Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्वराज्याची शपथ घेतलेले पठार म्हणजे “रायरेश्वर” आणि सात रंगाच्या मातीच नातं काय ? आहे वाचा





 स्वराज्याची शपथ घेतलेले पठार म्हणजे “रायरेश्वर”....सात रंगाच्या मातीच नातं काय ? आहे वाचा



      
● श्री.रायरेश्वर मंदिर आणि पठार याचे महत्व - 

रायरेश्वर पठाराला इतिहासात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. याच रायरेश्वराच्या पठारावर एक भगवान श्री. शंकराचे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेले भव्य आणि सुंदर पांडवकालीन मंदिर आहे. याच मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी त्यांच्या बाल सवंगड्यांच्या सोबत अर्थात मावळ्यांच्या साथीने १७ एप्रिल १६५४ ला हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती. पुढे हेच हिंदवी स्वराज्य मराठा साम्राज्यात रूपांतर होऊन अखंड हिंदुस्थानात हे हिंदवी स्वराज्य विस्तारले होते. 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायरेश्वरवर केवळ१६ व्या वर्षी स्वराज्याचे तोरण बांधले.  मुठभर मावळमध्ये धर्म प्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. त्यावेळी स्वराज्यासाठी मावळे जीवाची परवा न करता लढून स्वतःला झोकून दिले होते.त्यांनी  एक एक करत अनेक प्रदेश जिंकले. केवळ वयाच्या ५० वर्षाच्या कालावधीत विजापूर आणि दिल्ली या सत्ता दिशांना पाणी पाजले. महाराजांनी हिंदवी स्वराज्य छापण्याची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. तो धर्माला राजकीय आसन प्राप्त करून दिले छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाग्यविधाते म्हणून स्वराज्याची जनता त्यांना पाहू लागले काहीजण तर त्यांना हिंदू पती म्हणून लागले शिवरायांनी वेदांचे प्राण्यांचे देवांचे रक्षण केले. सर्वांगड्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ वयाच्या सोळाव्या वर्षी घेतली होती. शिवरायांनी श्री. रायरेश्वराच्या मंदिरात कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक,सूर्याची काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते आणि सोनोपंत डबीर या आपल्या बारामावळातील सवंगड्यांच्या साथीने १७ एप्रिल १६४५ रोजी स्वराज्याची शपथ घेतली.




चित्र सौजन्य : @safar_swarajyachi @shivray_trekkers


   

● रंगीत माती बाबत वैशिष्ट्य -

वरील चित्रात पाच ते सात रंगांच्या प्रकारची माती ही रंगद्रव्य म्हणून वापरण्यात येत होती.  मुख्यतः पिवळे, तांबडे अथवा तपकिरी रंगाचे लोह रंगीत माती मध्ये सामान्यतः सजल पिवळे, निर्जल तांबडे लोह ऑक्साइडी खनिजे (अनुक्रमे लिमोनाइट व हेमॅटाइट) तसेच अतिसूक्ष्म चूर्ण रूपातील सिलिकेटी, चूर्णीय वा इतर मातकट द्रव्ये व कधीकधी ॲल्युमिनियम ऑक्साइड यांचे मिश्रण झालेले असतात.  या द्रव्यांचे प्रमाण निरनिराळ्या मात्यांमध्ये निरनिराळे आढळते आहे. लोह व मँगॅनीज ही दोन्ही असेल तर माती पिवळसर तपकिरी दिसते. मँगॅनीज ऑक्साइडाचे प्रमाण आणखी वाढल्यास गडद तपकिरी अंबर माती बनते.

कोणत्याही लोहयुक्त खडकावर वातावरण क्रिया होऊन तांबडी व पिवळी वा तपकिरी रंगीत माती बनत असते. ज्या ठिकाणी वातावरण क्रिया खोलवर व पूर्णतया झालेली असते. अशा ठिकाणी यांचे बहुसंख्य साठे आढळले आहेत.फेरोमॅग्नेशियम सिलिकेटे, ग्रीनस्टोन अथवा क्लोराइट हे खनिज विपुल असणारे खडक यांच्या पासून हिरवी, तर जिप्सम, बराइट, संगजिरे इत्यादीं पासून पांढरी माती तयार होते. रंगीत मात्या सामान्यपणे स्तरित खडकांत आढळतात अशा खडकांत त्यांचे थर अथवा पट्टे आढळतात क्वचित यांचे मोठे साठेही आढळतात. 

आकर्षक रंग व अधिक क्षेत्र व्यापण्याचा गुणधर्म यांमुळे माणसाचे लक्ष रंगीत मातीकडे आकर्षिले गेले असावे. प्रागैतिहासिक काळापासून किंवा त्याही आधीपासून माणूस रंगीत मातीचा उपयोग करीत आलेला आहे. त्या काळी मातीची भांडी रंगविणे, चित्रे काढणे, भित्तिलेपचित्रे (भिंतीवरील उठावाची चित्रे) तयार करणे वगैरे सुशोभनाच्या कामांसाठी रंगीत माती वापरली जात होती. 

थीओफ्रॅस्टस (इ.स ३७२−२८७) यांच्या लेखनात रंगीत माती वापरल्याचा उल्लेख आढळतो.



Post a Comment

0 Comments

close