संभाजी भिडे गुरुजींवरील असावा एक छंद ही वादग्रस्त पोस्ट काँग्रेसला भोवली; तीव्र विरोधानंतर पोस्ट डिलीट
पुणे : संभाजी भिडे गुरुजी यांच्याबद्दल 'इंडियन नॅशनल काँग्रेस - महाराष्ट्र'च्या अधिकृत फेसबुक पेजवरून करण्यात आलेल्या असावा एक छंद ह्या वादग्रस्त पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या पोस्टवर धारकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर, अखेर काँग्रेसला ही पोस्ट सोशल मीडियावरून हटवावी लागली आहे.
नेमका प्रकार काय?
'इंडियन नॅशनल काँग्रेस - महाराष्ट्र'च्या फेसबुक पेजवरून संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी करणारी एक पोस्ट करण्यात आली होती. यामध्ये त्यांच्या नावाबाबत आणि कार्याबाबत आक्षेपार्ह भाष्य करण्यात आले होते, या पोस्टमुळे सोशल मीडियावर काँग्रेसवर जोरदार टीका होऊ लागली.
धारकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
ही पोस्ट समोर येताच संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थकांनी म्हणजेच धारकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या प्रकरणी धारकऱ्यांनी काँग्रेसला धारेवर धरत थेट आव्हान दिले आहे. "ही पोस्ट नेमकी कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरून करण्यात आली होती, त्याचे नाव जाहीर करावे," अशी मागणी धारकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच, अशा प्रकारच्या कृत्यामुळे काँग्रेस पक्षाची नाचक्की झाली असून, भविष्यात अशा पोस्ट पुन्हा केल्यास तीव्र परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही धारकऱ्यांनी दिला आहे.
सोशल मीडियावर टीकेचा भडिमार
ही पोस्ट हटवल्यानंतरही धारकरी आणि नेटकऱ्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. पक्षाने अशा प्रकारची खालच्या पातळीवरील टीका करणे टाळावे आणि धोरणात्मक राजकारणावर लक्ष केंद्रित करावे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. फेसबुकवर या पोस्टचा स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, काँग्रेसच्या या कृतीवर धारकरी आणि नेटकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री चारीमुंड्या चित
काँग्रेसचे एक माजी मुख्यमंत्री यांनी गुरुजींवर खालच्या पातळीवर येऊन टीका केली होती त्यांना बाबा म्हणत आहेत. ते विधानसभेत म्हणाले होते की कोण गुरुजी? गुरुजी म्हणण्याचा काय संबंध? मी त्यांना ओळखत नाही. त्या माजी मुख्यमंत्र्यांना धारकार्यांनी गेल्या विधानसभेमध्ये जोर का धक्का धीरे से लगे करत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चारही मुंड्याचित केले आहे... त्यामुळे यावरून काँग्रेसचे योग्य ते धडा घ्यावा आणि आपल्या भूमिकेत बदल करावा...



0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH