Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दवाखाना खर्च मोफत आयुष्यमान भारत योजनाचा फायदा कसा घेता येईल जाणून घ्या सविस्तर माहिती



आयुष्यमान भारत योजनाचा फायदा कसा घेता येईल जाणून घ्या योजनेविषयी सविस्तर माहिती 




Free Hospital Expenses: How to Benefit from Ayushman Bharat Yojana?  Know more details about the scheme -


पुणे : आयुष्यमान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेलेली आहे. ह्या योजनेत केंद्र सरकार गरीब कुटुंब व शहरातील गरीब लोकांच्या कुटुंबांना आरोग्य विमा उपलब्ध करते आहे.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ( PMJAY ) अंतर्गत आयुष्यमान भारत योजना देशभरात चालवली जात आहे. भारत सरकारच्या या योजनेअंतर्गत देशातील एकूण दहा कोटी होऊन अधिक कुटुंबाला मिळत आहे. यासाठी तुम्हाला आयुष्यमान भारत चे कार्ड बनवावे लागेल. त्यासाठी की काही आवश्यक पात्रता निर्धारित करण्यात आलेली आहे. पात्र लोकांना एक कार्ड बनवून भेटू शकत आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळू शकत आहे.


केंद्रातील मोदी सरकारचा प्रयत्न आहे की महिला लहान मुले व वरिष्ठांना या योजनेत प्राधान्याने सामील करून घेतले जाईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचा आधार व वयाचे कोणतेही बंधन नाही.


आपले आणि कुटुंबातील सदस्यांचे आयुष्यमान कार्ड येथे क्लिक करून Dowenload करा.


● उपचार कोठे व कोणत्या हॉस्पिटलमध्ये होतील?

सर्व सरकारी रुग्णालय व पॅनल मध्ये सामील रुग्णालयांमध्ये आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांवर कॅशलेस पेपरलेस उपचार केले जातील.


● ग्रामीण भागात आयुष्यान भारत योजनेसाठी पात्रता - आयुष्यमान भारत योजनेमध्ये सामील होण्यासाठी खालील पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे -

१) ग्रामीण भागात पक्के घर नसलेले, कुटुंबात वयस्कर नसणे, कुटुंबप्रमुख महिला असणे, कुटुंबात कोणी दिव्यांग असणे, अनुसूचित जाती जमातीमधील व्यक्ती, भूमिहीन व्यक्ती, वेठबिगार मजूर यांना या योजनेसाठी पात्र समजले जाईल.


२) ग्रामीण भागातील बेघर व्यक्ती, निराधार व्यक्ती, भिक मागणारे, आदिवासी लोक कोणत्याही प्रक्रिया न करता ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत आहेत.


● शहरी भागात योजनेची पात्रता  -


भिकारी असणारे, घरकाम करणारे, छोटे दुकानदार, शिवणकाम करणारे, फेरीवाले, रस्त्यावर काम करणारे आणि अन्य व्यक्ती तसेच कंट्रक्शन वर काम करणारे, मजूर, प्लंबर, मिस्त्री, पेंटर, वेल्डर, सुरक्षा रक्षक, हमाल व समान वाहून नेणारे अन्य कामगार, सफाई कर्मचारी, हॅंडीकॅपचे काम करणारे, टेलर, ड्रायव्हर, रिक्षा चालक, दुकानात काम करणारे इत्यादी लोक आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत. 


● आयुष्यमान भारत योजनेत तर होणाऱ्या दाखल करण्याची प्रक्रिया -


आयुष्यमान भारत योजनेत लाभार्थी रुग्णाला रुग्णालयात दाखल करताना कोणत्याही प्रकारची फी भरावे लागणार नाही. रुग्णालयात दाखल झाल्यापासून उपचाराचा संपूर्ण खर्च या योजनेमार्फत केला जात आहे. आयुष्यमान भारत योजनेत रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर चा सुद्धा खर्च या योजनेमध्ये कव्हर केला जात आहे.


● रुग्णालयात दाखल व्हायला मदत कोण करणार? 


या योजनेच्या पॅनलमध्ये सामील प्रत्येक रुग्णालयात एक आयुष्यमान योजनेचा मित्र असेल तो रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची हरसंभव मदत करेल व त्याला रुग्णालयातील सुविधा पुरवण्यासाठी सर्वतोपरी मदत करून माहिती देईल आणि सर्व सहकार्य करून रुग्णाला येथोचित उपचार आणि समाधान मिळेल याची काळजी तो आरोग्यमित्रहीन अशा आरोग्य मित्राचे मोबाईल नंबर आणि नाव सरकारी वेबसाईटला जिल्ह्यानुसार आणि हॉस्पिटल नुसार नाव व मोबाईल नंबरची माहिती नमूद केलेली आहे.


याशिवाय रुग्णालयामध्ये एक हेल्प डेस्क सुद्धा उपलब्ध असते. जेथे रुग्णाचे कागदपत्र तपासणी केली जातील. या योजनेत नामांकनासाठी व्हेरिफिकेशनसाठी त्यांच्याकडून मदत उपलब्ध केली जाईल. आयुष्यमान भारत योजनेत सामील व्यक्ती देशातील कोणत्याही सरकारी व पॅनल मध्ये समाविष्ट असणाऱ्या खाजगी रुग्णालयात सुद्धा मोफत उपचार प्राप्त करू शकेल.


● आयुष्यमान भारत योजनेत कोणत्या आजारावर उपचार केले जातील? 


ह्या योजनेत जवळपास सर्व आजारांवर उपचार मोफत केले जातील. योजनेत रुग्णाला दाखल झाल्यानंतरचा खर्च कव्हर केला जातो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्यमान भारत योजनेत १३४५ पॅकेज सामील केले आहेत. यामध्ये कोरोनारी बायपास, गुडघे बदलणे व स्टंट लावण्यासारखे सुद्धा उपचार सामील आहेत. याव्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या आजारावरती उपचार केले जातात याची लिस्ट खालील सरकारी वेबसाईटवर उपलब्ध आहे. ते पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करावे.



● Customer care Helpline / Toll free number for Ayudhman Bharat Yojana -


तुम्ही एकूण ३ प्रकारे हेल्पलाईन मिळवू शकत आहे. रुग्णांना आणि नातेवाईकांना आयुष्यमान भारत योजनेची परिपूर्ण अर्थात संपूर्ण माहिती किंवा मदत घेण्यासाठी खालील  हेल्पलाइनवर संपर्क करू शकत आहे.


१) टोल - फ्री- संपर्क -1455 किंवा 1800111565

२) फेसबुक पेज आणि ट्विटर खाते राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण 

     ( NHA) 

३)  ई-मेल आयडी -pm-nhpmission@gov.in







Post a Comment

0 Comments

close