Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

EWS (ई डब्ल्यू एस) आरक्षणाचा फायदा कोणाला मिळणार आहे ?प्रमाणपत्र कसे मिळवाल जाणून घ्या सविस्तर माहिती




EWS (ई डब्ल्यू एस) आरक्षणाचा फायदा कोणाला मिळणार आहे ?प्रमाणपत्र कसे मिळवाल जाणून घ्या सविस्तर माहिती







आर्थिक दुर्बल घटकांना नोकरी आणि महाविद्यालयातील शिक्षणासाठी देण्यात आलेल्या १० % आरक्षणाच्या वैद्यतेवर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिलेला आहे. १०३ व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेली ही आरक्षणाची तरतूद वैध असल्याचा निकाल नुकता सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. सरन्यायाधीश माननीय उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील घटनापिठाने हा निकाल जाहीर केलेला आहे. या घटना पिठामध्ये पाच न्यायमूर्तींचा सहभाग होता. केंद्र सरकारने १०३ वी घटनादुरुस्ती करून सवर्ण प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकांना ही आरक्षणाची तरतूद तयार केली होती. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे देशभरात आर्थिक आरक्षण लागू करण्याचा महत्त्वाचा मार्ग मोकळा झालेला आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना समाजात सन्मानाने जगता यावे आणि त्यांना शिक्षण आणि नोकरीची संधी समान प्राप्त व्हावी यासाठी या घटकाला १०% आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने या आरक्षणाची मुहूर्तमेढ लावुन तरतूद केली होती. २०१९ मध्ये मोदी सरकारने हे विधेयक मंजूर केलेले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. केंद्र सरकारच्या या आर्थिक आरक्षणाविरोधात एकूण ४० याचिका दाखल केला गेल्या होत्या.



पंतप्रधान घरकुल यादीत तुमच्या गावातील कोणाचं नाव आले आहे येथे क्लिक करून पहा



ई डब्ल्यू एस (EWS) म्हणजे इकॉनोमी विकर सेक्शन ( Economically Weaker Sections) अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाखांपेक्षा जास्त नसेल म्हणजेच ८ लाखापेक्षा कमी असेल अशा व्यक्तींना EWS अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू शकत आहे. हे आरक्षण एससी, एसटी, एनटी यांच्यासाठी नसेल थोडक्यात ओपन कॅटेगिरीसाठी आहे.


ई डब्लू एस चा फायदा कोणाला होणार ?


१) खुल्या प्रवर्गातील कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.

२) एससी, एसटी, ओबीसी आरक्षणातील लोकांना या आरक्षणाचा फायदा

मिळणार नाही.

३) कुटुंबाचे उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना नोकरीत व

शिक्षणात आरक्षण मिळू शकेल.

४) आरक्षणासाठी पात्र व्यक्तीच्या कुटुंबाची शेती ५ एकर पेक्षा अधिक

नसावी.

५)  एक हजार चौरस फूट किंवा त्यापेक्षा जास्त मोठा रहिवासी घराचे क्षेत्र

नसावे.

६) महापालिका क्षेत्रातील कुटुंबाचे रहिवासी घराचे क्षेत्र ९०० चौरस फुटा

कसे जास्त नसावे.

७) गैर नगरपालिका किंवा ग्रामीण भागातील कुटुंबासाठी १८०० चौरस फूट

जागेची अट आहे.




EWS  प्रमाणपत्र कसे काढाल?


EWS प्रमाणपत्र अर्थ दाखला मिळण्यापूर्वी तुम्हाला ई डब्ल्यू एस चा अर्ज डाऊनलोड करावा लागेल. आणि तो अर्ज भरल्यानंतर त्या अर्जामध्ये विचारलेल्या कागदपत्रांसह तो अर्ज तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागेल. तिथून संपूर्ण पडताळणी केल्यानंतर तुम्हाला ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र अर्थात ई डब्ल्यू एच चा दाखला मिळेल.


कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?


१) लाभार्थी व त्यांच्या वडिलांचे आधार कार्ड.

२)  लाभार्थी व त्यांच्या वडिलांचे टीसी उतारा.

३) राशन कार्ड.

४) रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा पुरावा.

५) ७/१२ उतारा, ८- अ उतारा, किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य १३

ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याआधीचे महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या

बाबतचा पुरावा.

६)  स्वयं घोषणापत्र.

७) विहित नमुन्यातील अर्ज.

८) आणि तीन पासपोर्ट साईज फोटो इत्यादी.


ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र किती वर्षासाठी वैध असेल ?


EWS  (ई डब्ल्यू एस)  प्रमाणपत्राची वैधता ही फक्त एक वर्षाची असेल.


अशाप्रकारे आर्थिक मागास आणि दुर्बल घटकांना ईडब्ल्यूएस अंतर्गत केंद्र सरकारने जाहीर केलेले आरक्षण जे शैक्षणिक क्षेत्रात आणि नोकरीसाठी लागू असेल. त्याला नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता ओपन कॅटेगिरी (सर्वसाधारण प्रवर्ग) मधील नागरिकांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.







Post a Comment

0 Comments

close