Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पुणे - अहमदनगर - छ्त्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे तीनही जिल्ह्यातील या गावातून जाणार । अधिक माहितीसाठी वाचा

 



 पुणे - अहमदनगर - छ्त्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे तीनही जिल्ह्यातील या गावातून जाणार । अधिक माहितीसाठी वाचा 





पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमी सतत चर्चेत असतात. त्या चर्चे मागचं कारण म्हणजे नितीन गडकरी हे वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गाच्या घोषणा करून त्याचे उद्घाटन करतात. आणि नवनवीन महामार्गाच्या उद्घाटनानंतर लवकरच ते काम चालू करतात. पुणे ते संभाजीनगर एक्सप्रेसवे या महामार्गाची त्यांनी नुकतीच घोषणा केलेली आहे.

पुणे - अहमदनगर - औरंगाबाद असा हा नवीन एक्सप्रेस वे तयार होणार आहे. अंदाजे हा एक्स्प्रेसवे २६० किलोमीटरचा असणार आहे. तर  नगर जिल्ह्यामध्ये एकूण १२३ किलोमीटरचा एक्सप्रेसवे राहणार आहे.


Pune - Ahamadnagar - Chatrapati  Sambhaji Nagar Expressway


पुणे - अहमदनगर - औरंगाबाद हा महामार्गभोर, पुरंदर, हवेली, दौंड शिरूर या तालुक्यातून जाणार आहे. भोर तालुक्यातील भूसंपादनासाठी भोर, वेल्ह्याचे उपविभागीय अधिकालरी, पुरंदर व दौंड साठी दौंड - पुरंदरचे उपविभागीय अधिकारी आणि हवेलीसाठी हवेलीचे उपविभागीय अधिकारी तर पुणे शहराचे उपविभाग अधिकारी यांची शिरूर तालुक्यासाठी भूसंपादन म्हणून सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

भारतमाला (NHAI) अंतर्गत येणारा ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग अर्थात पुणे अहमदनगर औरंगाबाद दूधगती महामार्ग पुणे जिल्ह्यातून जाणार आहे. तर पुणे जिल्ह्यातील गावांची यादी आपण पाहणार आहोत.



पुणे - छ. संभाजीनगर एक्सप्रेसवे



पुणे जिल्हा – खेड शिवापूर येथून या एक्सप्रेस वेला सुरुवात होईल. पुरंदर, हवेली आणि शिरूर या एकूण तीन तालुक्यातुन हा एक्सप्रेस वे अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करेल. पुढे अहमदनगर मधील श्रीगोंदा, पारनेर, नगर, पाथर्डी आणि शेगाव या तालुक्यांचा समावेश असेल. संभाजीनगर जिल्ह्यात हा एक्सप्रेस वे पैठण तालुक्यातुन प्रवेश करेल.


पुणे- अहमदनगर- छ. संभाजी नगर एक्सप्रेसवेच्या भूसंपादनाची नुकसान भरपाई कशी मिळेल ? अधिक माहितीसाठी येथे क्लिक करून वाचा


● भोर तालुका- भोर तालुक्यातील गावांची यादी पुढीलप्रमाणे कांजळे, वरवे बुद्रुक, कासुर्डी ख. बा.,  कासुर्डी गु.म. आणि इतर ही गावे समाविष्ट आहेत. 

● पुरंदर तालुका - खेड शिवापूर येथून सुरू होईल पुढे शिवरे, थापेवाडी, वरवडी, गराडे, कोडीत ख, जांभळी, पवारवाडी, सासवड, हिवरे, दिवे, काळेवाडी, सोनेरी आणि इतर गावे पुरंदर तालुक्यातील समाविष्ट आहेत.

● हवेली तालुका - हवेली तालुक्यातील आळंदी मातोबाची, तरडे, वळती, शिंदवणे, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ, भावरापुर, हिंगणगाव आणि इतर काही गावे समाविष्ट आहेत.

● दौंड तालुका - दौड तालुक्यातील पाठेठाण, राहू, मिरवाडी, दहिटने आणि इतर गावांचा समावेश आहे.

● शिरूर तालुका - देवकरवाडी, पिलानवाडी, तळेवाडी, वडगाव बांडे, टाकळी, पानवली, वरळगाव, सातकरवाडी दहिवडी, आंबळे, करडे, बाभूळसर खुर्द, चव्हाणवाडी आणि गोलेगाव या तालुक्यातील  ४४  गावांमधून हा महामार्ग जाणार आहे.





अहमदनगर जिल्हा - 

● श्रीगोंदा तालुका - हिंगणी, देवदैठण ढवळे वस्ती आणि परिसर.

● पारनेर तालुका - रांजणगाव पाडळी, कडूस, भोयरे गांगर्डे, बाबुर्डी, रुई छत्रपती, पिंपरी गवळी, अस्तगाव, सारोळा कासार. रायतळे

● नगर तालुका - बाबुर्डी घुमट, भातोडी, दगडवाडी, पारगाव, मराठवाडी, उक्कडगाव.

● पाथर्डी तालुका - तिसगाव, शिरापूर, निवडुंगे, सुसारे, प्रभू पिंपरी, सैदापुर, देवराई, 


औरंगाबाद जिल्हा - 

● पैठण तालुका - पुढीलप्रमाणे गावे खडके, मडके, साईगाव, दादेगाव जहागीर, पानठेवाडी, कांजरखेडा, वरुडी बुद्रुक, वावा गाव, वडाळा गाव, डोणगाव (पैठण), पोरगाव तांडा, वरवंडी खुर्द, घरडोण, आडगाव, मौजे झाल्टा, सुंदरवाडी, रामपूर, मल्हारपूर पासून औरंगाबाद – जालना एक्सप्रेस- वे जोडला जाईल.

वरील माहिती ही अंदाजे दिली आहे ती अंतिम नाही. यापेक्षाही अधिक गावामधून हा पुणे - अहमदनगर -  औरंगाबाद महामार्ग जाऊ शकतो आहे.


पुणे - अहमदनगर - छ्त्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे भूसंपादनामध्ये तुमची जमीन जात असेल तर हे वाचा








Post a Comment

0 Comments

close