Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Ramgiri Maharaj : पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, मुस्लिम समाज रस्त्यावर; कोण आहेत रामगिरी महाराज?

 

Ramgiri Maharaj : पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, मुस्लिम समाज रस्त्यावर; कोण आहेत रामगिरी महाराज?





कोण आहेत रामगिरी महाराज?


पुणे : छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूर तालुक्यातील कापूरवाडी गावचे भूमिपूत्र थोर संत सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा जन्म सन 1814 साली झाला आणि सन 1902 मध्ये त्यांचे महानिर्वाण झाले. तर त्यांनी वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर आणि श्रीरामपूर जि. अहमदनगर या दोन तालुक्यांच्या सीमांना स्पर्श करणार्‍या गोदावरी नदीच्या काठावरील सराला बेटावर मठाची स्थापना केली. या बेटावरील त्यांचे मोठे आणि महान कार्य पाहून प्रभावित झालेल्या वैजापूरच्या रुपचंद संचेती यांनी या बेटावरील त्यांची संपूर्ण 65 एकर सुपिक कसदार जमीन त्यांच्या मठासाठी दान केली. वारकरी संप्रदायाच्या समर्पक विचारधारेतून त्यांनी तत्कालीन निजामशाहीच्या जुलमी राजवटीत पिचलेल्यांना लोकांना एकत्र केले. शिर्डीचे साईबाबा सद्गुरु गंगागिरी महाराजांना गुरुस्थानी मानीत असतं. लोकांना संघटीत करण्यासाठी त्यांनी लोकसहभागातून सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी देवळा-रावळातून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा रुजवली आहे आणि ती अखंडपणे चालू ठेवलेली आहे.


आपला समाज हा व्यसनमुक्त समाज झाला पाहिजे. तसेच अस्पृश्य निर्मूलन यासारख्या गोष्टींवर या सप्ताहाच्या माध्यमातून भर दिला गेला. जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आणि त्यात दररोज सात दिवस अगदी नियोजनबद्ध पद्धतीने होणारे अन्नदान अशी ओळख असलेल्या गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची दखल ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्येही घेण्यात आलेली आहे. त्यांनी सुरु केलेली ही परंपरा महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आजही अखंडपणे सुरु आहे.


सन 2009 पासून  रामगिरी महाराज 'या' पालखीचे भोई


सन 1902 साली त्यांचे देहावसान झाल्यानंतर त्यांची ही परंपरा पुढे त्यांचे प्रियशिष्य दत्तगिरी महाराज यांनी सुरु ठेवली. तीच परंपरा त्यानंतरच्या श्रीनाथगिरी महाराज, सोमेश्‍वरगिरी महाराज, श्रीनारायणगिरी महाराज यांनी कायम ठेवली आणि 2009 पासून  रामगिरी महाराज या पालखीचे भोई झालेले आहेत. त्यांनी गेल्या पंधरा वर्षांत सरला बेटाचा केवळ धार्मिक क्षेत्र म्हणून विकास आणि पर्यटन क्षेत्र म्हणूनही या परिसराला साज चढवला आहे. येथून जवळच असलेल्या शनिदेव गाव या श्री. शनी महाराजांच्या जागृत ठिकाणाचाही त्यांनी कायापालट केला आहे. त्यामुळे सरालाबेट आणि शनिदेव गाव या ठिकाणी येणार्‍या भाविकांसह पर्यटकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.

माजराजांनी महंमद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्यारून महंत रामगिरी महाराज अडचणीत आले आहेत. रामगिरी महाराजांविरोधात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे. रामगिरी महाराजांवर येवल्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 




जिल्ह्यातील शहापंचाळे येथे सुरू असलेल्या प्रवचनात महंत रामगिरी महाराज यांनी कथित वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या महाराजांच्या सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी महंत रामगिरी महाराज यांचं कौतुक करत संतांच्या केसालाही धक्का लागणार नसल्याचं वक्तव्य केलंय. "राज्यात संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही. राज्यातील संत परंपरा मोठी आहे. संतांच्या आशीर्वादानं राज्य चालू आहे. त्यामुळं या महाराष्ट्रात संतांच्या केसालाही कोणी हात लावण्याची हिंमत करणार नाही", असं एकनाथ शिंदे म्हणाले.


Post a Comment

0 Comments

close