Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ए बाळा । ए तू नीट बोल रे । तू औकातीत रहा । खासदार ओमकार राजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात शाब्दिक चकमक

 


जिथे मी चुकत नाही तिथे मी झुकत नाही - ओमकार राजे निंबाळकर




धाराशिव : खासदार श्री. ओमकार राजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात जिल्हाधिकारी यांच्या समक्ष शेतकरी पीक विमा योजना बाबत खडाजंगी झाली याचा व्हायरल व्हीडिओ आपण सर्वांनी सोशल मीडियावर पहिला आहे.


खासदार ओमकार राजे निंबाळकर यांनी आपली भूमिका fb च्या माध्यमातून मांडली आहे. नक्की काय भूमिका मांडली आहे, आज ती आपण पाहू या.


Fb पोस्टच्या माध्यमातून : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा बाबतीत न्याय भेटावा म्हणून मी व माझे सहकारी आमदार कैलास पाटील लढा देत आहोत, यामागे एकच हेतू की भरडलेल्या शेतकरी बांधवांना न्याय मिळावा. याबाबतीत समोरील आमदार ह्यांना करायचे काही नाही पण श्रेय घ्यायचे आहे. त्यांनी कितीही आटापिटा केला तरी जनता दूधखुळी नाही व ती सगळे पाहत आहे.

आज कलेक्टर कचेरीत याबाबतीत संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असताना त्या आमदाराने त्याच्या नेहमीच्या पद्धतीने विषयाला फाटा द्यावा म्हणून वैयक्तिक मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. "सोन्याचा चमचा" घेऊन व आजूबाजू चमचे मंडळी ठेऊन त्यांना सर्वांवर रुबाब करायची सवय आहे परंतु त्यांचा सामना आज या "पवनराजे" साहेबांच्या मुलाशी झाला आणि आगीशी का खेळू नये हे आता त्याला नक्कीच कळले असेल. 

यांनी संस्कार बद्दल बोलावे म्हणजे पाकिस्तान ने दहशवाद्यांविरोधात बोलावे असे आहे.

लोकशाहीत जनता हीच खरी राजा असते, आता लोकांच्या जहागिरी व जहागीरदारी दोन्ही संपल्या आहेत. तुम्ही दहशतीने आम्हाला दाबाल व आम्ही दबू असा गैरसमज आज मिटला असेल. 

राजकारणात लोकांच्या साठी राजकारण करताना मी कायमच वैयक्तिक हेवेदावे टाळत असतो, आम्ही शांत असतो पण षंढ नसतो. आज समोरच्याला कळेल या भाषेत समजाविले इथून पुढेही गरज पडेल तेव्हा लोकांसाठी कोणालाही कधीही भिडायला आम्ही तयार आहोत, फक्त यांची समोरासमोर करायची नव्हे तर गुपचूप पाठीमागे करायची सवय आहे हे ही मी आणि राज्यातील जनता जाणून आहे.

जिथे_माझे_चुकत_नाही_तिथे_आपण_झुकत_नाही_हे_नक्की.


खासदार ओमकार राजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या दोघांत झालेल्या वादात अशा प्रकारे निंबाळकर यांनी आपली वरील भूमिका मांडली आहे.



आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पण आपली भूमिका fb च्या माध्यमातून मांडली आहे. नक्की काय भूमिका मांडली आहे, आज ती आपण पाहू या


त्यांनी fb पोस्ट मध्ये लिहिले आहे की खरीप २०२२ पीकविमा संदर्भाने कंपनीला नुकसान भरपाई बाबत झालेल्या चुका दाखवून दिल्या आणि त्यांनी त्या मान्य केल्या आहेत. 

खरीप पिकवीमा वेगवान पद्धतीने नोव्हेंबर महिन्यात उपलब्ध करून दिला, हे खरे असले तरी या प्रक्रियेत झालेल्या चुका आठवडाभरात दुरुस्त करण्यासंदर्भात कंपनीने वेळ मागून घेतला आहे.

प्रत्येकाला त्याच्या हक्काची विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

शेतकरी बांधवांचा विषय संवेदनशील आहे. आपल्याला केवळ सकारात्मक बाबींकडे लक्ष केंद्रित करून काम पूर्ण करायचे आहे. आरोप आणि राजकारण यावर १ मिनिट देखील व्यर्थ जाऊ नये यासाठी सर्वांनी आग्रही असायला हवे.

अशा प्रकारे दोघांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली बाजू लिहून मांडली आहे. आणि एक live व्हीडिओ पण प्रसारित करून भूमिका मांडली आहे. ती आपण पाहू या.


आमदार राणा जगजितसिंह पाटील


खासदार आणि आमदार यांची जिल्हाधिकारी यांच्या समोर खडाजंगी झाली आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता हे राजकारण कोणत्या टप्प्यावर जाईल हे पाहणे उत्सुकता निर्माण करत आहे.

दोघांच्या राजकीय भांडणात शेतकऱ्यांना दिलासा मिलतो आहे की न्याय हे पाहणे महत्वाचे आहे.








Post a Comment

0 Comments

close