छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या ठिकाणी शेवटचा श्वास घेतला आणि आपले सर्वोच्च बलिदान दिले : शौर्यपिठ तुळापूर
शौर्यपीठ श्री. क्षेत्र तुळपुर
शौर्यपीठ श्री. क्षेत्र तुळपुर
याच त्रिवेणी संगमावर श्री. संगमेश्वरचे सुरेख असे प्राचिन शिवमंदिर आहे. इसवी सण १६३३ मध्ये आदिलशाही दरबारात वजिर श्री मुरारपंत जगदेव यांनी श्री. स्वामी रूद्रनाथ महाराज यांच्या आज्ञेवरून मंदिराची डागडुजी करण्यात आली. मंदिरात शिवलिंग सोबत अखंड पाषाणातील गणपतीची मूर्ती तसेच विठ्ठल रूक्मिणी मुर्ती आहे. तर मंदिरासमोर नंदी मंडप आहे. मंदिराच्या प्रांगणात भली मोठी दगडी दीपमाळ आहे. श्री वीर गणपती, श्री भक्त हनुमान यांची हि छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या सभोवताली तटबंदी बांधलेली आहे. उजव्या बाजूने त्रिवेणी संगम घाटावर जाण्यासाठी दरवाजा आहे. तर डावीकडे श्री रूद्रनाथ महाराजांची संजिवनी समाधी आणि श्री राम मंदिर आहे. या मंदिराच्या पाठीमागील बाजूस श्री विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिर आहे. त्याच्याच बाजूला ओम कोटेश्वराय मंदिर आहे. तसेच त्या ठिकाणी आणखी दोन मंदिरे आहेत. असे प्राचिन स्वयंभू पाच महादेवाची मंदिरे असलेला हा त्रिवेणी संगम असून हे क्षेत्र काशी, गया प्रयाग या तिर्थ क्षेत्राच्या बरोबरीचे हे ठिकाण आहे.
हिंदवी स्वराज्याचे संकल्पक श्री शहाजी राजे भोसले आणि आदिलशाही दरबारातील वजिर मुरारपंत जगदेव यांनी ठिकाणी हत्तीला तराफ्यात उतरवून त्याच्या वजना इतके सोने दान केले अशी एक गोष्ट सांगण्यात येते. म्हणजे याठिकाणी सोन्याची तुळा केली होती. यावरूनच गावाला तुळापूर नाव पडले आहे. या गावचे पूर्वीचे नाव 'नांगरवास' असे होते. संगमेश्वर मंदिराचे जिर्णोध्दार झाल्यावर राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी बाल शिवराय सोबत होते. रायरेश्वराच्या अगोदर बाल शिवरायांनी संगमेश्वरच्या साक्षीने या ठिकाणी वडील शहाजीराजे आणि जिजाऊं आई साहेबांना हिंदवी स्वराज्य स्थापनेचे वचन दिले होते.
श्री. संगमेश्वरचे प्राचिन शिवमंदिर
शहाजी राजे, जिजाऊ आईसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र ठिकाणी या नंतरच्या घटनानी हिंदवी स्वराज्यला एक वेगळेच वळण मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापरिनिर्वाणानंतर संभाजीराजे हिंदवी स्वराज्याच्या गादीवर बसले. छत्रपती संभाजी राजांचा वाढता पराक्रम औरंगजेबाला घाबरून सोडणारा होता. पूर्ण ताकदीनिशी औरंगजेब सुमारे सात लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला. छत्रपती संभाजी राजांकडे सैन्य होते केवळ तीस ते पस्तीस हजार. १६८९ मध्ये राजे विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना संमगमेश्वर येथे मुक्कामी थांबले होते. १ फेब्रुवारी १६८९ ला आपला सख्खा मेहुणा गणोजी शिर्केयाच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी मुकर्रबखान या मोगली सरदाराने संभाजीराजांना आणि कवी कलश यांना ताब्यात घेतले. तेथून धिंड काढत अतिशय क्रूरपणे १५ फेब्रुवारी १६८९ या दिवशी पेडगावच्या किल्यात औरंगजेबासमोर राजांना आणण्यात आले. धर्म बदलण्याची अट लाथाडून नरक यातना आणि हालअपेष्टा सहन करत धर्मनिष्ठ राजांनी मरण पत्करले.
१२ मार्च १६८९ या दिवशी गुढीपाडवा होता. गुढीपाडवा हा हिंदुचा मोठा सण असतो. या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी ११ मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांना तुळापूर येथे आणण्यात आले. त्यांच्या देहाचे हाल करून अत्यंत कुर्रपणे हत्या करण्यात आली. मृत्युसमयी छत्रपती संभाजी राजांचे वय अवघे ३२ वर्षे होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाने, शौर्याने ही भूमि पावन झालेली आहे. त्रिवेणी संगमावर महारांच्या शरीराचे तुकडे करून फेकून दिले होते. तुळापुर येथून ६ किलोमीटर अंतरावर वढू बुद्रुक येथील शिवले- देशमुख ग्रामस्थांनी यात पुढाकार घेऊन जीव धोक्यात घालून, भीमानदी रात्रीत ओलांडून व मुगली सैन्याला चकवून त्यांनी संभाजी महाराजांची आणि कवी कलशांची मिळतील ते शरिराचे भाग गोळा केले आणि त्या सर्व अवयवांना परत एकत्र करून पूर्ण शरीर शिवून घेतले आणि त्यांचे विधिवत अंतिमसंस्कार केले.
शौर्यपीठ श्री. क्षेत्र तुळपुर
वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांची आणि मैत्रीत शेवटच्या क्षणापर्यंत एकनिष्ठ राहिलेल्या छंदोगामात्य कवी कलश यांची समाधी आहे. तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या हातून सुटायला अगदी सोपे होते. परंतु संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या अटी मान्य न करता मरण स्वीकारले. तेव्हा जर राजांनी इस्लाम धर्म स्वीकारला असता तर आज आपली सुद्धा सुन्ता झाली असती.
छत्रपती संभाजीराजे समाधी स्थळ श्री. क्षेत्र वढू बुद्रुक
मृत्युस हि न डरले मनीं धर्मवीर|फुटले स्वनेत्र तुटले जरी जीभ शिर ||दुरदान्द दाहक ज्वलंत समाज व्हावा |म्हणुनी उरांत धरुं या शिवसिंहछावा ||गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी
कवि कलश समाधी स्थळ श्री. क्षेत्र वढू बुद्रुक
अशा या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणात प्रत्येक हिंदूने बलिदान मास पाळले पाहिजे. आपल्या राजाने स्वराज्यासाठी, रयतेसाठी,धर्मासाठी बलिदान दिलंय. तब्बल ४० दिवस संभाजीराजा औरंगजेबाच्या छावणीत मृत्यूशी झुंज देत राहिला. डोळ्यांमध्ये तापलेल्या सळ्या घालून त्यांचे डोळे फोडले, अंगावरची कातडी सोलून काढली, हाताची पायाची बोट औरंगजेब रोज तोडत राहिला. काय वेदना झाल्या असतील. किती जीव तळमळला असेल, कसे सहन केल असेल. धर्मासाठी,रयतेसाठी, स्वराज्यासाठी, आपला राजा या असाह्य वेदना सहन करत राहिला. अन अखेर गुडीपाडव्याच्या आदल्या दिवशी त्यानां वीरमरण आलं. त्यांच हे बलिदान आम्हा सगळ्यांना प्रेरणा देत ,अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देत, संकटांविरुद्ध लढण्याची उर्मी देत आहे.
त्यांना एक श्रद्धांजली म्हणून प्रत्येक हिंदूने एक महिना उपवास पाळावा त्यांचा सजेचा या काळात गोड आणि मांसाहार खावयाचे नाही. आपल्या घरातलाच व्यक्ती गेल्याच दुःख पाळत काही जण मुंडन करतात. तर काही जण चप्पल न घालता अनवाणी चालतात.अशा प्रकारे बलिदान मास पाळता येत आहे.
शौर्यपीठ श्री. क्षेत्र तुळपुर
शौर्यपीठ श्री. क्षेत्र तुळपुर
शौर्यपीठ श्री. क्षेत्र तुळपुर
शौर्यपीठ श्री. क्षेत्र तुळपुर
0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH