Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पुणे शहर आणि जिल्ह्यात गरीब रुग्णावर मोफत उपचार करणारी प्रमुख मल्टी-स्पेशालिटी धर्मादाय रुग्णालये कोणती ? वाचा


पुणे शहर आणि जिल्ह्यात गरीब रुग्णावर मोफत उपचार करणारी प्रमुख मल्टी-स्पेशालिटी धर्मादाय रुग्णालये कोणती ? वाचा




What are the major multi-specialty charitable hospitals in Pune city and district that provide free treatment to poor patients? Read


राज्यातील आणि पुण्यातील अनेक मोठी आणि नामांकित रुग्णालये धर्मादाय आयुक्तालयाच्या (Charity Commissioner) अंतर्गत येतात. 'महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमा'नुसार या रुग्णालयांमध्ये गरीब आणि गरजू रुग्णांसाठी एकूण खाटांपैकी २०% खाटा राखीव ठेवणे बंधनकारक असते. तसेच १०% पूर्णपणे मोफत आणि १०% सवलतीच्या दरात उपचार आणि सुविधा उपलब्द असतात.

राज्यातील धर्मादाय रुग्णालयांनी पारदर्शकता राखण्यासाठी आणि रुग्णांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमाच्या कलम ४१-अ नुसार काही महत्त्वाची माहिती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर किंवा दर्शनी भागात (Reception/Notice Board) लावणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे.


प्रामुख्याने सर्व रुग्णालयांनी खालील प्रकारच्या तीन योजनांची माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

१) धर्मादाय खाटा योजना (Charity Beds) किंवा "निर्धन आणि दुर्बल घटकांसाठीची योजना"(Scheme for Indigent and Weaker Section)

२) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY)

 ३)  आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY)

वरील ३ योजनांची माहिती प्रामुख्याने खालीलप्रमाणे प्रसिद्ध करावी


पुण्यातील धर्मादाय अंतर्गत येणारी काही प्रमुख रुग्णालये खालीलप्रमाणे आहेत :

१. प्रमुख मल्टी-स्पेशालिटी रुग्णालये :

  • रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) : ससून रोड, वानवडी आणि हिंजवडी.

  • दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Deenanath Mangeshkar Hospital) : एरंडवणे.

  • जहांगीर हॉस्पिटल (Jehangir Hospital): पुणे स्टेशनजवळ.

  • पुना हॉस्पिटल (Poona Hospital & Research Centre) : नवी पेठ.

  • सह्याद्री हॉस्पिटल (Sahyadri Hospital) : कर्वे रोड, डेक्कन आणि इतर शाखा.

  • संचेती हॉस्पिटल (Sancheti Hospital) : शिवाजीनगर (अस्थिरोगासाठी प्रसिद्ध).

  • आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल : चिंचवड.

  • इनलॅक्स अँड बुधराणी हॉस्पिटल : कोरेगाव पार्क.

  • भारती हॉस्पिटल (Bharati Hospital) : कात्रज.

२. इतर महत्त्वाची धर्मादाय रुग्णालये :

  • के.ई.एम. रुग्णालय (KEM Hospital) : रास्ता पेठ.

  • Hardikar Hospital : गणेशखिंड रोड.

  • Noble Hospital : हडपसर.

  • Inamdar Hospital : फातिमा नगर.

  • माणिकचंद धारीवाल हॉस्पिटल : शिरूर.

  • पुरूषोत्तम शास्त्री नानल हॉस्पिटल : कर्वे रोड



महत्त्वाची माहिती आणि कागदपत्रे :

या रुग्णालयांमध्ये मोफत किंवा सवलतीत उपचार मिळवण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे:

१. रेशन कार्ड : पिवळे किंवा केशरी (शुभ्र रेशन कार्ड धारकांना ही सुविधा मिळत नाही). 

२. उत्पन्नाचा दाखला : तहसीलदार किंवा अधिकृत अधिकाऱ्याने दिलेला आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला. 

३. आधार कार्ड : रुग्णाचे ओळखपत्र म्हणून. 

४. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन : आजाराचे निदान आणि उपचारांची गरज दर्शवणारे पत्र.


टीप : रुग्णालयात भरती होण्यापूर्वी तिथल्या मेडिकल सोशल वर्कर (MSW) किंवा धर्मादाय विभाग (Charity Department) शी संपर्क साधून उपलब्ध खाटा आणि योजनेची माहिती घेणे आवश्यक आहे. 

तुमची तेथे अडवणूक नक्कीच होईल तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार नाही. रुग्णाला दाखल करण्यासाठी आणि योजने अंतर्गत  उपचार करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात त्याची यादी सही शिक्क्यासह लेखी मागणी करा.  पण तुम्ही धर्मादाय रुग्णालय अंतर्गत उपचाराचा आग्रह धरा. 



Post a Comment

0 Comments

close