Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पुणे शहर रिंगरोडच्या कामास महसूल खात्याकडून पूर्व भागात सुरुवात झाली?

  


पुणे शहर रिंगरोडच्या कामास महसूल खात्याकडून पूर्व भागात सुरुवात झाली?





हायलाईट्स 

बाधित गावांची स्थळ पाहणी,
● १० हजार २०० कोटी कर्ज उभारणी,
● संयुक्त मोजणी झालेली आहे का?
● स्थळ पाहणी करण्यात येणारी गावे,



बाधित गावांची स्थळ पाहणी


पुणे : पुणे जिल्ह्यातील पुणे शहराच्या महत्त्वाचा भाग म्हणजे रिंग रोड हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या रिंग रोड प्रकल्पात बाधित हवेली तालुक्यातील १३ गावांची स्थळ पाहणी महसूल खात्याने सुरू केलेली आहे. यात संपादित होणारे क्षेत्र आणि मालकी हक्क, बाधित क्षेत्रातील घरे, झाडे, विहिरी, बागायती अथवा जिरायती जमीन इत्यादी बाबींची माहिती घेतली जाणार आहे. जेणेकरून भूसंपादन होणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा योग्य मोबदला मिळेल.



समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर पुणे रिंगरोडचे भूसंपादन? हे पण वाचा



महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने १७२ किलोमीटर लांबी आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्त्याचे काम हाती घेतलेले आहे. पूर्व भागात आणि मावळातील ११ खेड तालुक्यातील १२ हवेलीतील १५  पुरंदर मधील ५  आणि भोर तालुक्यातील ३ गावांचा या स्थळ पाहणी कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर पश्चिम भागातील भोर तालुक्यातील ५ गावे हवेली तालुक्यातील ११ गावे, मुळशी तालुक्यातील १५ गावे आणि मावळ तालुक्यातील ६ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.  प्रकल्पासाठी ६९५ हेक्टर जमिनीचे भुसंपादन करावे लागणार आहे. त्यानुसार जमिनीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडलेली आहे.


१० हजार २०० कोटी कर्ज उभारणी

राज्य सरकारने पुरवणी अंदाज पत्रिकेत १५०० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे २२ हजार कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे १० हजार २०० कोटी रुपये रस्ते विकास महामंडळाला कर्ज देण्यास हुडकोने नुकतीच मान्यता दिलेली आहे. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेचा मार्ग मोकळा झालेला आहे. ज्या हवेली तालुक्यातील १३ गावातून हा रस्ता जाणार आहे, त्या गावांची स्थळ पाहणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात सुरुवात झालेली आहे. ५ जानेवारी २०२३2 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. असे हवेली प्रांत आणि त्यांचे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग ही स्थळ पाहणी करणार आहे.


संयुक्त मोजणी झालेली आहे का?


पुणे रिंगरोडसाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचे संयुक्त मोजणी कार्यवाही यापूर्वीच पूर्ण करण्यात आलेले आहे. संयुक्त मोजणी अहवालामध्ये संपादित करण्यात येणारे जमीन आणि सातबारा उतावरील जमीनधारक कोण कोण आहेत? त्यांचे क्षेत्र किती आहे?  हे स्पष्ट करण्यात आलेले नाही ते ह्या पाहणी मध्ये काम करण्यात येणार आहे.




रिंगरोड साठी संपादित होणाऱ्या गावातील जमिनीचे स्थळ पाहणे हे काम सुरू करण्यात आलेले आहे. स्थळ पाहणी संबंधित गावाचे तलाठी, मंडलाधिकारी, मोजणीचे अधिकारी, संपादन मंडळाचे पदाधिकारि यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी एकत्रित करतील. या पाहणीत बाधित क्षेत्र, त्यांचे मालकी हक्क, झाडे, विहिरी, घरे, हातपंप आणि पाणी पाईप लाईन यांची आवश्यक सर्व माहिती घेण्यात येईल.स्थळ पाहण्याच्या दिवशी जमिनीच्या मालकाला हजर राहण्याच्या नोटीसा देण्यात आलेल्या आहेत.

- संजय अस्वले, प्रांत हवेली





स्थळ पाहणी करण्यात येणारी गावे 


करण्यात येणारे गावे वर्गामुळे पुढील प्रमाणे गावडेवाडी, तुळापूर, पेरणे, लोणीकंद, बकोरी, डोंगरगाव, शिंदवणे, भावडी, भिवरी, तरडे आणि वळती ह्या गावांची स्थळ पाहणी करण्यात येणार आहेत.



पुणे शिरूर १८ पदरी महामार्गासाठी भूसंपादन झाले तर अशी मिळू शकते नुकसान भरपाई | येथे क्लिक करून वाचा




सर्व फोटो प्रतीकात्मक आहे






Post a Comment

0 Comments

close