Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वडिलांची संपत्ती : हिंदूवारसा हक्क कायदा आणि हक्कसोडपत्रामुळे बहीण - भावाचे नाते संपुष्टात येत आहे का?

    




                     मुलगी ही परक्याचे धन असून ती कधी ना कधी तिच्या घरी जाणार अशी मानसिकता मुलीच्या वडिलांच्या घरी म्हणजे तिच्या जन्मदात्यांच्या घरी माहेरी असते. मुळात मुलगा - मुलगी समान असे आपण अजूनही समजत नाही आहे. ही मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत भारत सरकारने कितीही कायदे केले तरी ते सार्थकी लागणार नाही. आज आपण पाहणार आहोत, हक्कसोडपत्र आणि मुलीला वडिलांच्या संपत्तीबाबत मिळणारा कायदेशीर अधिकार.





मुलीने स्वखुशीने हक्कसोडपत्र केले तर मुलीला वडिलांच्या संपत्तीमध्ये हक्क मिळवण्याचा अधिकार संपुष्टात येत आहे.



Image Secure By - Arjun said



If the daughter voluntarily relinquishes the rights, the right of the daughter to acquire rights in the father's property ceases.



                           अलीकडे शिक्षणामुळे समाजामध्ये जागृतता निर्माण झालेली आहे. आणि मुलींच्या शिक्षणाचे प्रमाणही त्यानुसार वाढलेले आहे. वडिलोपार्जित संपत्तीवर मुलांप्रमाणे सर्व मुलींचा समान हक्क अर्थात वाटा असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. न्यायालयाच्या या निर्णया बाबत समाज अनभिज्ञ आहे. आणि आता हिंदू वारसा हक्क कायद्याने पण मुलींना मुलाप्रमाणे वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क प्राप्त झाला आहे. पण आज ही वडिलांच्या संपत्तीत मुलींना हक्क मिळण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. आणि वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींचा किती टक्के हिस्सा आहे, याबाबत मतभिन्नता पहावयास मिळत आहे.


बऱ्याच वेळा अनेक प्रकरणांमध्ये कधी वडील हयात नसतात किंवा मुलगी हयात नसते. त्यामुळे पुढील वारसांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर समान हक्क प्राप्त होत असतो किंवा नसतो. याबाबत लोकांना कायद्याची माहिती नसते. 



 हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये सन २००५  साली सरकारने सुधारणार केलेली आहे. वडील किंवा मुलगी हयात असो वा नसो वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा समान अधिकार आहे. 



 असे सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसापूर्वी एका प्रकरणात स्पष्ट केलेले आहे. हा संपत्तीचा समान हक्क कायदा अस्तित्वात येऊन आता पंधरा वर्षे झालेली आहेत. पण तरीही त्याबाबत प्रत्यक्षात घरात या मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा मिळतो का? कायद्याने मिळत असलेला वारसा हक्क मुली का नाकारतात?  हा हक्क मागितल्याने माहेर तुटेल असे मुलींना का वाटते?  किंवा का वाटत असेल?  याबाबत आपण या लेखामध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत.


लग्नानंतर संपत्ती वाटपामुळे माहेर तुटते?


वडिलांच्या संपत्तीमध्ये सर्व मुला - मुलींचा समान हक्क असतो. तसा तो हक्क मुलीलाही कायद्याने प्राप्त झालेला आहे. आज मुली शिकलेल्या आहेत. त्यांना त्यांचा हक्क आणि कायदा याची प्रत्यक्षात संपूर्ण माहिती उपलब्ध होत आहे. परंतु त्या मुली आपल्या हक्काबाबत वडिलांशी किंवा भावांशी बोलण्यास अडखळतात. त्याचं कारण हे आहे की हा केवळ संपत्तीचा विषय नसून रक्ताच्या नाते संबंधाचाही विषय आहे, असं त्यांना मनोमन वाटत असते. जमिनीच्या चार दोन तुकड्यासाठी आपलं माहेर साडी चोळीला मुकु नये आणि माहेरचा आधार जाऊ नये. म्हणून मुली आपला हक्क बजावण्यासाठी धजावत असतात. तसे पाहिले तर हिंदू संस्कृती आणि एकत्र कुटुंब पद्धतीला आणि चाली - रीत रिवाजला धरून हे होत आहे.



बहिणीचे प्रत्यक्ष मत -


पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे राहणाऱ्या श्रीमती अर्चना ठाकूर ( नाव बदललेले आहे) यांचा वेगळा अनुभव नाही. त्यांचा पण असाच अनुभव आहे. त्यांच वडिलांकडे पूर्ण शिक्षण घेऊन लग्न झाले. लग्न झाल्यावर सासरी त्या राहून शेती करत आहेत. त्यांच्याशी आमच्या टीमने संपर्क केला. त्यावेळी त्यांनी सांगितलेला अनुभव आपण पाहणार आहोत.

 

               त्या असे म्हणाल्या की - माझ्या आई-वडिलांनी माझा जन्म झाल्यापासून कोणत्याही गोष्टीची मला कमतरता जाणून दिली नाही. माझ्यासह मला दोन मोठे भाऊ आहेत. भावासह आई वडील आता गावी असतात. पण वडिलांनी काही वर्षांपूर्वी शेतीच्या जमिनीचा आणि गावातील घरातील संपूर्ण वाटा भाऊ हिस्सा वाटणी करून दोघा भावांना अर्धा-अर्धा करून त्यांच्या नावावर करून दिला. आता आमच्या कुटुंबाची एकूण शेत जमीन आणि गावातील घर आई-वडीलांनी माझ्या दोन्ही मोठ्या भावाच्या नावावर केले आहे. परंतु माझं लग्न झाल्यामुळे त्यांनी वाटणी करताना मला विचारलं सुद्धा नाही. आणि त्यामुळे त्यांनी माझ्या नावावर त्यातील एक गुंठा सुध्दा केलेला नाही. मला याचं वाईट वाटत आहे. जर कायद्याने मुलींना समान हक्क आहेत. तर प्रत्यक्षात संपत्ती नावावर करताना हे हक्क कुठे जातात? मला त्यांची जमीन नको आहे. परंतु मनात दुराग्रह असू नये. निदान त्यांनी मला विचारलं तरी पाहिजे होतं. तुला किती जमीन हवी आहे? तुझ्या वाट्याला इतकी जमीन येत आहे. ती तुला आम्ही देऊ का? आम्ही इकडे आपल्या जमिनीचे वाटप पत्र करत आहोत. तुझं काय मत आहे? असं विचारलं असतं तरी मनाला समाधान वाटलं असतं. परंतु त्यांनी मला तसं विचारायची तसदी पण घेतली नाही.

                                माझ्या सासरच्यांचे काय मत आहे? आणि त्यांना माझ्या वडिलोपार्जित जमिनी हिस्सा हवा की नाही याबाबत मी त्यांना विचारलं नाही. पण भविष्यात यावरून काही न काही वाद नक्कीच निर्माण होईल. त्याला कसे सामोरे जायचं, मनावर याचा ताण आहे हीच भीती वाटत आहे.



शेतकऱ्यांना आता स्टॅम्प न देणे महागात पडेल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करून वाचा




रक्ताच नातं -

 

मुलगी मोठी झाल्यानंतर तिचं लग्न होतं. लग्न झाल्यावर नंतर मुलीसाठी माहेर संवेदनशील विषय असतो. मुलीला सासर कसं वागवत आणि भविष्यामध्ये सासरच आपला शेवटचा थांबा असेल याची खात्री जेव्हा मुलीला होते. तेव्हा ती सासरकडे बिंदास राहते. परंतु अनेक वेळा सासरकडे त्रास, छळ झाला तर मुलीला माहेरचा आधार असतो. शिक्षण घेतल्यानंतर मुला - मुलींना समान हक्काबाबत आणि आपल्या अधिकाराची माहिती होते. तरी प्रत्यक्षात जेव्हा असा विषय येतो, तेव्हा आपल्या आई-वडिलांचा भावाचा निकटचा संबंध असतो. तेव्हा थेट असा कोणताही निर्णय घेता येत नाही. जीवाभावाची रक्ताची नाती, माहेर कायमचे मुकावे लागेल यामुळे अनेक मुली शांत बसत असतात. आणि दिल्या घरी सुखी राहतात. 



बहीण भावामध्ये वादाचे कारण -


पुणे जिल्ह्यामध्ये आणि मुंबईसारख्या उपनगरांमध्ये वेगाने विकसित होणाऱ्या लगतच्या एमआयडीसी आणि औद्योगिक वसाहती भागामध्ये भावा बहिनीशी वडिलांच्या संपत्तीवरून नेहमीच अनेक ठिकाणी वाद-विवाद होत असतात. कारण तिकडे जमिनीला आलेले करोडोंचे भाव (बाजार मूल्य) हे होय. हे आकडे पाहून इतर जिल्यातील लोकांचे डोळे विस्फारतील असे कोट्यवधींचे बाजार आलेले आहेत. त्यामुळे वकिलांकडे अशा अनेक महिला येत असतात. संपत्तीत वाटा मागितला की भावा-बहिणी मध्ये भांडण सुरू झालेली असतात. कित्येक प्रकरणांमध्ये केस हायकोर्ट पर्यंत जाते. पण अशा अनेक केसेसमध्ये माहेरून मुलीला आई-वडिलांचा पाठिंबा अजिबात मिळत नाही. आई वडील भाऊ अर्थात माहेर कायमस्वरूपी मुकेल या भीतीपोटी अनेक मुली माघार घेतात. परंतु संपत्तीत वाटा मागितला म्हणून माझ्या मुलीने विश्वास घात केला आहे. असे वडिलांना वाटत असते. तर भाऊ म्हणतो की माझ्या बहिणीने मला फसविले आहे. असे चित्र कुठेतरी निर्माण करण्यात येते. अशी वस्तुस्थिती असल्याचं अनेक मुलींना वाटत आहे. अर्थात ह्या मुली संपत्तीमुळे कुटुंबाच्या विरोधात उभ्या राहत आहेत, असे नेहमी बोलले जाते. अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आणि वस्तुस्थिती आहे.आता आपण पुणे जिल्ह्यातील उदाहरण पाहू या. रांजणगाव गणपती, कोरेगाव भीमा सणसवाडी, शिक्रापूर आणि वाघोली, मांजरी आणि आव्हाळवाडी ही गावे जवळपास पुणे अहमदनगर महामार्गावर आहेत. शिवाय इकडे एमआयडीसी आणि औद्योगिक वसाहत क्षेत्र पण आहे. त्यात वेगाने नागरिकीकरण वाढत आहे. त्यामुळे शेती क्षेत्र कमी होऊन गुंठेवारी वाढत आहे. अशा वाढत्या नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरनामुळे जमिनींचे बाजार मूल्य हे प्रति गुंठा ५ लाख + ते २० लाख रुपये + झाले आहे. 



Image Secure By - Twitter



हिंदू वारसा हक्क -


२००५ मध्ये हिंदू वारसा हक्क कायद्यात आणखी महत्त्वाचे काही बदल करण्यात आले आहेत. मुलीला स्वतःहून पुढाकार घेत संपत्तीत वाटा मागता येणार आहे. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे विधवा स्त्रीने पुनर्विवाह केला तर पहिल्या नवर्‍याच्या मालमत्तेचा हक्क राहणार नाही. 



भारतीय कायद्याच्या अधीन राहूनच कुटुंबातील मुलींना वडिलांच्या संपत्ती पासून दूर लोटले जात आहे. असं अनेक महसूल कायदे तज्ञ सांगत आहेत. हे करण्यासाठी योग्य आणि कायदेशीर मार्ग म्हणजे मुलींचे हक्कसोड पत्र करून घेणे हे महत्त्वाचं अस्त्र वापरलं जात आहे.



माहेरची साडी चोळी - 


संपत्तीत नोंदणीकृत हक्क सोडपत्र हा एक कायदेशीर आणि योग्य दस्त आहे. कुटुंबातील मुलींचा संपत्तीवरील दावा सोडताना असे हक्क सोडपत्र करून घेण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये अजूनही चालू आहे. वडिलांच्या संपत्तीवर मी स्व: खुशीने, स्वतःच्या मर्जीने, राजी खुशीने दावा सोडत आहे. कुठलाही मोबदला याद्वारे मी घेणार नाही. मी स्वतः राजी खुशीने स्व: मर्जीने कोणाच्याही दबावाला बळी न पडता यावर सही करत आहे. असा मजकूर हक्क सोडपत्रा वरती असतो. बहिणीने एकदा हक्क सोडपत्र करून दिले की तिला माहेरला साडीचोळी देण्याची ची पद्धत, एक परंपरा महाराष्ट्रात अजूनही अखंडित चालू आहे. 



लग्नागोदरचे हक्क सोडपत्र - 


महाराष्ट्र राज्यात लग्नाचं वय १८ असल्यामुळे बऱ्याच मुलींची लग्न ही वय वर्षे १८ ते २५ दरम्यान होतं असतात. त्यामुळे अनेक कुटुंबही मुलीचे लग्न होण्याअगोदरच हक्कसोडपत्र करून घेत असतात. आणि हक्क सोडपत्र करण्यासाठी मुलगी राजी खुशी असेल तर यामध्ये इतर कोणाचं काही चालू शकत नाही. अशा मुलींचे लग्न झाल्यानंतर सासरच्या मंडळींचे सुद्धा यामध्ये काही चालू शकत नाही. त्यामुळे एकदा हक्क सोडपत्र झालं की पुन्हा त्यात हस्तक्षेप करता येत नाही. हक्क सोडपत्र ही एकमेव पद्धत नाही तर महाराष्ट्रातील समाज व्यवस्थेत ही तरतूद केल्या सारख्या काही पद्धती वापरण्यात आलेल्या आहेत. तसे ही मुलींच लग्न यात एक महत्त्वाची भूमिका आहे.



शेजारच्या शेतकऱ्यांने बांध कोरला असेल तर अशी घडवा अद्दल अधिक माहिती येथे क्लिक करून वाचा




मुलींना जमीन आणि पैसे दिले जातात?


बऱ्याच वेळा मुलींना हक्क सोडपत्र करून घेताना १, २ गुंठे दिले जातात. आणि त्या बदल्यात त्यांचं हक्क सोडपत्र करून घेतले जाते असते. तर काही ठिकाणी काही मुलींना एक लाखापासून ते दहा वीस लाखापर्यंत रक्कम दिलेली असते. रकमेबाबत आणि दिलेल्या शब्दाबाबत नंतर दोन्ही बाजूने वेगवेगळे द्यावे आणि प्रतिदावे केले जातात. तर काही ठिकाणी साडी - चोळी आणि काही दागिने दिले जातात. परंतु पुणे जिल्ह्यामध्ये किंवा मुंबई जवळील ग्रामीण भागामध्ये आणि महाराष्ट्रातील एमआयडीसी भागामध्ये जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत. अशा ठिकाणी पूर्वी हक्क सोडपत्र करून दिले असले तरी नव्याने कोर्टात दावे दाखल करण्यात आलेले आहेत. असे एका वकिलाने आमच्या टीमशी बोलताना सांगितले की अनेक कुटुंबात अशा शेत जमीन आणि जागांमध्ये हक्क सोडपत्र करून दिलेले असते. तरी बहीण भावामध्ये वाद पहायला मिळत आहे. ह्या वादाचे मुख्य कारण जमिनीला आलेले कोटीं कोटीचे भाव. आणि त्याच जमिनी भावांनी विकायला काढल्या आहेत. तेही बहिणीला काडीचीही किंमत न देता. कारण बहिणीचे पूर्वी हक्क सोडपत्र घेतले आहे.


 

एकदा हक्क सोडपत्राचा दस्त नोंदणी करून सातबारा वर त्याचा अंमल झाला की, हक्क सोडलेल्या मिळकतीमध्ये पुन्हा हक्क आणि हिस्सा मागण्याबाबत कायदेशीर तरतूद नाही.




भावाच मत -

एका भावाने नाव न सांगण्याच्या अटीवर आपलं मत व्यक्त केलं की - बहिणीच्या लग्नामध्ये कुठलीही खर्च करण्याची कसूर बाकी ठेवली नाही. काय हवं, काय नको आहे याची तादात पडून दिली नाही. सर्व वस्तू आणि साहित्य देऊन बहिणीचे लग्न भरभक्कम हुंडा देऊन मोठ्या थाटामाटाने केले होते. तिला तोलामोलाच चांगलं सासर पाहून दिले आहे. त्यासाठी कर्ज पण डोक्यावर घेतले. एवढं सगळं करून सुद्धा वरती वडिलांच्या संपत्तीवर तिने दावा दाखल करणे म्हणजे आपल्या आईवडिलांशी प्रतारणा केल्यासारखंच आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबांमध्ये बेबनाव पाहायला मिळत आहे. आम्ही बहिणीला साडी-चोळी आणि बांगडी देण्यास तयार आहोत. परंतु संपूर्ण संपत्तीत समान हिस्सा देणे म्हणजे आमच्या मुलांच्यावर अन्यायच होत आहे. बहिणीला सासरची पण संपत्ती असतेच की याचा विचार होणे गरजेचे आहे. आम्हाला मान्य आहे कायदा समान हक्क देतो. परंतु आम्हाला दोघा भावांना दोन - दोन मुले आणि मला एक मुलगी आहे. भविष्यात त्यांच्याही वाटन्या कराव्या लागतील. तर आम्ही बहिणीला समान हिस्सा दिला तर आमच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ शकतो. याकडे सुद्धा राज्यकर्त्यांनी शासनाने पाहण्याची गरज आहे. सर्व स्त्रियांना, मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये समान हक्क ही संकल्पना योग्य असली तरी त्याची दुसरी बाजू पाहणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकत्र कुटुंब पद्धत धोक्यात येऊ पाहत आहे. नाती ही नाती राहिली नसून त्यांची माती व्हायची वेळ अशा संपत्तीच्या वाटणीमुळे होत आहे.


तुम्हाला ह्या लेखाबाबत काय वाटते आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा. 

धन्यवाद !  









Post a Comment

0 Comments

close