Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तुमची जमीन पुणे छ्त्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) एक्सप्रेसवे मध्ये जात असेल तर ही माहिती वाचा




तुमची जमीन पुणे  छ्त्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) एक्सप्रेसवे मध्ये जात असेल तर ही माहिती वाचा 






पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमी सतत चर्चेत असतात. त्या चर्चे मागचं कारण म्हणजे नितीन गडकरी हे वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गाच्या घोषणा करून त्याचे उद्घाटन करतात. आणि नवनवीन महामार्गाच्या उद्घाटनानंतर लवकरच ते काम चालू करतात. पुणे ते संभाजीनगर एक्सप्रेसवे या महामार्गाची त्यांनी नुकतीच घोषणा केलेली आहे.


शेतजमीन भूसंपादन माहितीसाठी whatsaap Grup ला Join व्हा- त्यासाठी येथे क्लिक करा


एक्सप्रेस वे मध्ये पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा आणि संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन आणि जमीन जात आहे. तर संभाव्य संपादनाबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत.  एक्सप्रेसवे मध्ये आपली जमीन गेल्यानंतर आपण नक्की काय करावे?  आपली किती जमीन एक्सप्रेस वे मध्ये जाईल? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहेत. तर आज आपण या संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.




१) शासनातर्फे भूसंपादन अधिकार्‍याची नियुक्ती केली जाते.

२) संबंधित भूसंपादन अधिकारी भूसंपादनाची नोटीस प्रत्येक शेतकऱ्याला पाठवतो.

३) भूसंपादन नोटीस ही प्रत्येक शेतकऱ्याने स्वीकारली पाहिजे व त्या संदर्भात काही जर आक्षेप आणि

    हरकती असतील तर त्या पुराव्यासह रीतसर लेखी नोंदवल्या गेल्या पाहिजेत.

४) शेजामीन, शेतातील बांध, विहिरी, फळझाडे, घरे, पाईपलाईन, हेतघर, कांदाचाळ आणि     

   कूपनलिका इत्यादी बाबी भूसंपादन करताना किंवा भूसंपादन करण्यापूर्वी जी संयुक्त मोजणी केली

   जाते. त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना कशात दाखवल्या आहेत किंवा नाही याची खात्री शेतकऱ्यांनी केली  

   पाहिजे.

५) भूसंपादन कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदीनुसार कलम ६ ची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर कलम 

     ४ च्या आधी सूचनेनंतर १ वर्षाच्या आत ती प्रसिद्ध करावी लागते. 



 सड़क परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय यांच्या वेबसाईटवर भेट देऊन अधिक माहिती घ्या त्यासाठी येथे क्लिक करा.



६) जमिनीचा निवाडा देखील कलम ६ च्या अधिसूचनेनुसार २ वर्षाच्या आत मध्ये पूर्ण करावा लागतो. 

    आणि तो जर पूर्ण न केल्यास संपूर्ण प्रकरण हे अपगत होऊन नव्याने पुन्हा कार्यवाही सुरू करावी 

     लागते.

७) शेतजमीन आणि जमीन मालकास नुकसान भरपाई रक्कम कमी वाटत असेल आणि ती जर मान्य 

    नसेल तर कलम १८ नुसार संबंधित शेतजमीन आणि जमीन मालकाने लेखी अर्ज देऊन आपल्याला 

   सदरील नुकसान भरपाई मान्य नाही. आपला अर्ज योग्य ती नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी 

    न्यायालयाकडे पाठवावा असे लेखी अर्जद्वारे भूसंपादन अधिकारी यांना विनंती करू शकतो.

८) कोणत्याही निवाडा प्रकरणाचा निवाडा झाल्यानंतर निवाडा झाल्याच्या दिवसापासून ४५ दिवसाच्या 

    आत असा  हरकत किंवा अमान्य असलेला अर्ज दाखल केला पाहिजे.

९) अशा वेळी नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती तुम्ही स्वीकारू शकत आहे. अधिकची नुकसान 

     भरपाई  मिळवण्यासाठी सदर प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर नुकसान भरपाई जी रक्कम 

     मिळाली आहे, त्यापेक्षा अधिक नुकसान भरपाई न्यायालयातुन मिळू शकते.


महामार्ग आणि रिंगरोडच्या भूसंपदानाबाबत अशी घ्या तीव्र हरकत त्यासाठी येथे क्लिक करा.



शेतजमीन भूसंपादन माहितीसाठी whatsaap Grup ला Join व्हा- त्यासाठी येथे क्लिक करा




Post a Comment

0 Comments

close