Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पुणे (वाघोली) शिरूर रस्त्याची निविदा पूर्ण भूसंपादन झाले तर अशी मिळेल नुकसान भरपाई




 पुणे (वाघोली) शिरूर रस्त्याची निविदा पूर्ण | १८ पदरी रस्त्यासाठी भूसंपादन झाले तर अशी मिळेल नुकसान भरपाई




पुणे - पुणे ते शिरूर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बहुचर्चित अशा या १८ पदरी रस्त्याचा डिपार बनविण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.


पुणे - नगर महामार्गावर पुणे ते शिरूर या ६७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर दुमजली पुलाचा रस्ता ( एलिव्हेटेड कॉरिडॉर) होणार आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ७ हजार २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गेल्या १० वर्षांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न प्रलंबित आहे. ती प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कामगार वाहतूक, माल वाहतूक आणि प्रवासी करणाऱ्या वाहनाचा वेळ वाचेल आणि डिझेल खर्च कमी होईल परिणामतः विकासाला चालना मिळेल..



रांजणगाव गणपती, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, लोणीकंद आणि वाघोली भागातील वाहतूक कोंडी कमी होणार.



पुणे नगर राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने वाढत असलेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा रस्ता खूप महत्त्वाचा आहे. मात्र भूसंपादनात येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन नागपूरच्या धर्तीवर एलिवेटेड रस्ता बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून सादरीकरण केले होते. त्यानुसार डीपीआर बनवण्याच्या कामाला सुरुवातही झाली होती. परंतु भविष्याची वाढती गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी दुमजली फुलासह १८ पदरी रस्ता बांधण्याची घोषणा माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली होती. या महामार्गाच्या कामाचे सादरीकरण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थित केले गेले होते. 



वाघोली ते शिरूर या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पीएमसी निवडीसाठीच्या निविदा प्रक्रियेला मंजूर मिळालेली आहे. पीएमसी निवडीसाठीची निविदा प्रक्रिया पार पडल्यामुळे सदरच्या कामाचा कार्यारंभ आदेशानंतर लवकरच डी पी आर बनवायचा कामाला सुद्धा सुरुवात होईल.




वाघोली ते शिरूर १८ पदरी रस्त्यासाठी आवश्यक जमीन लागली तर त्यासाठी जमिनीचे भूसंपादन झाले तर नुकसान भरपाई कशी मिळेल ? हे आपण आता पाहणार आहोत.



समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर जर वाघोली ते शिरूर महामामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया काल मर्यादेत आणि वेगाने राबवण्यासाठी सरकारने परवानगी दिली तर महाराष्ट्र महामार्ग अधिनियमानुसार भूसंपादनासाठी शेतकरी आणि जमीन मालकांना बाजार मूल्यानुसार योग्य मोबदला निश्चित करण्यासाठी मान्यता देण्यात येऊ शकते.


थेट जमीन खरेदी योजना म्हणजे काय?  


महामार्गाच्या विशिष्ट प्रदेशातील जमिनीचे तयार दर म्हणजे रेडी रेकनर दर हे जमीन दराची गणना करण्यासाठी आधार मानले जातात.  तर झाडे, घरे, विहिरी, पाणी पुरवठा यंत्रणा,दुकाने, घरे, इमारती आणि शेतातील अशा इतर मालमत्तांचा मोबदला -  नुकसान भरपाई दर मिळण्यासाठी देखील समावेश केला जातो.



वाघोली ते शिरूर महामार्ग भूसंपादनासाठी शेतकरी तत्परतेने सहमत झाल्यास शेतकरी, जमीन मालकाला २५% प्रोत्साहन म्हणून अनुदान रक्कम दिली जाऊ शकत आहे. रेडी रेकनर दराप्रमाणे ठरलेल्या किमतीच्या दुप्पट किमतीत १००% सोलटीएम जोडण्यात येतो. त्यामुळे जमीन मालकाला त्याच्या जागेच्या मूळ किमतीच्या पाचपट अधिक फायदा म्हणजे मोबदला रक्कम दिली जाते.



एलएमआर नुसार शहरी भागातील नुकसान भरपाई रक्कम १ पट आहे. आणि ग्रामीण भागासाठी १.५ पट आहे. तर थेट खरेदीसाठी प्रोत्साहन म्हणून शहरी भागाची नुकसान भरपाई रक्कम दुप्पट आहे. तसेच रेडी रेकनर दरापेक्षा किंवा विक्रीच्या सरासरी आकडेवारी किमतीच्या २.५ असू शकते. तर नुकसान भरपाई रक्कम ३ पट असू शकते. आणि शेतकऱ्यासाठी प्रोत्साहन म्हणून ती चारपट होऊ शकते. रेडी रेकनर दर आणि सरासरी विक्रीची आकडेवारी किमतीच्या ३.७५ पट असू शकते.



अशा शेती, आरोग्य विमा, बँक, कायदा आणि सरकारी योजनेच्या माहितीसाठी आजच आपला व्हाट्सआप ग्रुप JOIN करा. त्यासाठी येथे क्लिक करा


आता आपण किती रक्कम नुकसान भरपाई मिळेल याचे उदाहरण पाहू या  - 


जमिनीच्या रेडी रेकनर दरानुसार किंमत रुपये गुंठा १,००,०००/- आणि शेतीची जमीन असेल किंवा ना विकास क्षेत्रात येत असल्यास त्या जागेची किंमत दुप्पट असेल म्हणजेच २,००,०००/- रु. प्रति गुंठा होईल. सरकार या जागेच्या मुळ किमतीशी जुळणी करेल आणि जमीन मालकाला रक्कम रुपये ४,००,००/- रुपये मोबदला देईल.  जमीन मालकाने स्वच्छेने थेट खरेदी योजनेत भाग घेतला तर त्याला सरकारकडून २५ % प्रोत्साहन पर रक्कम अनुदान म्हणून मिळेल. म्हणजे तुम्हाला प्रोत्साहन पर २५ % आणि प्रति गुंठा ४,००,०००/- रुपये होईल असे एकूण प्रति गुंठा  ५,००,०००/- रुपये रक्कम रेडी रेकनर दराच्या किमतीपेक्षा पाचपट किंवा सरासरी विक्री किमतीच्या पाचपट होईल. अंदाजे असा मोबदला वाघोली ते शिरूर महामार्गाच्या बाधित जागा मालकांना आणि शेतकऱ्यांना दिला जाऊ शकत आहे. 



कोणाच्या नावावर किती जमीन आहे ? येथे क्लिक करून पहा


शिक्रापूर- चाकण – तळेगाव रस्त्याचे चौपदरीकरण

शिक्रापूर मार्गे पिंपरी-चिंचवड, मुंबईकडे जाणारा आणि तळेगाव चाकण आणि शिक्रापूर येथील औद्योगिक वसाहतींना जोडणारा रस्ताचे विस्तारीकरण करण्यात येणार आहेे. हा मार्ग चारपदरी करण्यात येणार आहे. या रस्त्याची लांबी ५४ किलोमीटर असून त्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.



सूचना : शेत जमिनीचे भूसंपादन झाल्यानंतर मिळणारा नुकसान भरपाईचा मोबदला हा शासकीय धोरण आणि आदेशानुसार बदलत असतात. लेखकाने किती नुकसान भरपाई मिळेल हा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मिळणाऱ्या मोबदल्यात तफावत असू शकते. त्यामुळे या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही कायदेशीर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसान आणि फायद्यासाठी लेखक आणि वेबसाईटशी संबंधित व्यक्ती जबाबदार राहणार नाही.












Post a Comment

0 Comments

close