ग्रामीण भागातील पुणे अहमदनगर महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी
पुणे जिल्ह्यातील आणि बाहेरून पुणे शहरात येणाऱ्या आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडी चा प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे. ही समस्या औद्योगिक क्षेत्र आणि सर्व ग्रामीण भागात सर्व प्रकारच्या वाहनांना, शेतकरी, व्यापारी आणि कामगारांना पण भेडसावत आहे. समस्या ही मानव निर्मित आहे. त्यामुळे ती सोडवणे अवघड असले तरी अशक्य तर अजिबात नाही.
महसूल अधिकारी आणि पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी वाहतूक कोंडी सोडवायचं ठरवले तर योग्य नियोजन आणि अंमलबजावणी केली तर ही समस्या १ ते २ महिन्यात मार्गी लागेल. वाहतूक कोंडी कोठे होत आहे? आणि तेथे कोणते घटक कारणीभूत आहेत? ते खाली सविस्तर माहिती देत आहे.
१) कोरेगाव भीमा, सणसवाडी चौक, एल अँड टी फाटा, शिक्रापूर चाकण चौक, पाबळ फाटा आणि मलठण फाटा, कासारी फाटा, कोंढापुरी, रांजणगाव गणपती, कारेगाव, नाव्हरा फाटा, शिरूर बायपास इत्यादी गावातील चौकात वाहतूक कोंडी होत असते.
२) औद्योगिक परिसर असल्याने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चारचाकी आणि दुचाकी वाहने महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा काही जागी उभी केली जात आहेत.
३) वरील सर्व चौकात वाहतूक दिवे नाही
४) दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहतूक करणारी अनेक वाहने वाहतूक पोलिसांचे आणि ट्राफिक वार्डनच्या सूचनांचे पालन करत नाही.
५) दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहतूक करणारी अनेक वाहने ही चुकीच्या बाजूने (Wrong Side) येत असतात.
६) वाहतूक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या मर्यादित आहे आणि तसेच अनेक पदे रिक्त (अंदाज) आहेत.
७) जे कर्मचारी आणि अधिकारी उपलब्ध आहेत त्यांना ह्या वाहतूक व्यवस्थेसोबत आणि इतर कामे असतात. त्यामुळे प्रचंड वर्दळीच्या मार्गावर वाहतूक कोंडी सोडवता येत नाही.
८) बेशिस्त वाहन चालकांच्यावर जरब बसेल अशी ठोस दंडात्मक कारवाई आणि गुन्हे दाखल करण्यात येत नाही. त्यामुळे वाहन चालक मुजोर झाले आहेत. त्यांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक राहिला नाही.
९) वाहन चालकांचे लायसन्स, गाडीची कागदपत्रे आणि वाहनाचे PUC दाखला आणि पासिंग प्रमाणे लोड आहे की नाही हे पाहण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही.
१०) रोज ऍम्ब्युलन्ससाठी आणि त्यातील रुग्णाला ही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागू शकत आहे.
११) कोरेगाव भीमा ते शिरूर पर्यंत काही ठिकाणी बेकायदेशीर दुभाजक निर्माण केले आहेत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे शिवाय वाहतूक कोंडी होत आहे. त्यांची पण चौकशी व्हावी.
१२) वरील सर्व चौकात फळ विक्री, वडापाव विक्री, ज्यूज बार, पाणीपुरी आणि भाजीपाल्याची विक्री केली जात आहे. ते खरेदी करण्यासाठी चौकात डांबरी रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहन थांबवले जाते त्यामुळे वाहतूक कोंडी होते.
१३) सायंकाळी ६.०० वा. नंतर ट्रॅव्हल बस पुण्यातून बाहेर पडताना वरील ठिकाणच्या चौकात बेशिस्तपणे थांबत असतात. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.
१४) त्यात खाजगी वाहतूक करणारे रिक्षा, टाटा छोटा हत्ती, टमटम, तीनचाकी रिक्षा चालक हे चौका चौकात थांबलेले असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत मोठी वाढ होत असते.
१५) कृष्णलीला मंगल कार्यालय सणसवाडी, कोंढापुरी आणि इतर कार्यालयात लग्न असेल तेंव्हा लग्नाला येणारे लोकं रस्त्यावर वाहने लावतात आणि विरुद्ध दिशेने येत असतात.
१६) कोरेगाव भीमा, रांजणगाव गणपती आणि शिक्रापूर आठवडे बाजार असेल त्यावेळी वाहतूक कोंडी होत असते.
१७) हीच अवस्था पुणे सोलापूर महामार्ग, पुणे ते सासवड महामार्ग, पुणे ते सातारा महामार्ग, पुणे ते नाशिक महामार्गावर प्रत्येक गावात आहे. त्यासाठी त्या त्या संबंधित पोलिस ठाण्याला आदेश देण्यात यावे.
जबाबदार अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांना ह्या वाहतूक कोंडीचा फटका बसत नाही म्हणून कायमस्वरूपी कारवाई करण्याचा आणि ती सातत्याने चालू ठेवण्याचा निर्णय घेतले जात नाही.
कायद्याच्या चौकटीत राहून दंडात्मक कारवाई आणि गुन्हे दाखल केले तर सर्व लोक सुता सारखे सरळ होतील. फक्त प्रशासनातील अधिकारी यांची इच्छा शक्ती हवी आहे. एकदा कारवाई आणि उपाययोजना चालू केली की ती सातत्यपूर्ण चालू ठेवावी. त्यासाठी जिल्हा पातळीवर मा. जिल्हाधिकारी पुणे आणि मा. पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
अशा अनेक समस्या आहे. मी आपणाकडे तक्रार दाखल करत आहे. त्यामुळे मला आशा आहे की आपणाला घटनेने दिलेले अधिकार वापरून पुणे जिल्ह्याची वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका कराल.
सूचना १ ) तक्रार अर्ज हाच जबाब समजावा पोलिस ठाण्यात बोलवू नये. जर एखादी समिती घठीत केली तर चर्चा अवश्य करू.
२) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खाली आदेश देताना पुन्हा पाठपुरावा करून वाहतूक कोंडी समस्या सुटल्याचा अहवाल मागवून घ्यावा.
0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH