Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठा तरुणांना मिळणार बिनव्याजी कर्ज १० लाख ते ५० लाखापर्यंत




 मराठा तरुणांना मिळणार बिनव्याजी कर्ज १० लाख ते ५० लाखापर्यंत 




Maratha youth will get interest free loan from 10 lakhs to 50 lakhs


राज्यातील मराठा तरुणांसाठी व्यवसाय प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक २७ नोव्हेंबर १९९८ रोजी केलेली आहे. ह्या महामंडळाच्या मार्फत मराठी सुशिक्षित बेरोजगार युवक आणि युवतींना बिन व्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याच बरोबर कौशल्य विकास उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. याबाबतीत महामंडळाच्या वेबसाईटवर सविस्तर माहिती दिली आहे.


उद्धिष्ट -


मराठा समाजातील तरुणांनी नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि त्याकरिता त्यांना विनासायास अर्थसाह्य मिळावे या करिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे १० हजार रुपयांपासून ते १ लाख रुपये पर्यंत कर्ज देण्याची योजना जाहीर झालेली आहे. व्यवसायासाठी इच्छुक मराठा तरुणांना या योजनेचा मोठा लाभ मिळू शकतो. सरकारच्या या कर्ज योजनेमुळे मराठा तरुणांचे उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलेले आहे. या योजनेमुळे अनेक मराठा तरुणांना मदत मिळणार असून व्यवसाय सुद्धा सुरू करता येणार आहे.


चला तर पाहूया कर्ज कसे मिळणार आहे?


आधी १० ,००० रुपये ते ५०,००० रुपये आणि पुढच्या टप्प्यानंतर १ लाख रुपये -

या योजनेचे लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मराठी तरुणांना सर्वप्रथम १० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. कर्जापोटी देण्यात येणाऱ्या रकमेचा वापर त्यांनी कसा केला आहे. हे तपासतानाच त्या कर्जाची परतफेड नियमित केली असेल तर पुढच्या टप्प्यात त्यांना ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम कर्जापोटी मिळेल. पुढे या ५० हजार रुपयांच्या कर्जाची देखील नियमित कर्जफेड केली तर त्या पुढील टप्प्यात याच तरुणांना १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम कर्जापोटी मिळणार आहे.



कमी कालावधीचे प्रशिक्षण | जास्त कालावधीचे प्रशिक्षण | रोजगार विनिमय | स्टार्ट-अप आणि नाविन्यता | अधिक महितसाठी येथे क्लिक करा.




आता पाहूया कर्जाची परतफेड कशी करायची?


१) जेव्हा तरुणांना सर्वप्रथम दहा हजार रुपयांचे कर्ज मिळेल तेव्हापासून या कर्जाची परतफेड प्रती दिवस १० रुपये याप्रमाणे करावी लागेल.


२) कर्ज रक्कम ५० हजार रुपये इतकी होईल, त्यावेळी या तरुणांना कर्जाची परतफेड प्रति दिवस ५० रुपये याप्रमाणे करावी लागेल.


३) ५० हजार रुपयांवरून जेव्हा कर्जाची मर्यादा ही १ लाख रुपये इतकी वाढेल त्यावेळी कर्जाची परतफेड करताना या तरुणांना प्रति दिवस १०० रुपये याप्रमाणे परतफेड करावी लागेल. 


४) कर्ज घेण्यासाठी वयोमर्यादा ६० वर्षे करण्यात आलेले आहे.



आमच्या टीमने पुणे येथील लघुउद्योजक श्री. विनायक एकनाथ यादव श्री. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस सणसवाडी, पुणे यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी ते म्हणाले की,


"अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत बिनव्याजी कर्ज उपलब्ध होत आहे. त्यासाठी कोणत्याही मध्यस्थी व्यक्तीची आवश्यकता नाही. तसेच व्यवसायासाठी वैयक्तिक बिनव्याजी कर्ज ५ लाख रुपये ते १० लाख रुपये तसेच गट कर्ज हे १५ लाख रुपये ते ५० लाख रुपये मिळत आहे. या योजनेबाबत मी समाधानी आहे."


लाभार्थी - श्री. विनायक यादव : सिद्धिविनायक एंटरप्राइजेस



अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात


१) आधार कार्ड,

२) रहिवासी पुरावा,

३) उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि

४)  जातीचे प्रमाणपत्र.






अर्ज कोठे करावयाचा आहे?


या कर्जाचा लाभ घेण्यासाठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.


आमच्या टीमने पिंपरी चिंचवड येथील जगदंबा स्वीटचे श्री. सचिन थोरात यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,



"आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मराठी तरुणांना बिनव्याजी कर्ज मंजुर करण्यासाठी बँका टाळाटाळ करत आहेत. आणि त्याचे कारण महामंडळाडून कर्जाचे व्याज बँकांना वेळेवर मिळत नाही. त्यामुळे मराठी तरुण हा योजना चांगली असूनही दुर्लक्ष करत आहेत."



जगदंब स्वीट्स पिंपरी चिंचवड



या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे?


●  ही योजना मराठा समाजातील तरुणांसाठी आहे.

● या योजनेकरिता १० हजार रुपयांपासून ते १ लाख पासून ५० लाख रुपयांपर्यंतची रक्कम मराठा तरुणांना व्यवसायासाठी कर्जापोटी मिळेल.

●  विशेष म्हणजे या योजने करिता देण्यात येणाऱ्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.

● हे संपूर्ण कर्ज बिनव्याजी असणार आहे.

● ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन अर्ज कराल आणि तो मंजूर झाल्यानंतर तुम्हाला त्याचे पत्र मिळेल त्यानंतर ते पत्र तुम्ही स्थानिक सहकारी किंवा सरकारी बँकेत दाखवल्यानंतर त्या ठिकाणाहून तुम्हाला कर्ज वितरित करण्यात येईल. 

● सरकारी अध्यादेशात नमूद कार्यपद्धती नुसार बँक कार्यवाही करेल.

● तुम्हाला बँकेने कर्ज नाकारले तर त्याचे कारण तुम्हाला बँक लेखी कळवेल.

● अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्याकडे अर्ज करण्यासाठी किंवा कार्यवाही करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थी व्यक्तीची आवश्यकता नाही.

● सदर अर्ज महामंडळाने मंजुरी मिळाल्यानंतर बँकेकडे स्वतंत्र कर्ज प्रकरण करावे लागत आहे.

● बँक आणि महामंडळातील कर्ज प्रकरणाची कार्यवाही करण्यासाठी मध्यस्थी व्यक्तीची आवश्यकता नाही.

● कर्ज मंजूर झाल्यानंतर आपण बँकेत कर्जाचा हप्ता सव्याज भरायचा आहे. त्याची पावती आणि व्यवसायाचा फोटो महामंडळाच्या वेबसाईटवर दरमहा Upload करावा लागेल. त्यानंतर महामंडळ पडताळणी करून व्याज कर्ज खात्यात जमा करते आहे.




अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा



संपर्क : -

ण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित.

जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड, बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग,                                    जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे,                                                  सी.एस.टी स्टेशन जवळ.मुंबई-४००००१.


नागरी सुविधा केंद्र : -

टोल फ्री नंबर : १८००-२२-८०४० .

- ०२२ - २२६५७६६२.

ई मेल - apamhelp@gmail.com








Post a Comment

0 Comments

close