Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सरपंचाने खरंच गावचा विकास केला आहे का ? कोणता निधी कोठे खर्च केला? पहा फक्त एका क्लिकवर




 सरपंचाने खरंच गावचा विकास केला आहे का ? कोणता निधी कोठे खर्च केला?  पहा फक्त एका क्लिकवर






तुमच्या गावातील सरपंचाने त्याला मिळालेल्या निधीचा वापर कसा केला आहे ? हे आता तुम्ही घरबसल्या पाहू शकत आहे.


● हायलाईट्स


- ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी

- ई स्वराज्य ग्राम ऍप

- ई स्वराज्य ग्राम कसे वापरावे?

- ग्रामविकास निधी शिल्लक राहिला तर !





ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी -


बीड : राज्यात सध्या अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येथे १८ डिसेंबरला ७५१ ग्रामपंचायत साठी मतदान होणार आहे. निवडणूक जवळ आली की गावकरी तसतसे जागे होतात. सरपंचाने कोणता निधी कुठे खर्च केला आहे?  आणि तो निधी कशावर खर्च केला आहे? ज्या गावातील कामासाठी खर्च केला तिथे नक्कीच गरज होती का?


मग गावकऱ्यांना वाटते की ग्रामपंचायतीने गावाचा काहीच विकास केला नाही. अनेक गावांत सरपंच आणि सदस्यांनी गावाचा विकास केला का यावर शंका उपस्थित होते. तुमच्या  ग्रामपंचायतीने खरंच विकास केला आहे का?  केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांनी दिलेले निधी खर्च केला आहे का?  याबाबतची सर्व इत्यंभूत माहिती तुम्हाला अवघ्या एका क्लिकवर मिळू शकते.


तुमच्या गावातील सरपंच नेत्याला मिळालेल्या निधीचा वापर कसा केला आहे ? होय हे पाहणं आता अगदी सोपं आहे. आता तुम्ही घरबसल्या देखील हे पाहू शकता. तुम्हाला त्यासाठी काय करावे लागणार आहे आणि कसा हा निधी कुठे खर्च झाला आहे. ते शोधायचे असेल तर हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


चला तर आता पाहू ग्राम विकास निधी कसा खर्च केला जातो आहे हे ई ग्राम स्वराज्य ऍप मार्फत पाहू.


ई ग्राम स्वराज्य ऍप -


१) सर्वप्रथम तुम्हाला google play store वरून ई ग्राम स्वराज नावाचा ॲप डाऊनलोड करावं लागेल. आप ओपन झाल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्याबरोबर दिलेल्या https://egramswaraj.gov.in/paymentReport.do वेबसाईटवरून देखील तुम्हीही माहिती घेऊ शकत आहे. 


२) यामध्ये तुम्हाला आधी स्टेटमेंटमध्ये तुमचं राज्य, त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये तुमचा जिल्हा, ब्लॉक पंचायतमध्ये तालुका, आणि व्हिलेज पंचायत मध्ये तुमचे गावाचं नाव निवडायचे आहे आणि हे सबमिट करायचे आहे.


३) त्यानंतर तुम्हाला ज्या आर्थिक वर्षासाठी माहिती पाहिजे आहे ते वर्ष निवडायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर ३ वेगवेगळे पर्याय येतात. यातला सगळ्यात पहिला पर्याय असतो ER Detels.  ER म्हणजेच Elected Representative म्हणजे गावातील निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची माहिती असते.


४) त्यानंतर दुसरा पर्याय आहे तो Approved Activities यात ग्रामपंचायतीला कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे याची माहिती असते.


५) त्यातील तिसरा पर्याय असतो Financial Progress यात गावाच्या आर्थिक प्रगती विषयी माहिती दिलेली असते. यात आपण ज्या आर्थिक वर्ष निवडलेले आहे ते सुरुवातीला तिथे दिलेलं असतं. त्यानंतर गावाचा नाव दिलेले असेल त्यांना त्या आर्थिक वर्षात तुमच्या गावासाठी किती निधी आला त्याची रक्कम रेसिपी या पर्यायासमोर दिलेले असेल आणि त्यापेक्षा किती निधी खर्च झाला? ही रक्कम Expenditure या पर्याय समोर दिसेल.



६) त्या खाली List of Schemes हा पर्याय असेल.  ग्रामपंचायतला जो एकूण निधी मिळाला आहे त्याची विभागणी केलेली आहे. यात कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला व त्यापैकी किती निधी खर्च झाला याची माहिती असेल.







शेवटचा आणि  दिलेला निधी उरला तर काय?


बऱ्याच ग्रामपंचायती या दिलेल्या निधीपैकी ४० ते ५० % सुद्धा निधी खर्च करत नाही. त्यामुळेच ग्रामपंचायतने खर्च न केलेला निधी सरकारला परत जातो. त्यामुळे गावचा विकास अर्धवट राहत राहतो किंवा विकासाला खीळ बसते हे मात्र नक्की.





Post a Comment

0 Comments

close