माठातील पाणी
" तुज आहे तुजपाशी
पण जागा विसरलाशी "
पण जागा विसरलाशी "
हि कथा एकदम साधी आहे. पाण्याचे अस्तित्व कोठे आहे. असा विचार करायला लावणारी एक हृद्याला स्पर्श करणारी कथा..........
- कथा -
कथेतील आई व मुलामधील संभाषण पुढील प्रमाणे ......
मुलगा : आई मला पाणी प्यायचे आहे.
आई : पाणी हाताने घेऊन पी बाळा.
मुलगा : पाणी कुठे आहे ?
आई : पाणी माठात आहे.
मुलगा : आई माठ कुठे आहे ?
आई : माठ घरामध्ये आहे.
मुलगा : आई घर कुठे आहे ?
आई : घर गावात आहे.
मुलगा : आई गावं कुठे आहे ?
आई : गावं तालुक्यात आहे.
मुलगा : आई तालुका कुठे आहे ?
आई : तालुका जिल्ह्यात आहे.
मुलगा : आई जिल्हा कुठे आहे ?
आई : जिल्हा राज्यात आहे.
मुलगा : आई राज्य कुठे आहे ?
आई : राज्य भारत ( हिंदुस्थान ) देशामध्ये आहे.
मुलगा : भारत ( हिंदुस्थान ) देश कुठे आहे ?
आई : आपला भारत ( हिंदुस्थान ) देश जगामध्ये आहे.
मुलगा : आई मग जग कुठे आहे ?
आई : जग तर पाण्यात आहे.
मुलगा : आई मग पाणी कुठे आहे ?
आई : बाळा पाणी तर माठातचं आहे.
सर्वच गोष्टी जसे सुख, शांती, समाधान, आनंद आणि व्यावसाय संधी ह्या आपल्या जवळपास असतात. फक्त गरज आहे ती ओळखून त्यावर काम करण्याची. कष्ट, मेहनत यांच्या शिवाय दुसरा पर्यायचं नसतो. पाणी आणि माठ हे अगदी जवळच असतं पण आपण उगाच मुलासारखं भरकटत असतो. तुम्हाला आयुष्यात जी कोणती गोष्ट पाहिजे तिची काही ना काही किंमत असते. जी तुम्हाला घ्यावीच लागते. ती सुध्दा पुर्ण आणि आगाऊ.

0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH