उत्तम नगर (दिल्ली) दलित युवक तरुण खाटिक प्रकरणात आतापर्यंत काय घडले?
What has happened so far in the Uttam Nagar (Delhi) Dalit youth Tarun Khatik case?
उत्तम नगर (दिल्ली) के दलित युवक तरुण खाटिक मामले में अब तक क्या हुआ है?
उत्तम नगर (दिल्ली) येथे होळीच्या दिवशी झालेल्या वादातून २६ वर्षांचा दलित युवक तरुण खाटिक यांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर पोलिस व प्रशासनाने केलेली कारवाई पुढीलप्रमाणे —
१) पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला -
घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी त्वरित FIR दाखल केली. सुरुवातीला खालील कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला:
भारतीय न्याय संहिता कलम 103(1) – खू*न
कलम 110 – मनुष्यव*धाचा प्रयत्न
कलम 3(5) – सामूहिक हेतू
नंतर तपासात पीडित कुटुंब दलित समाजातील असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रकरणात SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदा देखील जोडण्यात आला.
२) पोलिसांची मोठी अटक मोहीम -
घटनेनंतर पोलिसांनी वेगाने कारवाई करत आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली.
पहिल्या टप्प्यात अटक झालेले आरोपी:
उमरदीन (49 वर्ष)
जुम्मदीन (36 वर्ष)
कमरुद्दीन (36 वर्ष)
मुस्ताक (46 वर्ष)
मुज्जफर (25 वर्ष)
ताहिर (18 वर्ष)
इम्रान उर्फ बंटी (38 वर्ष)
तसेच एक अल्पवयीन मुलगा ताब्यात घेण्यात आला.
३) पुढील तपासात आणखी आरोपी अटकेत -
तपास पुढे गेल्यानंतर पोलिसांनी आणखी ७ जणांना अटक केली:
सायरा उर्फ काली (40 वर्ष)
सरीफन (50 वर्ष)
सलमा (36 वर्ष)
सुहेल उर्फ साहिल (21 वर्ष)
समीर चौहान (20 वर्ष)
फिरोज (22 वर्ष)
इस्माईल (50 वर्ष)
तसेच १४ वर्षांचा आणखी एक अल्पवयीन मुलगा ताब्यात घेण्यात आला.
त्यामुळे आतापर्यंत एकूण 14 आरोपी अटक आणि 2 अल्पवयीन ताब्यात घेतले. ४) मुस्लिम महिलांचा संशयास्पद रोल काय होता?
पोलिस तपासानुसार:
सायरा उर्फ काली (40 वर्ष) हीच ती महिला होती ज्यांच्यावर होळीच्या वेळी रंगीत पाण्याचा फुगा पडला.
या घटनेनंतर तिने तरुण खाटिक यांच्या कुटुंबीयांशी वाद घातला. पोलिसांच्या माहितीनुसार तिने आपल्या बाजूच्या लोकांना फोन करून घटनास्थळी बोलावले, ज्यामुळे वाद अधिक भडकला. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये मोठी मारामारी झाली, ज्यात तरुण खाटिक यांचा मृत्यू झाला. इतर महिलांवरही वाद भडकवणे आणि जमाव गोळा करण्यात भूमिका असल्याचा संशय तपासात पाहिला जात आहे.
५) परिसरात तणाव – पोलिसांचा कडक बंदोबस्त
घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस व केंद्रीय सुरक्षा दल तैनात केले असून परिसरात अजूनही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
६) आरोपीशी संबंधित घरावर बुलडोझर कारवाई
९ मार्च रोजी दिल्ली महानगरपालिकेने एका आरोपीशी संबंधित इमारतीवर कारवाई केली. इमारतीचे पहिले आणि चौथे मजल्यावरील बेकायदेशीर भाग पाडण्यात आले, हा भाग नाल्यावर व सरकारी जागेवर अतिक्रमण करून बांधलेला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
७) पीडित कुटुंबाला सरकारचे आश्वासन
मृत तरुणाचे आई-वडील दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला पूर्ण मदत आणि कडक कारवाईचे आश्वासन दिले.


0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH