महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोले ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम - रब्बी हंगामा २०२२ -२३ जाहीर
कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार तथा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोले ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम रब्बी हंगामा २०२२ - २३ जाहीर करण्यात आला आहे.
शासनातर्फे गहू आणि हरभरा बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
हरभरा या पिकाचे विशाल विजय व जॅकी हे वाण उपलब्ध करण्यात आले आहे. ह्या उपक्रमात हरभरा वाण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जात आहे. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
आमच्या प्रतिनिधीने शिरूर तालुका कृषी अधिकारी नवज्योत आगे कृषी विभाग, शिरूर, पुणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पुढील माहिती दिली आहे.
शिरूर तालुका जिल्हा पुणे येथील मार्केट यार्ड शिरूर येथे अनुदानित स्वरूपात महाबीजचे अधिकृत डीलर मे. भटेवरा यांच्याकडे हरभरा बीज उपलब्ध करण्यात आले आहे. सदर अनुदानित बीजसाठी शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम खालील प्रमाणे आहे.
१) २० किलो पिशवी - १०२० ₹,
२) ३० किलो पिशवी - १५०० ₹.
ह्या अनुदानित बीज पिशव्या कोणाला आणि कशा मिळणार ते पाहू -
शासनातर्फे गहू आणि हरभरा बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सदर अनुदानित बॅग घेण्यासाठी कृषी विभागाकडून सही व शिक्का असलेला परवाना तसेच सातबारा व आधार कार्ड घेऊन जाने आवश्यक आहे.
ज्या शेतकऱ्यांना अनुदानित हरभरा बियाणे घ्यायचे आहे अशांनी कृपया संपर्क साधावा
श्री. नवज्योत आगे
कृषी विभाग, शिरूर तालुका,
पुणे
मो. नंबर - 9404316993.
कृपया संपर्क फक्त शिरूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी करावा...इतर शेतकरी यांनी त्यांच्या तालुक्यातील कृषी अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयात संपर्क करावा.
संपर्क :




0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH