Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फक्त 5 हजाराची SIP करा आणि आयुष्यभर महिना 1 लाख 50 हजार मिळवा | SIP आणि SWP ची जीवन समृद्ध करणारी जादू

 


फक्त 5 एसआयपी करा आणि संपूर्ण महिनाभर 1 लाख 50 हजार परतावा | SIP आणि SWP ची जीवन समृद्ध करणारी जादू






Just do a SIP of 5k and get 1 lakh 50k per month for lifetime | The Life Enriching Magic of SIP and SWP



पुणे : आज आपण म्युच्युअल फंडाच्या SIP आणि SWP बाबतीत माहिती घेणार आहोत. तुम्ही म्युच्युअल फंड कोणता घेणार हे न पाहता, मासिक SIP मध्ये निश्चित रक्कम गुंतवणूक केल्यानंतर ठराविक वर्षानंतर चक्रवाढ व्याज पद्धतीने किती रक्कम जमा होते हे पाहणार आहोत. तुमच्या निवृत्तीनंतर किंवा तुमचे लक्ष साध्य झाल्यावर जर तुम्ही SIP ला बंद करून तिला SWP मध्ये परावर्तित करून पुढे चालू ठेवली, तर तुम्हाला दरमहा पेन्शन म्हणून किती रक्कम काढता येईल? तसेच त्यानंतर किती रकमेचा कॉर्पस शिल्लक राहील? एकंदरीत व्याजाची गणिते काय सांगत आहेत, याबाबतीत इत्यंभूत माहिती पाहणार आहोत.


HIGHLITE

1) म्युच्युअल फंड कोणता घेणार आहात ?  

) भारतातील विविध म्युच्युअल फंड 

3) म्युच्युअल फंड रेग्युलर आणि डायरेक्ट फरक

4)  म्युच्युअल फंड STEP UP SIP 

5)  SIP - सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टट प्लान

6) SWP - सिस्टेमॅटिक विथड्रॉल प्लान 

7) SWP ही कधी सुरू केली जाते ? 

8)  SWP - पद्धतशीर पैसे काढण्याची योजना 

9)  मुदतीपूर्वी गुंतवणूकदारांनी पैसे काढल्यास ?

10) SIP ला अपेक्षित रिटर्न कमी मिळाले तर ?

11 स्टॉक मार्केट कोसळले आणि पैसे बुडाले तर ?

12) भारतीय इकॉनॉमीची पुढील २० वर्षे 

13) MF SIP चालू करायला कोण अडवत आहे ?

14) SIP कॅल्क्युलेटर गुंतवणुकीचा हिशोब

15) Youtube व्हिडीओ आणि वेबसाईट 

1)  म्युच्युअल फंड कोणता घेणार आहात ? 

तुम्ही MF मध्ये एकूण दरमहा किती रक्कम SIP करत आहात? तसेच एकरकमी अर्थात लमसम किती रक्कम किती वेळा MF गुंतवणूक म्हणून करत आहात? तुम्ही तुमच्या भविष्यातील गरजा ओळखून वेगवेगळ्या MF नुसार किती रकमेची SIP करत आहात, जसे की चारचाकी गाडी, बंगला, फ्लॅट, जमीन खरेदी, मुलांच उच्च शिक्षण, लग्ने किंवा तुमच्या निवृत्तीनंतरची तरतूद यावर सर्व गणिते अर्थात रिटर्न अवलंबून असतील. आणि ती व्यक्ती नुसार कालपरत्वे कमी अधिक प्रमाणात बदलतील.

                                                                                          

) भारतातील विविध म्युच्युअल फंड                                          

◆ ॲसेट श्रेणीवर आधारित म्युच्युअल फंडाचे प्रकार : इक्विटी फंड, डेट फंड, हायब्रिड फंड.

◆ इन्व्हेस्टमेंटच्या उद्दिष्ट आधारित भारतातील म्युच्युअल फंडाचे प्रकार : ग्रोथ फंड, लिक्विड फंड, इन्कम फंड, टॅक्स-सेव्हिंग फंड.

इत्यादी भारतातील विविध प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत. तुम्ही SIP मध्ये कोणत्या उद्देशाने गुंतवणूक करत आहात, तुम्हाला अल्प मुदतीसाठी किंवा दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची आहे, या गोष्टी तुमच्या लक्षात ठेवा आणि गुंतवणूक करताना तुमच्या गरजेनुसार स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप फंड निवडा. तज्ज्ञांच्या मते, तुमचा पोर्टफोलिओ चमकदार ठेवला पाहिजे. अशा परिस्थितीत तुम्ही सोने आणि चांदी, इक्विटी, डेट फंड, रिअल इस्टेट आणि म्युच्युअल फंड इत्यादींमध्ये गुंतवणूक करावी. या प्रकरणात तुम्ही आर्थिक तज्ञाचीही मदत घेऊ शकता.

3) म्युच्युअल फंड रेग्युलर आणि डायरेक्ट फरक 

डायरेक्ट आणि रेग्युलर प्लॅनमध्ये असाच फरक आहे. जेव्हा आपण एखाद्या वितरकाच्या माध्यमाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता, तेव्हा आपले पैसे त्या स्किमच्या रेग्युलर प्लॅनमध्ये गुंतवले जातात. जेव्हा आपण त्या फंड कंपनीसोबत थेट गुंतवणूक करता, तेव्हा आपले पैसे त्या स्किमच्या डायरेक्ट प्लॅन मध्ये गुंतवले जातात. दोन्ही प्लॅन आपल्याला त्याच स्किम आणि पोर्टफोलिओची दारे उघडून देत असले, तरीही त्यांत एनएव्हीचा आणि खर्चाच्या अनुपाताचा फरक असतोच. रेग्युलर प्लॅनमध्ये वितरकाचे कमीशन देणे असल्यामुळे रेग्युलर प्लॅनचा खर्चाचा अनुपात डायरेक्ट प्लॅनच्या तुलनेत अधिक असतो. यामुळे एकाच स्किमच्या रेग्युलर प्लॅनचा एनएव्ही डायरेक्ट प्लॅनच्या एनएव्हीच्या तुलनेत जरा कमी असतो.

4) म्युच्युअल फंड STEP UP SIP  

STEP UP SIP बद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही त्यात गुंतवलेली रक्कम कालांतराने वाढवू शकता. पण जर तुम्हाला संपत्ती निर्माण करायची असेल तर तुम्हाला वेळोवेळी टॉप-अप करत राहावे लागेल. यामुळे तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल आणि तुम्ही जलद गतीने कॉर्पस तयार करू शकाल. कारण दरवर्षी जशी महागाई वाढते तसा आपला खर्च पण वाढत जातो, त्यानुसार आपले उत्पन्न पण वाढत जात असते, म्हणून दरवर्षी कमीतकमी 10 % तरी STEP UP SIP ही एक काळाची गरज आहे. 

जर तुम्हाला एसआयपीच्या माध्यमातून मोठा फंड निर्माण करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितका जास्त वेळ तुम्हाला गुंतवणुकीसाठी मिळेल आणि तुम्ही स्वतःसाठी मोठा निधी तयार कराल. सामान्यत: तरुणांना त्यांच्या पहिल्या पगारातून यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. ही गुंतवणूक दीर्घकाळ म्हणजे 20, 25 आणि 30 वर्षे चालू ठेवली पाहिजे. म्युच्युअल फंडच्या मदतीने तुम्ही तुमच्यासाठी खूप चांगला फंड तयार करू शकता.

5) SIP  - सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन

■ दरमहा SIP -  5000 ₹ 

■ दरसाल SIP वाढ - 10 % 

■ अपेक्षित रिटर्न व्याजदर - 20 %

■ SIP कालावधी - 20 वर्षे

■ एकूण गुंतवणूक रक्कम - 34,36,500 ₹ 

■ रिटर्न व्याज - 2,24,00,860 ₹ 

■ एकूण मिळणारी रक्कम - 2,58,37,360 ₹ 

जेंव्हा ही अंदाजे 2,58,37,360 ₹ (दोन कोटी अठ्ठावन्न लाख सदोतिस हजार तीनशे साठ रुपये) ही रक्कम मिळेल तेंव्हा तुमचं अंदाजे वय 45 किंवा 50 वर्षे असेल.

1) तुम्हाला अंदाजे एकूण 2,58,37,360 रक्कम रुपये मिळतील. 

2) तुमच्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक कामाच्या योजने नुसार त्यातील अंदाजे 58,37,360 ₹ व्यावसायिक कामांसाठी काढून  

    घेऊ शकत आहे.

3) त्यानंतर तुमच्याकडे अंदाजे एकूण शिल्लक रक्कम 2,00,00,000 (दोन कोटी रुपये) राहतील.

6) SWP - सिस्टेमॅटिक विथड्रॉल प्लॅन

 SWP : Systematic Withdrawal Plan म्हणजे पद्धतशीर पैसे काढण्याची योजना आहे. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती म्युच्युअल फंड योजनांमध्ये पद्धतशीरपणे गुंतवणूक करू शकते, त्याचप्रमाणे तो दर महिन्याच्या एका निश्चित तारखेला गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी पद्धतशीर पैसे काढण्याची योजना देखील सुरू करू शकतो. ही एक निश्चित किंवा परिवर्तनीय रक्कम असू शकते. हे सामान्यत: सेवानिवृत्तीमध्ये वापरले जाते आणि गुंतवणूकदारांना मासिक, अर्धवार्षिक, तिमाही किंवा वार्षिक पैसे काढण्याची परवानगी देत असते. 

तुम्ही अशी SWP योजना स्वीकारली तर काही ठराविक वर्षानंतर सुद्धा तुम्हाला उर्वरित रकमेवर निश्चित चक्रवाढ पध्दतीने व्याज रुपात परतावा मिळतो. तो परतावा हा वार्षिक 12% ते 18 % असा कमीअधिक असू शकतो. 

7) SWP ही कधी केली जाते ? 

SWP ही जेव्हा तुमचा मासिक पगार बंद झाला आहे किंवा आपण निवृत्ती घेतली आहे. तसेच आपला व्यवसाय कमी होऊन उत्पन्न कमी येत किंवा तुमचा व्यवसाय बंद झाला आहे. त्याचप्रमाणे काही कारणास्तव तुमची काम करण्याची शारीरिक क्षमता कमी झाली आहे. तुम्ही आर्थिक उत्पन्न मिळवू शकत नाही किंवा तुमचे वय झाले असेल अशावेळी SWP हा सर्वात सुंदर आणि उत्तम पर्याय उपलब्ध असतो. म्हणून अशावेळी तुम्ही MF मध्ये SWP चालू करू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला FD, PF, जमीन, प्लॅट, फ्लॉट विक्री किंवा अन्य स्रोतामधून एकरकमी पैसे जर मिळाले असेल तर त्या आलेल्या पैस्यांना सरळ SWP मध्ये गुंतवणूक करू शकत आहे. 

चला तर आपण आता खाली SWP पाहू या. 

8) SWP - पद्धतशीर पैसे काढण्याची योजना 

■ गुंतवणूक रक्कम - 2,00,00,000 ₹ (दोन कोटी रुपये)

■ दरमहा पेन्शन रक्कम - 1,50,000 ₹

■ अपेक्षित रिटर्न रेट - 15 % 

■ कालावधी - 20 वर्षं

■  गुंतवणूक रक्कम - 2,00,00,000 ₹ (दोन कोटी रुपये)

■ एकूण काढलेली रक्कम - 3,06,00000 ₹ (तीन कोटी सहा लाख रुपये)

■ शिल्लक रक्कम रुपये - 13,05,74,672 ₹ (तेरा कोटीपाच लाख चौर्याहत्तर हजार सहाशे बहात्तर रुपये) 

वरीलप्रमाणे आपण SWP पाहिली आहे, त्यामध्ये तुम्ही दरमहा 1,50,000 ₹ पेन्शन म्हणून Withdrawal करू शकत आहे. तुम्ही दरमहा 1,50,000 ₹ काढले तरी तुम्हाला उर्वरीत रक्कमेवर अंदाजे 12 % ते 18 % व्याज परतावा मिळू शकतो. पण आपण तो केवळ 15 % पकडला आहे. त्यामुळे तुम्ही जरी दरमहा 1,50,000 ₹ काढले तरी तुम्हाला 20 वर्षांनंतर शिल्लक रक्कम रुपये - 13,05,74,672 ₹ (तेरा कोटी पाच लाख चौर्याहत्तर हजार सहाशे बहात्तर रुपये) कॉर्पस म्हणून मिळतील. अर्थात हे पैसे तुमच्या MF च्या पोर्टफोलिओमध्ये शिल्लक असतील.

9) मुदतीपूर्वी गुंतवणूकदारांनी पैसे काढल्यास ?

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षापूर्वी पैसे काढले तर विमा संरक्षण हे एसआयपी नंतर थांबले जाईल. कारण एसआयपी थेट विमा संरक्षणाच्या प्रमाणात आहेत. दुसऱ्या बाजूला जेव्हा गुंतवणूकदार 3 वर्षांनंतर पैसे काढतो तेव्हा त्याला विमा संरक्षण मिळते जे महिन्याच्या पहिल्या व्यावसायिक दिवशी वाटप केलेल्या एसआयपी युनिट्सच्या बरोबरीचे असते, ज्यामध्ये नूतनीकरण पुष्टीकरण दिले जाते.

10) SIP ला अपेक्षित रिटर्न कमी मिळाले तर ?

तुम्ही शक्यता गृहीत धरली त्यापेक्षा SIP ला वार्षिक व्याज परतावा कमी मिळाला म्हणजे 20% ऐवजी 12% परतावा मिळाला असे गृहीत धरू या. तरी सुद्धा तुम्हाला कंपाउंडिंग पावर ने 20 वर्षांनी SIP ला 99,44,358 ₹ (नव्व्यानव लाख चव्हेचालीस हजार तीनशे अठ्ठाठवन्न रुपये) मिळतील. 

तुम्ही पेन्शन म्हणून त्या रकमेतून दरमहा 75,000 ₹ पुढील वीस वर्षे दरमहा काढले तरी त्यानंतर सुद्धा तुम्हाला अंदाजे 6,52,87,356 रुपये (सहा कोटी बावन्न लाख सत्त्यऐंशी हजार तीनशे छपन्न रुपये) शिल्लक कॉर्पस म्हणून मिळतील. 

11) स्टॉक मार्केट कोसळले आणि पैसे बुडाले तर ?

आजपासून वीस वर्षांपूर्वी भारतीय Stock Market कुठे होते? आणि दरम्यानच्या काळात किती वेळा मंदी आली होती. त्यावेळी Stock मार्केट किती %  कोसळले होते? याबाबतीत माहिती घेऊ या.

● सेन्सेक्स      :  6250 ते 85978, 

● निफ्टी 50    : 2080 ते 25145,

● बँक निफ्टी  :  1000 ते 54398.

वीस वर्षांपूर्वी वरील निर्देशांक किती अंकावर ट्रेड करत होते? हे एकदा Google करून पहा. आणि आज किती अंकांवर ते ट्रेंड करत आहे हे पहा. म्हणजे किती वेळा शेअर मार्केट कोसळले होते आणि त्यानंतर किती वेळा ऐतिहासिक उंची गाठली होती हे समजेल. खालील फोटोत भारतीय Stock मार्केट कोणत्या वर्षी किती % कोसळले होते हे समजेल.




जेव्हा कोणताही गुंतवणूकदार हा दीर्घकालीन गुंतवणूक करतो तेंव्हा त्याला धोका कमी होत असतो. आणि धोका कमी होऊन नफ्याकडे वाटचाल चालू होतं असते. कारण जेंव्हा जेंव्हा मार्केट कोसळते तेंव्हा तेंव्हा आपल्याला MF ची NAV स्वस्तात मिळत असतात. म्हणजे परिणामतः आपल्याला NAV चे भाग कमी पैस्यांना सवलतीमध्ये उपलब्ध होतात. त्यामुळे जेंव्हा जेंव्हा मार्केट कोसळते तेंव्हा तेंव्हा अनुभवी आणि तज्ञ लोकं गुंतवणूक करून ती वाढवण्यासाठी सल्ला देत असतात.

12) भारतीय इकॉनॉमीची पुढील 20 वर्षे 

आज भारताची इकॉनॉमी जागतिक पातळीवर 5 व्या स्थानावर आहे. आणि येत्या 15 वर्षात जर भारतीय इकॉनॉमी 3 ऱ्या स्थानावर आली किंवा 2 ऱ्या स्थानी आली, तर भारतीय बाजारपेठ आणि भारतीय उद्योग व्यवसाय हे जगाचे उत्पादन हब होईल. तुम्हाला मिळणाऱ्या रिटर्नची पुढील 20 वर्षाची आकडेवारी मांडली आहे. यावरून तुम्ही अंदाज मांडू शकता की तुम्हाला किती रक्कम मिळू शकत आहे.

13) MF SIP चालू करायला कोण अडवत आहे ?

तुम्हाला कोणत्या गोष्टींची तक्रार आहे? कोणती भीती वाटतं आहे? कोण अडवत आहे? कोणती अडचण आहे? 

तुम्हाला गुंतवणूक करायला जमत नसेल तर असे करा, की केवळ 4,000 ₹ किंवा 5,000 ₹ MF SIP चालू करा. बर ठीक आहे, पैसे नाहीत, शिल्लक राहत नाही, जमत नाही तर मग 100 ₹, 300 ₹, 500 ₹, 1,000 ₹ चालू करा. आणि पुढे हळूहळू  गुंतवणूक रक्कम वाढवत चला. त्यामुळे ही सर्व गणिते आणि भविष्याचा वेध पाहता काळानुसार बदल करून आपण स्मार्ट गुंतवणूक करायला हवी आहे.




14) SIP Calculator गुंतवणुकीचा हिशोब 

      Sip Calculator खालील लिंकवर क्लिक करून आपल्या गुंतवणुकीचा हिशोब करून पहा.

     ◆ SIP आणि LUMPSUM गुंतवणूक हिशोब करण्यासाठी येथे क्लिक करा

     ◆ Step Up SIP Calculator गुंतवणूक हिशोब करण्यासाठी येथे क्लिक करा


15) खालील Youtube व्हीडिओ आणि वेबसाईट तुम्हाला अधिक माहिती देतील. 

   ◆ म्युच्युअल फंड म्हणजे काय? रचना रानडे व्हिदिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

   ◆ आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक काळाची गरज व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  ◆ डायरेक्ट म्युच्युअल फंड विरुद्ध रेग्युलर म्युच्युअल फंड | म्युच्युअल फंड मालिका व्हिडीओ पाहण्यासाठी येथे   क्लिक करा.             

   ◆  Mutual Funds Sahi Hai - म्युच्युअल फंड ठीक आहे

   ◆  AMFI INDIA - Association of Mutual Funds

   ◆  Mutual Fund Transfer Agent | Online Investment, Services

      इत्यादी. 


Disclaimer

म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. व्याजदरातील चढउतारांसह सिक्युरिटीज बाजारावर परिणाम करणारे घटक आणि शक्तींवर अवलंबून योजनांचे NAV वर किंवा खाली जाऊ शकतात. 

Arjun Lahnaba Said © www.arjunsaid.blogspot.com अंतर्गत Copyright 2024 हक्क सुरक्षित आहेत.






Post a Comment

0 Comments

close