सामान्य शेतकऱ्याचा तरुण मुलगा एक व्यावसायिक म्हणून कसा घडतो ? याचं उत्तम उदाहरण
पुणे : अनिल दादा बंने यांच्या घरी भेट देता येईल, असे कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते. आम्ही दोघे सन २०१८ पासून संपर्कात आहोत. पहिला धारकरी आर्थिक साक्षरता वर्ग १५ ऑगस्ट २०१८ रोजी घेतला होता. हे प्रशिक्षण झाले तेंव्हा आमची भेट झाली होती. तिथेच दोघांची तुटकशी ओळख झाली होती. तसे मला अनेकजण भेटले आणि त्यांनी काम पण चालू केलं. परंतु अनिल दादांना काही प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांनी मला पुन्हा वेळ मागितला होता. मी वेळ दिला आणि त्यांच्या सोबत श्री. राज वाडेकर (चाकण पुणे) यांना पण वेळ दिला होता, म्हटलं दोघे एकत्रच या. जवळपास ३०० किलोमीटर अंतरावरून श्री. अनिल दादा मला भेटायला आले होते. भेटायला म्हणजे काय तर आणखी शिकायचं होत आणि खरच पैसे कमवता येतील का? हे विचारायचं होतं आणि समजून घ्यायचं होते.
तेव्हा त्यांना मी सणसवाडी, तालुका - शिरूर जिल्हा - पुणे येथे आल्यानंतर आमच्या गावातील डोगरावर असणाऱ्या श्री नरेश्वर मंदिरामध्ये दोघांना भेटायला बोलावलं होतं. तिथे मी गेली ७, ८ वर्ष वृक्षारोपण आणि संवर्धन करत आहे. माझ्याजवळ माझा लॅपटॉप होता, लॅपटॉप वरून दोघांना मी सर्व माहिती दिली आणि पुन्हा त्यांना प्रत्यक्ष सर्व गोष्टी समजून सांगितल होत्या. आणि त्यांच्या मनातील प्रश्न आणि शंका त्यावेळी दूर झाल्या होत्या.
दादा वाहिनी
युट्यूब प्रवास : त्यावेळी अनिल दादांच्या मनामध्ये शिकण्याची खूप इच्छा होती. आणि इकडे येऊन प्रत्यक्ष सर्व माहिती घेण हा महत्त्वाचा भाग होता. अनिलदादा अत्यंत मागासलेल्या भागात, ग्रामीण भागात खेड्यात राहणारा व्यक्ती होता आणि आहे. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आणि गरिबीची होती. ते अत्यंत गरीब असल्याने त्यांना पुण्याला यायचं म्हटलं तरी पैसे नसायचे. उसनवारी करून किंवा ह्या वयात सुद्धा आईकडे पैसे मागून घेऊन ते पुण्याला प्रशिक्षणासाठी आणि मला भेटायला आले होते. पहिल्या प्रशिक्षणासाठी त्यांनी उपाशीपोटी आले होते, तर तो प्रवास त्यांनी त्यांच्या खंडाळ्याच्या मित्रा बरोबर केला होता. आज जे काही काम उभं केलं आहे त्याचे श्रेय पण ते त्या मित्राला देत असतात.
पूर्वी त्यांनी गुरुकुल, गोशाळा, घोडेस्वारी शिकवणे, खेळाचे शिक्षक ते अगदी शेतात मोलमजुरी केली आहे. कोणत्याही प्रकारचे काम हे कधी अंतिम नसते आणि यश पण अंतिम नसते. हे सर्व करत असताना त्यांनी Youtube आणि फेसबुकवर काम चालू केल. परंतु ते पण त्यांना जमत नव्हते. सतत अपयश त्यांच्या पदरी पडत होते. पण माझ्या मार्गदर्शनाखाली पुढे सर्व प्रकारची माहिती घेऊन काम सुरू ठेवलं आणि मग हळूहळू कामाला यश मिळत गेलं. त्यामध्ये आमचा एक Youtube चा व्हाटसाप ग्रुप आहे तिथे पण खूप छान माहिती मिळत असते.
हा सोशल मीडिया आहे कधी काय होईल आणि कधी काय बंद होईल याचा काही भरोसा नसतो, म्हणजे सर्व अनिश्चित असते.
दुष्काळी भाग : ७ एप्रिल २०२५ रोजी मी ७, ८ वर्षानंतर जत सांगली परिसरात गेलो, पण त्यासाठी दादांचा अनेकवेळा केलेला आग्रह होता. शिवाय मी कंपनीत काम करत असल्याने सुट्टी हे नेहमीच कारण असायचं. तेव्हा मी तिकडे सर्वत्र पाहिलं तर तो अत्यंत दुष्काळी तालुका आहे. त्यांनी त्या भागामध्ये जमीन सुद्धा खरेदी केलेली आहे. ती खरेदी केवळ युट्युबच्या बळावरती केलेली आहे. आणि त्यांनी घेतलेल ते शेत कसण्यायोग्य नाही. त्या शेताला पुन्हा ठीक ठाक करून पेरणी योग्य कराव लागेल. तसेच पाण्यासाठी विहीर सुद्धा पाडावी लागेल. त्यामुळे तो सुद्धा मोठा खर्च आहे. घरची जमीन कमी आहे, परंतु ती सुद्धा बागायती नाही. त्यामुळे कुटुंबाच अर्थार्जन करणेकामी खूप कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हे सर्व खर्च आणि कुटुंबातील कसरत करताना अजूनही तडजोड करून त्यांना जगावं लागत आहे.
अनिल दादांनी सुरुवातीला बिजनेस माईंड हा चॅनेल चालू केला होता. पण हा विषय बारगळला होता कारण बिजनेस करणारे मोठी लोकं कधीच कोणाला मदत करत नाही किंवा त्यांच्यात एक प्रकारचा न्यूनगंड असतो. त्यामुळे व्यावसायिक लोकांनी दादांना मुलाखत देण्यास नेहमीच टाळाटाळ केली होती. त्यामुळे दादा ह्या कामात मागे पडत होते. मग राजकारण, पेटी वादन, घोडेस्वारी ते पंढरपूर पालखी असे अनेक विषय हाताळले होते. पण ह्यामध्ये पण त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद आणि त्यातून परिणामतः यश पण मिळाले नाही.
मग ह्याच चॅनेलवर बदल करून संचित टिव्ही हा चॅनेल चालू केला होता. आमच्या दोघांचे बोलणे झाल्यावर त्यावर काय टाकावे? तर म्हटलं त्यावर यशस्वी शेतकऱ्यांच्या मुलाखती हा विषय घेऊन काम चालू करा. काम चालू झाले काही प्रमाणात यश मिळात गेलं. अनेक शेतकऱ्यांनी स्वतः बोलवून मुलाखती द्यायला सुरुवात केली होती. शिवाय मानसन्मान, मानधन आणि शेतात पिकलेला भाजीपाला आणि फळे पण भेट म्हणून देऊ लागले आहेत.
रेसिपी चॅनेल : हे सर्व सुरळीत चालू असताना मध्यंतरी कोरोना आला आणि पुढे घरी बसावं लागले त्यामुळे चॅनेलच काम अवघड होत गेलं. मग मी त्यांना रेसिपीजवर काम चालू करण्यासाठी आग्रह केला होता. पण ते करण्यास दादा आणि वहिनी राजी नव्हते. कारण जत हा कर्नाटक आणि महाराष्ट्राचा सीमावर्ती भाग होता. शिवाय कन्नड आणि मराठी अशी भाषेची सरमिसळ होती. त्यांना रेसिपीच्या व्हीडिओसाठी काम न करण्यासाठी मला मराठी बोलता येईल का? हा नूनगंड होता. शिवाय घर ठीक नाही, व्यवस्थित चूल नाही आणि भांडी पण पुरेशी नव्हती, अशी अनेक कारणे होती पण ती खरीच होती. शिवाय भाषेची अडचण पण खुप मोठा विषय होता. पण माझा आग्रह काही थांबत नव्हता म्हणून करायचं म्हणून केलं, केवळ मी म्हणत आहे म्हणून. पुढे दोघांनी रेसिपीच काम चालू केलं आणि पुढे कामात सातत्य ठेवल्याने चांगलं यश मिळत गेलं. वहिनींना सोबत घेऊन दोघांनी खूप कष्ट आणि मेहनत केलेली आहे. आता त्याच फळ त्यांना मिळत आहे. गावाकडची टेस्ट ह्या चॅनेलवर जाऊन सर्वात पाहिला व्हिडिओ पहा म्हणजे भाषा काय असते हे कळेल. लोकांना हेच गावाकडच बोलण आवडल आणि ग्रामीण खाद्य पदार्थ पण आवडले. शिवाय कोरोना होता लोक ऑनलाइन जास्त होती, त्यामुळे त्यांना कामे पण नव्हती. त्यामुळे पण जास्त Views मिळत गेले कारण घरी एकच काम असायचं कर स्वयंपाक आणि खात बसायचं बस. त्यामुळे रेसिपीज काम आणि त्या चॅनेलच खर यश केवळ वहिनींच आहे. कारण त्यांनी केलेलं काम याच मूल्यमापन करणे अवघड आहे. सर्व श्रेय हे पूजा वहिनींना लच जात आहे.
परंतु जेव्हा मी आणि माझी पत्नी त्यांच्या जत येथील घरी गेलो असता, त्यांची दोघांची कुटुंबप्रती आणि मुलांप्रती असणारी तारेवरची कसरत पाहून मी आणि माझी पत्नी खरच अचंबित झालो आहे. आई आणि वडील म्हणून चारही लहान मुलांना सांभाळणे त्यांची सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चालणारी कसरत खूप काही सांगून आणि शिकवून जात आहे.
संचित टीव्ही लोगो
त्यात सर्वात जास्त असंबित करणारी गोष्ट म्हणजे चार लहान मुलांना सांभाळणं हे वहिनींना एक दिव्यच पार पाडाव लागत आहे. मदतीला शेजारचे लोक, नातेवाईक, सासू, दिर, भावजय किंवा नणंद असे कोणी नाही आहे. आहेत ते फक्त अनिल दादा आणि ते पण शूटिंग, एडिटिंग आणि बाहेरची कामे करून उरलेला वेळ ते घरी देत असतात...
सोशल मीडियावर काम करणे म्हणजे रोज कसरत करावी लागते आणि सायबर गुन्हेगारांच्या पासून सावध रहावे लागत असते. सोशल मीडियावर कधी काहीही होऊ शकते. अमेरिकेत नियम आणि कायदे बदलले की इकडे उत्पन्नावर आणि कामावर त्याचा परिणाम होऊ शकतो. शिवाय इथे कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते किंवा शाश्वती नसते. त्यामुळे ह्या आभासी जगतात वावरताना त्याचा उपयोग हा स्थायी व्यावसाय सुरू करून त्याचा विस्तार करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणे काळाची गरज आहे.
मसाले व्यवसाय : काळाची पुढील पावले ओळखून मी त्यांना एक व्यावसाय चालू करा असे सुचवले होते. त्यात काठवड विक्री ते सर्व प्रकारचे मसाले निर्मिती करून विक्री करणे असे सुचवले आणि त्यासाठी मार्गदर्शनही केलं आहे. आता सर्व प्रकारचे मसाले कसे तयार करावे? मग त्याच पण प्रशिक्षण मी त्यांना माझ्या घरी बोलवून माझ्या आईकडून दिले आहे. आणि त्यासाठी माझ्या घरच्या सर्व सदस्यांनी भरपूर मदत केली आणि मार्गदर्शन पण केलं आहे. पुणे गुलटेकडीच्या घाऊक बाजरातून मिरच्या आणि सौदा मसाले आणणे ते सर्व प्रोसेस मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्य यांनी प्रत्यक्ष दाखवली आहे. रेसिपी करणे, घर सांभाळणे, मसाले आणि पापड, कुरडईची ऑर्डर स्वीकारणे त्यांचे व्हाटसाप चाट करणे आणि कॉल घेणे, त्यात १० कॉल आणि १० व्हाटसाप चाट झाले की २, ३ ऑर्डर होतात. ही सर्व कामे पूजा वहिनी स्वतः करतात. त्यामुळे मसाले, पापड आणि कुरडया यांची मागणी वाढत आहे.
कामाचा व्याप वाढता आहे, त्यामुळे गावातील घरी आता दादा आणि वहिनी राहत नाहीत. त्यांचं घर जुन्या पद्धतीचे साधं आहे. कारण मसाले, पापड, आणि इतर पदार्थ उंदीर आणि घुशी कुरतडून टाकु शकतात. हा धोका नको म्हणून आता गावातील घर फक्त रेसिपीसाठी वापरत आहेत. आता हे दोघे जतमध्ये राहायला आले आहेत. कारण सतत पार्सल कुरियर करणे पॅक करणे ही कामे शहरात राहून करावी लागतात. त्यात काही पार्सल परत पण येत असता. त्यामुळे सर्व कामे वेळेत व्हावी हा हेतू शहरात राहण्याचा आहे.
महाराष्ट्र प्राईमवर मुलाखत पत्रकार ज्ञानदेव सिंगटे
शिवाय रेसिपी करायची तर शहरातील सर्व बोजा बिस्तरा आणि साहित्य घेऊन मुलांसह शेतावर असलेल्या घरी जायचं आणि मग शूट करायचं. मुलांचे अडथळे पण असतात अडथळे नाही म्हणता येणार कारण ती मुलं आहेत. ती अल्लड आणि लहान आहेत. आईवडील काय काम करत आहेत त्यांची समज त्यांना नाही. शिवाय आता दादांची आई तात्पुरत्या स्वरूपात बहिणीच्या घरी राहायला गेली आहे आणि त्या आजारी असतात त्यांना आता वयामुळे पण आता मर्यादा आहेत.
बालपण देगा देवा ।
मुंगी साखरेचा रेवा ।।
किती ही कसरत करत आहात?
कधी कधी दादांचा फोन न घेणे, काही चुकलं तर त्यांना रागावणे, हे करा, ते करू नका, असे लाख सल्ले देणं असो की टीका टिपण्णी असो सर्व काही मी तर करतच आलो आणि इतरांशी पण काही बाबी बोलत असे.....कधी कधी त्यांना नाव पण ठेवले होते. जे आहे ते आहे तर मान्यच करावे लागेल, पण दादा मला त्यासाठी माफ करा. पण सांगणे आणि करणे खूप फरक असतो. सल्ले तर कोणी पण देईल पण प्रत्यक्ष कृती करणे अवघड असते पण अशक्य नसते. हा हेतू केवळ तुमचं भल व्हावं हाच होता.
जगण्याची धडपड आणि कुटुंबातील सदस्य यांच्यासाठी घेत असलेलं कष्ट आणि ही जिद्द पाहिली आणि मी तर चकित झालो...
१) काही नकळतपणे होणाऱ्या चुका दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
२) तुमच्या कामच नियोजन करणे आवश्यक आहे.
३) रोजच्या कामात सातत्य ठेवणे गरजेचे आहे.
४) मसाले, पापड, लोणचे आणि कुरडई हे पदार्थ विकत आहेत. यामध्ये आणखी काहीतरी वेगळं उभं करणे गरजेचे आहे.
५) ग्रामीण भाग आहेत आणि त्यामुळे मर्यादा येतात हे मी जाणत आहे.
६) आपल्या भागात काय पिकतं आहे? आणि काय विकत जातं आहे? याची सांगड घातली पाहिजे.
७) आव्हान असे आहे की दुर्गम ग्रामीण भाग आहे शिवाय दुष्काळी परिस्थिती असते. त्यामुळे अशा भागात इतर जिल्ह्यात किंवा राज्यात कोणी वेगळा व्यावसायिक प्रयोग करून यशस्वी झाले आहेत का हे पाहणे.
८) आणखी काही काळ काम करून पुरेस भांडवल उभं करावे.
९) तुम्हाला जे जमत आहे त्यासाठी जवळच्या महामार्गावर, तीर्थक्षेत्र किंवा पर्यटन स्थळ शोधून तिकडे काही काम उभं करता येईल का हे पाहणे.
१०) बोलणं सोपं असते पण प्रत्यक्ष काम करणे अवघड असते हे मी जाणतो...
११) कोणतेही काम अवघड असेल पण अशक्य नसते.
१२) एकच लक्षात घेऊन चला की स्वतःचे गाव आणि नातेवाईक सोडल्याशिवाय प्रगती होत नसते.
अकाली संकट : ह्या अवलियाचे वडील अकाली निधनाने यांना सोडून गेले होते. त्यांच्या तोंडून तो काळ मी ऐकला आहे. त्यांच्या कुटुंबाला हा खूप मोठा आघात होता. आणि ती परिस्थिती पराकोटीची अति भयंकर होती. त्या दिवशी एका गुरुकुलामार्फत लाठीकाठीसाठी एका गावात होते आणि तिकडेच झोपले आणि सकाळी तसेच एका खाजगी कंपनीत कामाला गेले होते. तेंव्हा वडील आजारी आहेत एवढंच कळल होते. हदादांच मन सुन्न झाले होते आहे त्या लाठीकाठीच्या कापड्यानिशी दादा घरी निघाले होते. घरी काय परिस्थिती ओढवली आहे याचं पुसटशी कल्पना दादांना नव्हती. आणि त्या वेळची आर्थिक परिस्थिती आणि लोकांनी फिरवलेली तोंडे दादांच्या लक्षात आहेत. आणि हा नकारात्मक आणि अपमानित लोक अनुभव अचंबित करणारा आहे. कारण गरिबांचा वाली कोणी नसतो…पैसा बोलता हैं।
गोशाळा : आपलं काहितरी चांगलं होईल म्हणून दादांनी ५, ७ वर्षे एका गुरुकुल, गोशाळा आणि एकाच्या घरी साल घालून सेवा करण्यात घालवली आहेत. कुटुंबासाठी अव्यातपणे चाललेली कसरत, संघर्ष आणि कष्ट पाहून खूप वाईट पण वाटते की किती हा संघर्ष आणि किती ही आर्थिक विषमता आहे. संसाधने आणि संधी यांची कमतरता असणे हे संघर्षाला आणि तडजोडीला निमंत्रण देत असते. तर काहीजण यातून संधी शोधत असतात. त्यामुळे स्थानिक राजकीय पटलावर याबाबत वर्षानुवर्षे बोलाचीच कढी आणि बोलचाच भात अशी अवस्था असते. राजकीय पुढारी ही विषमता कधीच भरून काढत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात अजूनही अनेक बाबी अवघड असतात. स्वातंत्र्यापूर्वी ठीक होत पण आता काळ बदलला आहे. त्यामुळे बदल अटळ आहे आणि तो स्वीकारला नाही तर आपण ह्या जगाच्या रहाट गाडग्यातून बाहेर फेकले जाऊ. हे कलियुग आहे, डिजिटल युग आणि ह्या युगात कोणी कोणाचं नसते.
दादाची एका चित्रपटात इन्स्पेक्टरची भूमिका
गुरुजी म्हणजे लाठीकाठीवाले हे आपल्याला नोकरीला लावतील. पोटापाण्याला लावतील आणि मग आपले चांगले दिवस येतील ही भाबडी आशा होती. तिकडे त्यांचं शिक्षण सुद्धा झाले आहे. हे काम करत असताना दादांना देव, देश आणि धर्म कार्याची आवड निर्माण झाली होती. त्यात त्यांनी शिवकालीन शास्त्र आणि शस्त्र विद्या, दांडपट्टा, तलवारलबाजी, घोडेस्वारी आणि लाठीकाठी शिक्षण घेतले होते हीच ती जमेची बाजू. ग्रामीण भाग त्यात पण म्हणावं तसे काम मिळालं नव्हते. त्यांना जे मिळालं ते पण पुरेसे नव्हतं. प्रत्येक व्यक्ती आणि संस्था यांच्या पण मर्यादा असतात. त्यामुळे सर्वांना सामावून घेऊन त्यांना पुरेसे किंवा हवे ते काम उपलब्ध करणे अवघड बाब असते. संबंधितांनी आपल्या परीने जमेल तस आणि उपलब्ध होईल आणि पोटापाण्याचा प्रश्न मिटेल असे काम शोधले आणि काही प्रमाणात ते जमले होते. दादा आणि वाहिनी गुरुकुलातील गुरुजी आणि सहकारी यांच्या बद्दल आपुलकी बाळगून ऋण व्यक्त करत असतात.
पण वाढती महागाई आणि खर्च त्याबरोबर वाढते कुटुंब यामुळे खर्च आणि उत्पन्न यांची सांगड घालणे हे काम दादांना अवघड जात होते. त्यामुळे दादांनी नवनवीन गोष्टी शिकणे आणि नविन कामाच्या शिधात फिरणे हे चालूच ठेवले होते. त्यामुळे त्यांनी आणखी बरेच उपद्व्याप केलं आहेत. उपद्व्याप नाही पण आशेने काम केलं पण ह्या माणसाच्या तोंडून कधीच कोणाबद्दल अपशब्द आणि वाईट चिंतन आले नाही. मी गेल्या ८ वर्षात एकही शिवी ह्या माणसाच्या तोंडून ऐकली नाही. पण अनिल दादांच्या चेहऱ्यावर सतत हास्य असते. कोणत्याही प्रकारची परिस्थिती असू द्या माणूस नेहमी हसतमुख असतो आणि हीच ऊर्जा कायम असते....मग कठीण परिस्थिती असो वा चांगली. दादा हसणार आणि जगणं सुसह्य करणार. शिवाय सतत इतरांना मदत करून जे आपणाशी ठाव ते इतरांशी द्यावं अशी वृत्ती बाळगून आहेत. आपण घडत असताना आपले जुने - नवे मित्र आणि नातेवाईक पण घडावे ही धडपड सतत सुरू असते.
अशीच इतर काही खास धारकरी मंडळी आहेत.
अमोल कोकाटे, जयराम शेळके, अशोक शेळके, ज्ञानदेव शिंगटे, राजदादा वाडेकर, प्रमोद जाधव, वैभव पाटील, स्वरूप कुलकर्णी, विनोद पाटणकर विठ्ठल शेळके,गणेश काकडे आणि सागर निमघरे ही नावे आहेतच पण न लिहिलेली पण आणखी काही मित्र आहेतच. तर यांचा पण पट कधी तरी लिहून उलगडेल.
असो लिहायला खूप आहे....
दरम्यानच्या काळात आकाशवाणीवर दोघांची मुलाखात पण घेतली गेली आहे. तसेच येऊ घातलेला एक कन्नड मराठी चित्रपटात पण दादांना काम करण्याची संधी मिळाली आहे. शिवाय महाराष्ट्रातील एक क्रमांकावर असलेली आदर्श मराठी कॉमेडी सिरिज मध्ये दादांना पाहुणे कलाकार म्हणून काम करायला लाभले आहे.
पण अनिल दादा - पूजा वहिनी ग्रेट - खरंच महान आहात....
संभाजी भिडे गुरुजी, छत्रपती पितापुत्र आणि देवाच्या आशीर्वाद कृपेने तुम्हाला भविष्यात नक्कीच भरभरून यश मिळेल यात शंका नाही.
GREAT
बस.....
इतकंच
दोघांना मनापासून आदरपूर्वक दंडवत ....

आपलाच मित्र
श्री. अर्जुन लहानबा सैद
#गावाकडची_टेस्ट #Gavakadchi_Teast #संचित_टीव्ही_न्यूज #Sanchit _TV_News #अनिल_बंने #Anil_Banne #Pooja_Banne #पूजा_बंने
0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH