाईसाहेब आणि आठव्या पत्नी गुणवंताबाईसाहेब वगळता इतर पत्नींचा वैवाहिक क्रम मागे पुढे झालेला पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण आठ विवाह झाले होते. यावर मात्र सर्व इतिहासकारांमध्ये एकवाक्यता आहे.


मराठा साम्राज्याचा द्वज

Image Secure By - wikipedia.org




            राजमाता जिजाऊची छत्रपती शिवाजी महाराजांचे एकापेक्षा जास्त विवाह करण्यामागे दूरदृष्टी होती. मावळ खोऱ्यातील वीर मावळ्यांच्या घरांशी त्यांनी जाणीवपूर्वक नाती जोडली होती. एकाच वेळी अनेक सोयरीकीमुळे ते मावळे घराणे आणि त्यांच्याशी संबंधित सभोवतालची खेडी आपोआप शिवरायांशी पर्यायाने स्वराज्याशी जोडली जात असे. माँसाहेब जिजाऊंच्या या दूरदृष्टीपणामुळे मावळ्यांमधील पिढीजात वैर संपुष्टात येऊन सर्वजण स्वराज्य या एकाच धाग्याने बांधले गेले होते. त्याचा उपयोग स्वराज्य विस्तार कार्यासाठी होऊ लागला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुला-मुलींचे लग्न स्वराज्यातील सामान्य पण कर्तबगार व शूर मावळ्यांशी केले. ते करत असताना संपत्तीचा वायफळ खर्च न करता त्यांनी विवाह सोहळे अत्यंत साध्या पद्धतीने केले. मुला-मुलींच्या लग्नात कोणाला हुंडा दिला नाही आणि त्यांनी पण घेतला नाही. असा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला होता.

       वरील माहिती उपलब्ध साधनानुसार प्रकट केली आहे. त्यामध्ये काही चूक असेल तर कमेन्ट करून नक्कीच कळवा. कारण इतिहासात चुकीला स्थान दिले तर अनेक गैरसमज निर्माण होत असतात. त्यामुळे आम्ही अचूक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जे विवादास्पद आहे त्याचा उल्लेख करणे टाळले आहे. 

    माहिती आवडली तर नक्कीच शेअर करा. आणि अभिमानाने जय शिवराय आणि हर हर महादेव कमेन्ट करा.

धन्यवाद !



Post a Comment

0 Comments

close